मुक्तपीठ टीम
‘बुल्ली बाई’ अॅपच्या निर्मात्याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मुख्य सूत्रधाराला आसाममधून अटक केली आहे. नीरज बिश्नोई असे आरोपीचे नाव आहे. बुल्ली बाई अॅप सध्या वादाचा विषय बनला आहे. या अॅपच्या माध्यमातून मुस्लिम महिलांना टार्गेट करण्यासोबतच त्यांचा अपमानही करण्यात येत होता.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या IFSO टीमने बुलीबाईच्या मास्टर माइंडला आसाममधून अटक केली आहे. DCP (IFSO) चे PS मल्होत्रा यांनी सांगितले की, आसाममधील नीरज बिश्नोई हा अॅपच्या मुख्य ट्विटर खातेधारकासह गिटहबवरील बुल्ली बाईचा निर्माता आहे. आरोपीला दिल्लीत आणले जात असल्याचे पीएस मल्होत्रा यांनी सांगितले.यामध्ये श्वेता सिंग, विशआल कुमार आणि मंयक रावत यांना अटक करण्यात आली.
काय आहे बुल्ली बाई अॅप प्रकरण
- मुस्लिम महिला बदनामी प्रकरणी इंटरनेटवर बुल्ली बाई अॅपवरून सोशल मीडियावर मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड करून त्याखाली आक्षेपार्ह पोस्ट नमूद करण्यात आल्या होत्या.
- ३१ डिसेंबरला अॅप डेव्हलप करण्यात आले.
- त्यानंतर बुल्ली बाई अॅपचे ट्विटर हँडल तयार करण्यात आले होते.
- बुली-बाई ॲपवर समाजमाध्यमांवर असलेल्या मुस्लिम महिलांची छायाचित्रे ‘बुली-बाई ऑफ द डे’ म्हणून प्रसारित केली जात होती.
- मुस्लिम महिलांची छायाचित्र प्रसारित झाल्यानंतर दिवसभर आक्षेपार्ह टिका टिप्पणी त्यावर केली जात होती.
आतापर्यंत १०० मुस्लिम महिलांना लक्ष करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.