मुक्तपीठ टीम
महिंद्रा अँड महिंद्रा या भारतातील आघाडीच्या एसयुव्ही उत्पादक कंपनीने आपला नवा अत्याधुनिक इन्ग्लो इव्ही प्लॅटफॉर्म आणि दोन इव्ही ब्रँड्सअंतर्गत पाच इ-एसयुव्ही आज सादर केल्या. इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या भविष्यासाठी आपले व्हिजन महिंद्रा अँड महिंद्राने यातून प्रदर्शित केले आहे.
ब्रँड, डिझाईन आणि तंत्रज्ञान या तीन प्रमुख धोरणात्मक स्तंभांवर आधारित, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अस्सल इलेक्ट्रिक एसयुव्ही आणून भारतात इलेक्ट्रिक मोबिलिटी क्रांतीची नेतृत्व करावे हे महिंद्राचे व्हिजन आहे.
ब्रँड
इलेक्ट्रिक एसयुव्हीमध्ये नवचैतन्य जागवत महिंद्राने दोन नवे ब्रँड सादर केले आहेत. कंपनीचा इव्ही पोर्टफोलिओ या दोन ब्रँड्सअंतर्गत असणार आहे – आयकॉनिक ब्रँड एक्सयुव्ही ज्याचा ट्वीन पीक लोगो तांब्यापासून बनवण्यात आलेला आहे आणि बीई – पूर्णपणे नवा इलेक्ट्रिक-ओन्ली ब्रँड.
आयकॉनिक ब्रँड एक्सयुव्हीमध्ये महिंद्राचा वारसा जपणारी आणि भविष्याला आपल्या कवेत सामावून घेऊ शकतील अशा उत्पादनांची श्रेणी प्रस्तुत करण्यात येईल. अत्याधुनिक, भविष्यवेधी डिझाईन, दमदार कामगिरी आणि सर्जनशील नावीन्य यांनी परिपूर्ण असलेला हा ब्रँड अशा ग्राहकांसाठी बनवण्यात आला आहे ज्यांना मर्यादांची चौकट मोडून, परिवर्तन घडवून आणत आयुष्य जगण्याचा असीम उत्साह असतो.
उठावदार, जागृती घडवून आणणारा, उत्साहवर्धक ब्रँड बीई, नव्या धाडसी डिझाईन भाषेसह हा ब्रँड अशा ग्राहकांना स्वतःकडे आकर्षित करेल ज्यांना आपला जीवनमार्ग स्वतः घडवायचा असतो आणि बदल घडवून आणायचा असतो. ग्राहकांना स्वतःला जसे बनायचे आहे तसे बनू देणारा हा ब्रँड आहे.
हे दोन ब्रँड्स ५ इ-एसयुव्हींमधून प्रकट करण्यात आले आहेत: एक्सयुव्ही.इ८ (XUV.e8), एक्सयुव्ही.इ९ (XUV.e9), बीई.०५ (BE.05), बीई.०७ (BE.07) आणि बीई. ०९ (BE.09) यापैकी पहिल्या चार इ-एसयुव्ही २०२४ ते २०२६ दरम्यान लॉन्च केल्या जातील.
डिझाईन:
अत्यंत आकर्षक आणि प्रभावी रूप, प्रचंड मजबुती आणि ऍटिट्यूड यांचा उत्तम मिलाप असलेले महिंद्राचे नवे हार्टकोर डिझाईन तत्त्व हा या सर्व एसयुव्हीमधील समान धागा आहे. एका नव्या जगाची द्वारे खुली करत या सर्व नवीन इ-एसयुव्ही रस्त्यावरून धावताना आणि एरव्ही देखील स्वतःचा विस्मयकारी प्रभाव निर्माण करतील, त्याचवेळी महिंद्राचा मूलभूत एसयुव्ही वारसा पुरेपूर सांभाळतील.
इन्ग्लो तंत्रज्ञान:
भारतीय हृदय आणि संपूर्ण जग कवेत घेऊ शकण्याची क्षमता असलेला इन्ग्लो प्लॅटफॉर्म म्हणजे प्रगतिशील बॅटरी तंत्रज्ञान, प्लॅटफॉर्म रचना, ब्रेन पॉवर व ह्युमन मशीन इंटरफेस यांचा मिलाप आहे. याच्या नावामध्ये देखील ऊर्जा व भावना हा प्रवाह दर्शवण्यात आला आहे, ग्लो म्हणजे अशी व्यवस्था जी कल्याण आणि परिपूर्ण ऐक्य व सुसंवाद घडवून आणते.
अत्याधुनिक इन्ग्लो प्लॅटफॉर्म महिंद्राच्या भविष्यातील सर्व इलेक्ट्रिक गाडयांना मजबुती प्रदान करेल. विशेष उद्देशाने तयार करण्यात आलेला हा प्लॅटफॉर्म म्हणजे अंतर्ज्ञानी, निपुण आणि एका नव्या जगात घेऊन जाणाऱ्या नावीन्यपूर्णतेचा मिलाप आहे जो महिंद्रा इव्ही आर्किटेक्चरचा कणा आणि त्यांच्या अप्रतिम ह्युमन-मशीन इंटरफेसचे हृदय बनेल.
श्रेणीतील आघाडीचे सुरक्षा मापदंड, दिमाखदार कामगिरी, उत्तम रेन्ज आणि कार्यक्षमता, अनुकरणीय ड्रायव्हिंग क्षमता, बहुउपयोगी आणि निपुण एचएमआय ही इन्ग्लोची वैशिष्ट्ये आहेत. आधुनिक ऑगमेंटेड रियल्टी-एनेबल्ड हेड्स-अप डिस्प्ले, एज-टू-एज स्क्रीन, ५जी नेटवर्क क्षमता आणि इव्हीला नव्याप्रमाणे चांगली ठेवणारे ओव्हर-द-एअर अपडेट्स यांच्यासह मिळणारा मल्टी-सेन्सोरियल ड्रायव्हिंग अनुभव देखील इन्ग्लोमध्ये प्रदान केला जातो.
महिंद्रा ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ डॉ अनिश शाह यांनी सांगितले, “बॉर्न इलेक्ट्रिक हे आमचे व्हिजन प्रदर्शित करताना आम्हाला अतिशय अभिमान व आनंद वाटत आहे. ‘राईज’ या आमच्या मूलभूत सिद्धांताला अनुसरून एक धोरणात्मक दिशा आम्हाला यामुळे मिळत आहे, आम्ही एक अशी संघटना बनू इच्छितो जी जगातील एक सर्वोत्तम म्हणून गणली जाईल आणि त्याबरोबरीनेच आपल्या पृथ्वीच्या संरक्षणार्थ उभी राहील व वातावरणात होत असलेल्या बदलांना रोखेल. महिंद्रा आपल्या ग्राहकांना भविष्यासाठी सुसज्ज असे तंत्रज्ञान, अतिशय आकर्षक डिझाईन, जागतिक दर्जाची उत्पादने आणि जागतिक भागीदारींचे लाभ मिळवून देईल.