Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महिला बचतगटांच्या उत्पादकांचा ११ व १२ रोजी दिपावली मेळावा

October 11, 2022
in सरकारी बातम्या
0
Min Mangalprabhat Lodha Press Conf 2

मुक्तपीठ टीम

महिला बचत गटांची विविध उत्पादने, दिवाळी फराळ आणि दिवाळी उपयोगी साहित्याला बाजारपेठ मिळावी यासाठी मुंबई शहरातील स्वयंसहायता बचत गटांचा मंगळवार दि. ११ आणि बुधवार दि. १२ ऑक्टोबर रोजी  पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे मेळावा होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार असल्याची माहिती, महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयातील दालनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

मान्यवरांच्या उपस्थितीत पहिल्या दिवशी उद्घाटन समारंभ

मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, महिला व बाल विकास विभागांतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ या मेळाव्याचे आयोजन करीत आहे. या मेळाव्यात शंभर महिला बचतगट सहभागी होणार आहेत. स्वयंसहाय्यता बचतगटांच्या कार्यक्षेत्रीय स्तरावरील अडचणी जाणून घेणे, त्यांना बचतगट मेळाव्याच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. बचतगटांना ऑनलाईन साहित्य विक्री करता यावी, याकरिता जागतिक बाजारपेठेतील कंपन्याचा सहभाग वाढविण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहे. दिनांक ११ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० ते सायं. ६ वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रसाद लाड, सदा सरवणकर यांची उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती लाभणार आहे. यशस्वी उद्योजकांचा सन्मान, बचतगटातील महिलांना उद्योजक व्यवसायिक साहित्य वाटप, प्रातिनिधिक बचतगटांना (बँक कर्ज) धनादेश वाटप, यशस्वी उद्योजक महिलांचे अनुभव कथन आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

बचतगटांचे स्टॉल व मान्यवरांचे मार्गदर्शन

दि.१२ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० ते सायं. ६ या कालावधीत महिलांकरिता विविध विषयांवर मार्गदर्शनपर कार्यक्रम होणार आहेत. विविध महामंडळाच्या कर्ज योजनांची माहिती, कौशल्य विकास, बँकांकडील पतपुरवठा सेवा व बाजारपेठ, विविध शासकीय महामंडळे यांच्या महिला बचत गटांसाठी असलेल्या कर्ज योजनांची माहिती यावेळी देण्यात  येणार आहे. महिला बचतगट उत्पादित विविध उत्पादने, दिवाळी फराळ आणि दिवाळी उपयोगी साहित्याच्या विक्रीकरिता स्टॉल देखील लावण्यात येणार आहेत. माविम ग्रामीण तसेच शहरी भागात मोठ्या प्रमाणावर महिला सक्षमीकरणासाठी काम करीत आहे. तरी बचतगटांच्या स्टॉलला जरूर भेट द्यावी, असे आवाहन मंत्री श्री.लोढा यांनी केले आहे.


Tags: Mahila bachat gathMangal Prabhat Lodhaदिपावली मेळावामहिला बचतगट
Previous Post

अंधेरी पोटनिवडणूक: १४ ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारणार – जिल्हाधिकारी निधी चौधरी

Next Post

चौथी एनआयसीडीसी गुंतवणूकदार गोलमेज परिषद उद्योग वाढीसाठी राज्यात उत्तम पायाभूत सुविधा – केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल

Next Post
चौथी एनआयसीडीसी गुंतवणूकदार गोलमेज परिषद उद्योग वाढीसाठी राज्यात उत्तम पायाभूत सुविधा – केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल

चौथी एनआयसीडीसी गुंतवणूकदार गोलमेज परिषद उद्योग वाढीसाठी राज्यात उत्तम पायाभूत सुविधा - केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!