Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ऑक्सिजनच्या सुरळीत पुरवठ्यासाठी ‘ऑक्सिजन ऑन व्हील्स’

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
mahindra

मुक्तपीठ टीम

 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधे भारतात सर्वत्र ऑक्सिजनचा तीव्र तुडवडा तयार झाला आहे. महिंद्रा समूहाने ‘ऑक्सिजन ऑन व्हील्स’ हा मोफत सेवा उपक्रम सुरु केला आहे. हा उपक्रम ऑक्सिजन निर्माते आणि त्याची तीव्र गरज असलेली हॉस्पिटल्स व वैद्यकीय केंद्रांना जोडून ऑक्सिजनची उपलब्धता वाढवण्यास मदत करेल.

 

‘ऑक्सिजन ऑन व्हील्स’ हा उपक्रम मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी- चिंचवड, चाकण, नाशिक आणि नागपूरमध्ये महिंद्राच्या १०० वाहनांसह लाँच करण्यात आला आहे. ही मोफत सेवा इतर शहरांमधे व प्रामुख्याने दिल्लीतील गंभीर तुडवडा लक्षात घेता तिथे सुरू करण्यासाठी नागरी प्रशासन आणि सरकारी विभागांशी चर्चा सुरू आहे. या उपक्रमाला गेल्या ४८ तासांत मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद लक्षात घेता थेट रुग्णाच्या घरी ऑक्सिजन सिलिंडर पुरवण्यापर्यंत या उपक्रमाचा विस्तार करण्याची योजना विचाराधीन आहे.

 

‘ऑक्सिजन ऑन व्हील्स’चे कामकाज महिंद्रा लॉजिस्टिक्स या महिंद्रा समूहाच्या कंपनीद्वारे हाताळले जाणार असून कंपनीने या प्रकल्पासाठी प्रशासन व स्थानिक सरकारी संघटनांशी करार केला आहे. वाहनांचा मोठा ताफा, सर्वसमावेशक आदेश आणि नियंत्रण केंद्र यांच्या मदतीने महिंद्रा लॉजिस्टिक्स जीवरक्षक ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी विनाअडथळा आणि अखंडित पुरवठा साखळी तयार करत आहे. या ऑक्सिजनची हॉस्पिटल व वैद्यकीय केंद्रांना सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने वाहतूक केली जाणार आहे.

 

या उपक्रमाविषयी महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिश शहा म्हणाले, ‘आम्ही आमचे स्त्रोत आणि क्षमतांचा नाविन्यपूर्ण पद्धतीने वापर करून या आव्हानाचा सामना करण्यासाठी बांधील आहोत. ऑक्सिजन ऑन व्हील्स स्थानिक प्रशासनाशी भागिदारी करून तातडीची गरज पूर्ण करण्यात मदत करत असल्यामुळे मौल्यवान जीवांचे रक्षण करता येते तसेच आरोग्य क्षेत्रावर असलेला ताणही कमी करता येतो.’

महिंद्रा समूह कोरोनाच्या लढाईत सातत्याने आघाडीवर राहून काम करत आहे. समूहाचे या क्षेत्रातील काम व्यापक असून त्यात सरकारच्या दिलासा कामांसाठी निधी उभारण्यापासून आयसीयू बेड्स पुरवणे, आपत्कालीन कॅब सेवा, विलगीकरण केंद्रे उभारणे, वंचित घटकांना आर्थिक पाठिंबा आणि धान्य पुरवणे अशा कामांपासून निर्मिती यंत्रणा णि सुविधांची पुनर्चरना करून सध्या आवश्यक असलेले पीपीई, फेस शील्ड्स, फेस मास्क, एयरोसोल बॉक्सेसचे उत्पादन करण्यापर्यंतच्या विविध कामांचा समावेश आहे.

त्याशिवाय समूह ऑक्सिजना प्लांट्स आणि विलगीकरण केंद्रे उभारण्यासाठी सरकारबरोबर काम करत आहे. एम अँड एम तसेच कंपनीच्या भागिदारांचे प्लांट्स कोणत्याही औद्योगिक कामांसाठी ऑक्सिजनचा वापर करत नाहीयेत. टेक महिंद्राचे सहकार्य लाभलेल्या नर्सिंग अकॅडमीचे कर्मचारी आणि विद्यार्थी विविध हॉस्पिटल्समधे मदत करत आहेत. समूहाने लसीकरणावरही भर देण्याचे ठरवले असून सहकारी आणि त्यांच्या कुटुंबियांचे १०० टक्के लसीकरण केले जाणार आहे.

महिंद्रा लॉजिस्टिक्सविषयी

  • महिंद्रा लॉजिस्टिक लिमिटेड (एमएलएल) ही थर्ड पार्टी लॉजिस्टिक्स (थ्रीपीएल) सेवा पुरवठादार असून पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि नागरी वाहतूक सेवा तिचे कौशल्य आहेत.
  • एक दशकापूर्वी स्थापन झालेली एमएलएल वाहन, अभियांत्रिकी, ग्राहक उत्पादने आणि ई- कॉमर्ससारख्या क्षेत्रातील ४०० कॉर्पोरेट ग्राहकांना सेवा देते.
  • कंपनीने असेट- लाइट हे व्यावसायिक प्रारूप अवलंबले असून त्याद्वारे पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि नागरी वाहतूक सेवेशी संबंधित गरजेनुसार आणि तंत्रज्ञानावर आधारित सेवा पुरवल्या जातात.
  • एमएलएल ही महिंद्रा समूहाच्या मोबिलिटी सेवा विभागाचा भाग आहे.

 

अधिक माहितीसाठी भेट द्या: www.mahindralogistics.com

 

पाहा व्हिडीओ:


Tags: coronamahindra and mahindranagpurOxygen on Wheelsऑक्सिजन ऑन व्हील्सनागपूरमहिंद्रामहिंद्रा लॉजिस्टिक्समहिंद्रा समूह
Previous Post

डॉक्टर, शास्त्रज्ञ,उद्योजक एकवटले, स्वस्त देशी व्हेंटिलेटर बनवले!

Next Post

कार्यकर्ते एकवटले…कुणी बांधलं स्मशान, कुणी जमवली लाकडं

Next Post
corona

कार्यकर्ते एकवटले...कुणी बांधलं स्मशान, कुणी जमवली लाकडं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!