Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महात्मा गांधी संकलित वाङमय जगातील प्रत्येक वाचनालयात उपलब्ध व्हावा “अमित देशमुख”

October 2, 2021
in घडलं-बिघडलं
0
gandhi

मुक्तपीठ टीम

ई – स्वरूपातील महात्मा गांधी संकलित वाङमय आज महाराष्ट्राला उपलब्ध होत आहे. मात्र लवकरच जगातील प्रत्येक वाचनालयात ते कसे उपलब्ध होईल यासाठी दर्शनिका विभागाने प्रयत्न करावा, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

 

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते गांधी जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या दर्शनिका विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या ई – स्वरूपात महात्मा गांधी संकलित वाङमयाचे आज प्रकाशन करण्यात आले. हे साहित्य पेनड्राईव्ह स्वरुपात प्रथमच प्रकाशित होत आहे. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, उपसचिव विलास थोरात तसेच दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ.दि.प्र.बलसेकर उपस्थित होते.

 

सांस्कृतिक कार्य मंत्री देशमुख म्हणाले, नवीन पिढीला म्हणजेच आजच्या डिजिटल पिढीला जी स्मार्टफोन, ई-बुक, ऑडिओ बुक, टॅबलेट आणि लॅपटॉपचा वापर करते, त्या पिढीला राष्ट्रपिता महात्मा गांधी संकलित वाङमय भाग -1 च्या 1 ते 50 खंडांचे ई – स्वरुपात उपलब्ध करून दिल्याने नक्कीच याचा फायदा होणार आहे. नव्या पिढीला, नव्या जगाला ओळख करून देण्यासाठी हे वाङमय उपयोगी ठरेल अशी आशा आहे. त्याचप्रमाणे 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती अशा पद्धतीने साजरी करता आली, याचा आज मला आनंद होत आहे. हा ई- ग्रंथ समाजोपयोगी ठरो, अशा सदिच्छा देशमुख यांनी यावेळी व्यक्त केल्या.

 

ई-स्वरूपातील महात्मा गांधी संकलित वाङमयाचे प्रकाशन दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले. त्यावेळी, या उपक्रमाचे कौतुक करताना देशमुख म्हणाले की, आज आपण डिजिटल युगात आहोत. हा कार्यक्रम डिजिटल आहे. प्रकाशनाचे स्वरूपही डिजिटल आहे. काळाचा अचूक वेध घेत दर्शनिका विभागाची कार्यशैली, कार्यप्रणाली ती देखील काळाशी अनुरूप करण्याचा प्रयत्न या विभागाने केला हे कौतुकास्पद आहे. या उपक्रमामुळे महात्मा गांधी संकलित वाङमय संपूर्ण जगाला सहजपणे उपलब्ध होईल, त्याकरीता महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा, हे देखील अतिशय महत्त्वाचे आहे.

 

या खंडांमध्ये महात्मा गांधी यांचे स्फूर्तिदायक जीवन, त्यांचा व्यक्तिविकास, त्यांनी केलेली विविध कार्ये, त्यांची भाषणे, लेख व पत्रसंग्रह अशा विपुल साहित्याचा यात समावेश आहे. याद्वारे महात्मा गांधीचे विचार समजून घेण्याची संधी वाचकांना उपलब्ध होईल. जगात ‘फादर ऑफ नेशन’ ज्यांची ओळख राहिली आहे त्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा नामोल्लेख होतो. तसेच जगात भारत आणि महात्मा गांधी ही अशी एकरूप नावे जगाने पहिली आहेत. जगात भारताचा उल्लेख ‘लँड ऑफ गांधी’ असा होतो, याचे स्मरणही देशमुख यांनी यावेळी केले.

 

यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी सांगितले की, येत्या काळात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने दर्शनिका विभाग अशाच स्वरूपाचे नवनवीन उपक्रम हाती घेणार असून राज्यातील गड-किल्ल्यांची माहिती त्याचप्रमाणे विविध इतिहासकालीन साहित्याची निर्मिती करणार आहे. त्याचा फायदा या क्षेत्रात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. या कार्यक्रमाचा समारोप, उपसचिव विलास थोरात यांनी या कामात ज्या सर्वांचा हातभार लागला आहे त्या सर्वांचे आभार मानून केला.


Tags: Amit deshamukhsaurabh vijayvilas thoratअमित देशमुखविलास थोरातसौरभ विजय
Previous Post

सुपरहिट जितेंद्र: गिरगावातील चाळीतून बॉलिवूडच्या नभांगणात चमकलेला सुपरस्टार!

Next Post

राज्यात नवे रुग्ण ३ हजाराखाली! ३ हजार ६२ बरे होऊन घरी!

Next Post
MCR 4-8-21

राज्यात नवे रुग्ण ३ हजाराखाली! ३ हजार ६२ बरे होऊन घरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!