मुक्तपीठ टीम
बंगालमधील विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी भाजपाच्या महाशक्तीला धूळ चारल्यानं ‘खेला होबे’ ही त्यांची घोषणा खूप गाजली होती. त्यानंतर ती घोषणा देशभरात वापरली जावू लागली. आता २०२४ची तयारी सुरु झाल्यानं ममता बॅनर्जीं देशव्यापी मिशन खेला होबे चालवणार आहेत. भाजपाला सत्तेतून हटवण्यासाठी भाजपाविरोधातील इतरांशी हातमिळवणी करून भाजपाला सत्तेबाहेर करण्याचं लक्ष्य त्यांनी ठरवलं आहे.
- २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रस व इतर विरोधी पक्षांनी तयारी सुरू केली आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेतून हटवण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येण्याच्या तयारीत आहेत.
- त्याची सुरुवात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली.
- त्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपाला बिहारी धक्का देत राजदबरोबर सत्ता स्थापन केली.
- आता बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही मोदी सरकारला सत्तेवरून हटवण्याचा बिगुल वाजवला आहे.
- या निवडणुकीला अजून दीड वर्ष बाकी आहे.
- गृहमंत्री अमित शहा यांनी २०२४ च्या निवडणुकीसाठी भाजपाचा आराखडा नुकताच तयार केला.
ममता बॅनर्जी भाजपा हटावसाठी हातमिळवणी करणार!
- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की त्या आणि शेजारच्या बिहार आणि झारखंडमधील इतर अनेक विरोधी पक्षांशी हातमिळवणी करतील.
- तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो बॅनर्जी यांनी दावा केला की, भाजपाचा अहंकार आणि लोकांच्या रोषामुळे त्यांना लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागेल.
- त्या म्हणाले, मी, नितीश कुमार, हेमंत सोरेन आणि इतर अनेक नेते २०२४ मध्ये एकत्र येऊ.
- भाजपाचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येतील.
- आम्ही सगळे एका बाजूला आणि भाजपा दुसरीकडे.
२०२४ लोकसभा निवडणुकीसाठी होबे २०२४चा नारा…
- बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जींनी ज्या प्रकारे होबेचा नारा वाजवला आणि सत्ता टिकवली.
- २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी खेलो होबेचा नाराही दिला.
- भाजपाची ३०० जागांची घमेंड हीच त्यांच्या नशिबी असेल, असे त्या म्हणाल्या.
ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप…
ममता बॅनर्जी म्हणाल्या, “भाजपला वाटते की ते आम्हाला सीबीआय आणि ईडीपासून घाबरवू शकतात, परंतु ते जितके असे डावपेच स्वीकारतील तितके ते पुढील वर्षीच्या पंचायत निवडणुका आणि २०२४च्या लोकसभा निवडणुकीत पराभवाच्या जवळ जातील”.