मुक्तपीठ टीम
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची मित्सुबिशी महिंद्रा अॅग्रिकल्चरल मशिनरी कंपनी ही जपानी उपकंपनी आहे. शेतविषयक यंत्रांच्या उत्पादनात ती अग्रेसर आहे. आता ती कंपनी आणि आणि जपानमधीलच कुबोटा या दोन्ही कंपन्यांनी व्यावसायिक सहकार्य करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी व्यवस्था निर्माण केली असल्याचे उभय कंपन्यांकडून घोषित करण्यात आले.
महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी संचालक आणि मित्सुबिशी महिंद्रा अॅग्रिकल्चरल मशिनरी कंपनीचे अध्यक्ष राजेश जेजुरीकर यांनी सांगितले, “जपानी बाजारपेठेसाठी केलेल्या व्यावसायिक सहकार्याच्या घोषणेमुळे आम्ही फार खूष आहोत. यामध्ये मोठ्या प्रमाणात सहयोगात्मक प्रयत्नांचा समावेश असेल, तसेच परस्परांकडील पुरवठा व्यवस्थेचा विस्तार, संयुक्त उपयोग व इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सोल्यूशन्स आणि जपानी बाजारपेठेसाठी उत्पादन विकासाकरीता सहयोगाच्या संधींचा शोध घेणे, या बाबीही यात समाविष्ट असतील.”
‘महिंद्रा’ समूह आहे तरी किती मोठा?
• महिंद्रा समूह हा १९.४ अब्ज डॉलर्स इतकी उलाढाल असलेला अनेक कंपन्यांचा समूह आहे.
• हा समूह लोकांना नाविन्यपूर्ण मोबिलिटी सोल्युशन्स देऊन ग्रामीण भागात समृद्धी आणण्यास, तसेच शहरी नागरिकांचे राहणीमान
• वाढविण्यास मदत करतो.
• नवीन व्यवसायांचे व्यवस्थापन आणि समाजोपयोगी कार्येही हा समूह करीत असतो.
• युटिलिटी वाहनांचे उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, आर्थिक सेवा आणि पर्यटन स्थळांच्या क्षेत्रातील उद्योग यांमध्ये या समुहाचे नाव अग्रभागी आहे.
• महिंद्रा ही जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी आहे.
• या समुहाच्या अन्य व्यवसायांमध्ये अपारंपरिक ऊर्जा, कृषि व्यवसाय, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट विकसन या उद्योगांचा समावेश आहे.
• भारतातच मुख्यालय असलेला महिंद्रा उद्योग समूह १०० देशांमध्ये २ लाख ५६ हजार हून अधिक लोकांना रोजगार देतो.
• ‘महिंद्रा’विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी www.mahindra.com/ ही वेबसाईट पाहा.
• ट्विटर व फेसबुकवर @MahindraRise सोबत राहा