Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘लेकी बनवा कुशल’ : ‘उपजीविकेसाठी अपारंपरिक कौशल्ये’ विषयावर आज राष्ट्रीय परिषद

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Ministry of Women and Child Development

मुक्तपीठ टीम

महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या(MWCD)वतीने उद्या दिनांक ११ ऑक्टोबर, २०२२ या आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त ‘बेटी बचाओ,बेटी पढाओ’ या कार्यक्रमाअंतर्गत मुलींसाठी अपारंपरिक उपजीविका  कौशल्यांवर आधारीत “बेटियॉं बने कुशल” नावाच्या एका राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. या परिषदेद्वारे ज्या व्यवसायांमध्ये ऐतिहासिक काळापासून  मुलींना कमी  प्रतिनिधित्व  मिळाले आहे,अशा

विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) या क्षेत्रांसह विविध व्यवसायांमध्ये काम करण्यासाठी संधी  सुनिश्चित करण्यासाठी मुलींमध्ये कौशल्ये निर्माण करणे यासाठी विविध मंत्रालये आणि विभाग यांच्यातील अभिमुखतेवर भर दिला जाईल.

या कार्यक्रमात कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE) आणि अल्पसंख्याक कार्य मंत्रालय यांच्यासोबत युवतींच्या कौशल्य विकासासह  त्यांच्या  रोजगारातील समान आणि सशक्त सहभागासाठी विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात येतील.  मिशन शक्ती यातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार केलेल्या बदलांसह योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य/जिल्ह्यांच्या मार्गदर्शनासाठी बेटी बचाओ,बेटी पढाओ(BBBP) कार्यवाही सूचना पत्रक (ऑपरेशनल मॅन्युअल) देखील यावेळी प्रकाशित केले जाईल.

“बेटियां बने कुशल” या कार्यक्रमाचे देशव्यापी थेट प्रसारण ही करण्यात  येणार असून सर्वसाधारण प्रेक्षकांसह महिला आणि बालविकास मंत्रालय, (MWCD), कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE), क्रीडा विभाग,अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, शैक्षणिक मंत्रालयासह  वैधानिक संस्था उदाहरणार्थ राष्ट्रीय बालहक्क संरक्षण समिती (नॅशनल कौन्सिल फॉर द प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स) यांचे प्रतिनिधी या परीषदेला उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.
(www.youtube.com/c/MinistryofWomenChildDevelopmentGovtofIndia) 

  • संपूर्ण भारतातील मुलींना आणि तरुणींना या कार्यक्रमातून नेतृत्वाचे वस्तुपाठ दिले जातील.
  • केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री, श्रीमती स्मृती झुबिन इराणी आणि संपूर्ण भारतातून एनटीएल(NTL) मध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या किशोरवयीन मुली  यांच्यात  यावेळी संवाद सत्रे होतील.
  • यावेळी प्रकाशित होणाऱ्या बेटी बचाव, बेटी पढाव (BBBP) कार्यवाही परीपत्रकात (ऑपरेशनल मॅन्युअल) मार्गदर्शक तत्त्वे आणि उपलब्ध संधी या  विषयी माहिती दिली आहे.

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MoSDE) आणि अल्पसंख्याक विकास मंत्रालय, यावेळी २१व्या शतकातील जीवन आणि रोजगारक्षमता कौशल्ये, उद्योजकता कौशल्ये, डिजिटल साक्षरता आणि आर्थिक साक्षरता कौशल्यांवर लक्ष केंद्रित करत मुलींबाबात असलेली आपली वचनबद्धता यांचे जाहीर प्रकटन या उपक्रमांद्वारे करतील.

पाहा:


Tags: Beti Bachao Beti Padhaogood newsInternational Girl Child DayLeki Banwa KushalMinistry of Women and Child Developmentmuktpeethआंतरराष्ट्रीय बालिका दिनाआंतरराष्ट्रीय बालिका दिनघडलं-बिघडलंचांगली बातमीबेटी बचाओ बेटी पढाओमहिला आणि बाल विकास मंत्रालयमुक्तपीठलेकी बनवा कुशल
Previous Post

हस्तकलेच्या मार्केटिंगसाठी आता सरकारचे ऑनलाइन पोर्टल

Next Post

हिरो विडा ई-स्कूटर भारतात लाँच! एकदा चार्ज, १६५ किमीची रेंज!

Next Post
Hero Vida E-Scooter

हिरो विडा ई-स्कूटर भारतात लाँच! एकदा चार्ज, १६५ किमीची रेंज!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!