मुक्तपीठ टीम
मुंबईतील बांधकाम सुरु असणाऱ्या घरांचे ग्राहक आता प्रत्येक तीन महिन्यांनी खरेदी केलेल्या मालमत्तेची अचूक माहिती मिळवू शकणार आहे. महारेराने सर्व नोंदणीकृत विकासकांना त्यांच्या प्रकल्पांची विस्तृत माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. बिल्डरांच्या प्रकल्पांशी संबंधित तपशील आणि माहिती दर तीन महिन्यांनी वेबसाइटवर अपलोड करावे लागतील. महारेराने हा निर्णय ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी घेतला आहे.
ग्राहकांच्या महारेराविरूद्ध तक्रारी
- इमारतीच्या बांधकामाशी संबंधित योग्य माहिती मिळत नसल्याबद्दल रेराविरूद्ध ग्राहकांकडून सातत्याने तक्रारी येत आहेत.
- प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
- आता महारेराच्या आदेशानुसार, विकासकांना प्रत्येक तीन महिन्यांनी इमारतीचा आर्किटेक्ट अहवाल, सीए प्रमाणपत्र, स्ट्रक्चर कंसल्टेंट अहवाल आणि इतर माहिती अनिवार्यपणे सादर करावी लागेल.
महारेराची बिल्डर्सवर कडक बंधनं
- महारेराने पार्किंगच्या नावाखाली विकासकांना खुली जागा विकण्यास मनाई केली आहे.
- महारेराने दिलेल्या माहितीनुसार, इमारतीचा बेसमेंट, पोडियम, स्टील आणि गॅरेजचा काही भाग पार्किंगच्या नावावर विकला जाऊ शकतो.
- प्रकल्पाचे डिझाईन तयार करतानाच पार्किंगची जागा दाखवावी लागेल.
- पार्किंगच्या नावाखाली विकासक ओपन स्पेस कोणालाही विकू शकत नाही.
- सोसायटीमध्ये पार्किंगच्या नावावर वादांची प्रकरणे येत राहतात. काही लोक पैसे कमवण्यासाठी ग्राहकांना मोकळी जागा विकतात.
- अशा तक्रारी लक्षात घेऊन रेराने पार्किंगच्या जागेच्या विक्रीशी संबंधित या सूचना जारी केल्या आहेत.