मुक्तपीठ टीम
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये प्रचारादरम्यान जखमी झाल्या आहेत. त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांना कोलकाताच्या एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे विरोधकांच षडयंत्र असल्याचे म्हणत त्यांनी आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी, ममता निवडणुकीत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. आता भाजपा समर्थकांनी ममतांची छायाचित्र वापरत त्यांची सोशल मीडियावर टर उडवणे सुरु केले आहे.
ममता बॅनर्जी या नंदीग्राममधून निवडणूक लढवत आहेत. तेथे रेयापारानजीक एका स्थानिक मंदिरात प्रार्थना केल्यानंतर ममता तेथून निघण्याच्या तयारीत असताना सायंकाळी ही घटना घडली. “गाडीजवळ असताना चार पाच लोकांनी मला धक्का दिला. माझ्या पायाला दुखापत झाली असून पायाला सूजही आली आहे. आता मी कोलकात्याला डॉक्टरांकडे उपचारासाठी जात आहे. पायाला खूप दुखापत झाली आहे. मला तापही आला आहे. त्या ठिकाणी कोणतेही पोलीस उपस्थित नव्हते. चार पाच लोकांनी हे जाणूनबुजून केलं आहे. हे एक षडयंत्र आहे, ” असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांच्या विरोधात गो बॅक घोषणाबाजी केली. तृणमूल कॉंग्रेसने या घटनेविरोधात भाजपविरोधात निदर्शने सुरू केली आहेत. तर भाजपाने ममतांवरच हे प्रकरण उलटवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा आहे. यामुळे त्यांच्या सुरक्षेत शेकडो जवान तैनात असतात. अशा परिस्थिती ममतांना जवळ येऊन कोणी धक्काबुक्की करत असेल तर ही घटना त्यांच्याच सरकारच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणारी आहे. घटनेवेळी एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता. खरंच असं असेल तर ही घटना मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील मोठी चूक आहे, असाही आक्षेप भाजपाने घेतला आहे.
#MamtaBanerjee #ममता_बनर्जी “Prashant Kishore”
ART ARTIST pic.twitter.com/tMoBMLy8rO
— AaKaash Koul (@AakaashKoul) March 10, 2021
सोशल मीडियावर भाजपाकडून टर
सोशल मीडियावर भाजपा समर्थकांकडून ममता बॅनर्जींची टर उडवणे सुरु झाले आहे. ममतांचे मिम्स बनवून चेष्टा केली जात आहे.
No footballer can beat #MamataBannerjeeKhan fake acting skills. Not even Mr. Neymar Jr. 😋#ममता_बनर्जी #Nautanki pic.twitter.com/toFuLUGWkX
— Er. Eklavya Sahani (@EklavyaSahani1) March 10, 2021
आधी पडली….. आता आडवी झाली
निवडणूकीत काय होणार ह्याची झलक दिसत आहे 😂😂😂😂 pic.twitter.com/cW60zqZooG
— Sadanand Ghodgerikar (@SGhodgerikar) March 11, 2021
#ममता_बनर्जी
Leg Injury The Reason
You know You Don’t pic.twitter.com/WFJXn1bRvY— 🅱️🆎🅰️ 🅱️🅾️🅰️ (@P_A_R_A_D_O_X_Y) March 10, 2021
निवडणूक आयोगाने अहवाल मागितला
निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दुखापतीच्या घटनेचा सविस्तर अहवाल निवडणूक आयोगाने मागविला असल्याचे सूत्रांनी सांगितले.