मुक्तपीठ टीम
महिंद्रा म्हटलं की दणकट एसयूव्ही हे समीकरण ठरलेलंच. त्यातही स्कॉर्पिओ ही तर गेली अनेक वर्षे महिंद्राच्या इतर अनेक गाड्यांच्या जोडीनंच एसयूव्हीप्रेमींची ऑल टाइम फेव्हरिट गाडी आहे. सध्याही ज्या वाहनाने सर्वाधिक पॉझिटिव्ह वाढ नोंदवली ती महिंद्रा स्कॉर्पिओनेच. या एसयूव्हीने १६० टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. महिंद्राची ही ७ सीटर एसयूव्ही फक्त शहरातच नाही तर खेड्यातही खूप पसंत केली जात आहे. ही एसयूव्ही केवळ दिसण्यातच नाही तर, याचे फिचर्स आणि इंजिनही जबरदस्त आहेत.
महिंद्राच्या धडाकेबाज एसयूव्हीची ग्राहकांमध्ये वाढती क्रेझ
- महिंद्रा स्कॉर्पिओ या एसयूव्हीची मार्च २०२२ मध्ये एकूण ६,०६१ युनिट्सची विक्री झाली आहे.
- गेल्या वर्षी मार्चमध्ये विक्री झालेल्या २,३३१ युनिटच्या तुलनेत ही वाढ १६० टक्क्यांनी वाढली आहे.
- या वर्षी कंपनी महिंद्रा स्कॉर्पिओचे नवीन मॉडेल आणू शकते.
- नवीन मॉडेल रोड टेस्टिंग दरम्यान अनेक वेळा दिसले आहे.
- मार्च महिन्यात या एसयूव्हीवर ३४ हजार रुपयांपर्यंत सूटही दिली जात होती.
महिंद्र स्कॉर्पिओ फिचर्स आणि किंमत
- महिंद्र स्कॉर्पिओ S3+, S5, S7, S9 आणि S11 या पाच प्रकारांमध्ये येते.
- या एसयूव्हीची किंमत १३ लाख 54 हजार ते १८ लाख ६२ हजार रुपये एक्स-शोरूम दिल्लीत आहे.
- यात जास्तीत जास्त ९ लोक बसू शकतात. त्याची थेट स्पर्धा ह्यूंडाई क्रेटा, स्कोडा कूश्क, किआ सेलटोस आणि फॉक्सवेगन टायगूनसारख्या एसयूव्हीसोबत राहिली आहे.
इंजिन फिचर्स
स्कॉर्पिओ २.२ लिटर डिझेल इंजिनसह येते, जे दोन मोडमध्ये ट्यून केले जाते. पहिले इंजिन नवीन बेस-स्पेक S3+ प्रकारासह सादर केले गेले आहे. तर दुसरे इंजिन उर्वरित प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. S3+ व्हेरिएटला ५-स्पीड एमटी मिळते, तर बाकीचे व्हेरियंट ६ स्पीड मॅन्युअलशी जोडलेले आहेत.
महिंद्रा स्कॉर्पिओमध्ये क्रुझ कंट्रोल, ऑटो एसी, ब्लूटूथ आणि ७ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह एयूएक्स कनेक्टिव्हिटी आणि एलईडी डीआरएलसह ऑटो हेडलाइट्स यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. महिंद्रा स्कॉर्पिओ सुरक्षेसाठी ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, रिअर पार्किंग सेन्सर्स, एबीएस आणि स्पीड अलर्ट देण्यात आला आहे.