Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महिंद्रा लॉजिस्टिक्सचा ‘कॅटापल्ट’ हा भारतातील सर्वात मोठा लॉजिस्टिक इनक्यूबेटर कार्यक्रम! समजून घ्या नेमका कसा…

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
Catapult

मुक्तपीठ टीम

भारतातील सर्वात मोठ्या थर्ड पार्टी लॉजिस्टिक्स (३ पीएल) सुविधा पुरवठादारांपैकी एक असलेल्या महिंद्रा लॉजिस्टिक लिमिटेड (एमएलएल)ने आज बंगळुरू येथे कॅटापल्ट प्रीमियर डे दरम्यान दहा नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान स्टार्ट-अप्ससह धोरणात्मक सहकार्याची घोषणा केली. कॅटापल्ट इनक्यूबेटर कार्यक्रम हा महिंद्र लॉजिस्टिकचा सर्वात महत्त्वाकांक्षी तंत्रज्ञान आधारित उपक्रमांपैकी एक आहे. कॅटापल्ट २.० चे सहा गट गेल्या नऊ महिन्यांपासून एमएलएल सोबत सहयोग करत आहेत आणि तंत्रज्ञान एमव्हीपीज या कालावधीत यशस्वीरित्या चालवण्यात आल्या. एमव्हीपीजनी लॉजिस्टिक्स आणि गतिशीलता क्षेत्रात शाश्वत उपाय विकसित करणे आणि कामकाज कार्यक्षमता वाढवणे यावर लक्ष केंद्रित केले होते.

कॅटापल्ट कोहॉर्ट २.० मध्ये व्हिजन टेक, प्रगत विश्लेषण, एआय आधारित ऑप्टिमायझर, स्थान-आधारित मॉनिटरिंग टेक आणि शाश्वत लास्ट माईल वितरण उपाय यासारख्या विस्तृत तंत्रज्ञान डोमेनचा समावेश आहे. कोहॉर्ट २.० चा भाग असलेले सहा स्टार्टअप अॅसिओ रोबोटीक्स, लिंक्डडॉटस, कॉनस्टेम्स- एआय, सेन्सगिझ, जिडोका टेक्नॉलॉजीज आणि ऑरिता बाईक्स हे होते.

 Catapult

प्रीमियर डे एक्स्पोमध्ये, दहा स्टार्टअप्स (समूह 1 आणि 2) ने त्यांच्या तंत्रज्ञानातील नवकल्पनांचे प्रदर्शन केले जे प्रमाणित केले गेले. पुरस्कार सोहळ्यादरम्यान हायपर, एनमोव्हील, कॉयरीडर, अॅसिओ रोबोटीक्स, ऑरिता बाईक्स, कॉनस्टेम्स- एआय, लिंक्डडॉटस आणि सेन्सगिझ या आठ स्टार्ट-अपसोबत सामंजस्य करारा (MoUs) वर स्वाक्षरी करण्यात आली. तंत्रज्ञान स्टार्ट-अप एमएलएलच्या ‘स्मार्ट ऑटोमेशन प्रोग्राम’चा एक भाग म्हणून एकत्रित केले जातील. हे सहकार्य रिअल टाइम डिप्लॉयमेंटद्वारे कामकाज कार्यक्षमता वाढविण्यात मदत करेल आणि लॉजिस्टिक उद्योगातील भविष्यातील नवोन्मेषकांसाठी हे व्यासपीठ मजबूत करेल.

महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा म्हणाले, “मला या इनक्युबेशन प्रोग्रामच्या परिणामाबद्दल खूप आशा आहे. हा एक असा उपक्रम आहे जो योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी आला आहे. याचे कारण धोरण आणि वाढत्या उत्पादन क्षेत्राकडून असलेल्या मागणीमुळे लॉजिस्टिक क्षेत्र पुढे जात आहे. हा कार्यक्रम सर्व प्रकाशझोतात न आलेल्या नवनिर्मात्यांना त्यांच्या निर्मितीची अंमलबजावणी, व्यापारीकरण आणि पोहोच यामध्ये आणण्यास सक्षम करण्यात मदत करेल. महिंद्रा समूहात आम्ही यामुळे सर्वात लवचिक आणि कल्पक स्टार्ट-अप संस्कृती सोबत भागीदारी करण्यास सक्षम होत आहोत. त्यातून निर्माण होणारी उर्जा आम्हाला, इतर कंपन्यांना आणि राष्ट्राला लाभदायक ठरेल अशा क्षेत्रांमध्ये दिशादर्शन करते. हा एक उत्तम सहयोग संबंध आहे.”

 

महिंद्रा लॉजिस्टिक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रामप्रवीण स्वामिनाथन म्हणाले, ” ‘व्यापाराला गती देणे आणि समुदायांना वाढीस सक्षम बनवणे’ या आमच्या उद्देशानुसार आम्ही या कार्यक्रमाद्वारे स्टार्टअप इको-सिस्टमसोबत भागीदारी करण्यास उत्सुक आहोत. कॅटापल्टच्या या दुसर्‍या आवृत्तीसाठी गेल्या वर्षीपासून आम्ही खूप लांबचा पल्ला गाठला आहे. भारतीय पुरवठा साखळी आणि गतिशीलता क्षेत्रासाठी भविष्यासाठी लागणारे तयार तंत्रज्ञान-सक्षम सुविधा यांची सह-निर्मिती करण्यासाठी या गटातील बहुतांश भाग आमच्या इको-सिस्टममध्ये एम्बेड केला जाईल. या दुसऱ्या आवृत्तीच्या विजेत्यांसह काम करण्यास मी उत्सुक आहे आणि या वर्षाच्या अखेरीस तितक्याच रोमांचक सत्राची वाट पाहत आहे.”

 

कॅटापल्ट इनक्यूबेटरने लॉजिस्टिक, पुरवठा साखळी आणि गतीशीलता क्षेत्रामधील तंत्रज्ञान उपाय ओळखण्यावर लक्ष केंद्रित केले. यामध्ये तांत्रिक क्षेत्रांमध्ये पुढील क्षेत्रांचा समावेश होता: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), मशीन लर्निंग (एमएल), ब्लॉकचेन, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), रोबोटिक्स आणि ऑटोमेशन, व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर), ड्रोन, बिग डेटा आणि अॅनालिटिक्स , कमी किमतीचे हार्डवेअर/ कनेक्टिव्हिटी/ जीपीएस आधारित सोल्यूशन्स आणि ई मोबिलिटी सोल्यूशन्स. कॅटापल्टसाठी आतापर्यंत एकूण १००० स्टार्ट-अप्सनी नोंदणी केली आहे.

 


Tags: Catapultgood newsIndiaLogistics Incubator ProgramMahindra Logisticsmuktpeethकॅटापल्टचांगली बातमीभारतमहिंद्रा लॉजिस्टिक्समुक्तपीठलॉजिस्टिक इनक्यूबेटर कार्यक्रम
Previous Post

पहिल्या राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाचे २६ व २७ सप्टेंबरला पुण्यात आयोजन

Next Post

बँक ऑफ बडोद्यात विविध पदांवर ७२ जागांसाठी करिअर संधी

Next Post
bob

बँक ऑफ बडोद्यात विविध पदांवर ७२ जागांसाठी करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!