Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अखेर महाराष्ट्रात अधिकृत ‘अनलॉक’ची घोषणा! सोमवारपासून टप्प्याटप्प्याने निर्बंध हटणार!

स्थानिक प्रशासनाला परिस्थितीनुसार बदल करण्याचे अधिकार, त्यामुळे काही बदल अपेक्षित

June 5, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Maharashtra Unlock Process

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रात राजकीय श्रेयवादावरून झालेला अनलॉकचा गोंधळ आता संपलेला आहे. अखेर राज्य सरकारने शुक्रवारी मध्यरात्री अनलॉक करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार सोमवारपासून राज्यातील निर्बंध पाच टप्प्यांमध्ये हटवण्यात आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांमध्ये आढळणारा पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्णालयांमधील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावरच पाच टप्पे ठरवण्यात आले आहेत. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांची पाच स्तरांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार निर्बंध त्या त्या टप्प्यातील परिस्थितीनुसार शिथिल करण्यात येणार आहेत. दर आठवड्याला परिस्थितीचा अंदाज घेऊन शिथिलतेचा निर्णय घेतला जाणार आहे.

 

राज्य सरकारने अनलॉक प्रक्रियेची घोषणा केली असली तरी स्थानिक प्रशासनाला तेथिल परिस्थितीनुसार बदल करण्याचे अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे शिथिलतेत काही बदल होणे अपेक्षित आहे. काही ठिकाणी काही निर्बंध कायम राहू शकतील.

 

पाच टप्प्यांमध्ये जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली आहे:

पहिला टप्पा

निकष – ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ टक्क्यांहून कमी ऑक्सिजन बेडची ऑक्युपंसी

 

जिल्हे – १०

  1. अहमदनगर
  2. चंद्रपूर
  3. धुळे
  4. गोंदिया
  5. जळगाव
  6. जालना
  7. लातूर
  8. नागपूर
  9. नांदेड
  10. यवतमाळ

 

शिथिलता

  • या भागात सर्व प्रकारची दुकाने पूर्ववत सुरू होणार.
  • मॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहेसुद्धा नियमितपणे सुरू होणार.
  • रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी परवानगी.
  • लोकल सेवा पूर्ववत होईल मात्र, स्थितीनुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागास निर्बंध घालण्याची मुभा असेल.
  • सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली राहतील.
  • वॉकिंग आणि सायकलिंगला परवानगी असेल.
  • सर्व खासगी कार्यालये उघडण्याची मुभा.
  • शासकीय कार्यालयेही १०० टक्के कर्मचारी क्षमतेनं सुरू राहतील.
  • विविध खेळ, चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांनाही मुभा असेल.
  • लग्न सोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावर कोणतेही बंधने नसतील.
  • जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना परवानगी असणार आहे.
  • सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत असेल करण्यात आली आहे.
  • या भागात जमावबंदीही नसणार आहे.

 

दुसरा टप्पा

निकष

५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ ते ४० टक्क्यांदरम्यान ऑक्सिजन बेडची ऑक्युपंसी

 

जिल्हे -२

  1. हिंगोली
  2. नंदुरबार

 

शिथिलता

  • सर्व प्रकारची दुकाने पूर्णवेळ सुरू राहतील.
  • मॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे ५० टक्के क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
  • रेस्टॉरंटसाठीही ५० टक्के क्षमतेने परवानगी.
  • सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली राहतील.
  • वॉकिंग आणि सायकलिंगला परवानगी असेल.
  • सर्व खासगी कार्यालये उघडण्याची मुभा.
  • शासकीय कार्यालयेही १०० टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू राहतील.
  • विविध खेळांसाठी सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९ अशी वेळ राहील.
  • चित्रीकरण नियमितपणे करता येईल.
  • सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांना ५० टक्के उपस्थितीची मर्यादा असेल.
  • लग्न सोहळ्यासाठी हॉलमधील आसनक्षमतेच्या निम्मे किंवा जास्तीत जास्त १०० जणांच्या उपस्थितीत परवानगी असेल.
  • अंत्यविधीसाठी कोणतेही बंधन नसेल, बैठका, निवडणूक यावरही कोणतीच बंधने नसतील.
  • जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना ५० टक्के क्षमतेने परवानगी. सार्वजनिक वाहतूक सेवा १०० टक्के क्षमतेने सुरू होईल.
  • या भागात जमावबंदी लागू असेल.

 

तिसरा टप्पा

निकष

५ ते १० टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ४० टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी

 

जिल्हे – १५

  1. मुंबई (शहर – उपनगरे)
  2. ठाणे
  3. नाशिक
  4. औरंगाबाद
  5. अकोला
  6. अमरावती
  7. बीड
  8. भंडारा
  9. गडचिरोली
  10. उस्मानाबाद
  11. पालघर
  12. परभणी
  13. सोलापूर
  14. वर्धा
  15. वाशिम

 

शिथिलता

  • अत्यावश्यक सेवेतील दुकाने आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार ७ ते २ वाजेपर्यंत सुरू असतील.
  • अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने शनिवार आणि रविवार बंद असतील.
  • मॉल्स आणि सिनेमागृहे पूर्णपणे बंद असतील.
  • हॉटेल्स ५० टक्के क्षमतेने सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत खुली रहातील. दुपारी २ नंतर पार्सल सेवा सुरू असतील. शनिवार आणि रविवार बंद असतील.
  • सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी ५ ते ९ यावेळेत सुरू असतील
  • खाजगी आणि सरकारी कार्यालयात ५० टक्के क्षमतेने उपस्थिती असेल
  • इनडोर खेळले जाणारे खेळ बंद असतील
  • चित्रपट चित्रीकरणाला स्टुडीओंमध्ये परवानगी असेल
  • सामाजिक, संस्कृती, मनोरंजन कार्यक्रमाला ५० टक्के क्षमतेने दुपारी २ वाजेपर्यंत परवानगी असेल (सोमवार ते शुक्रवार)
  • लग्नसोहळे ५० जणांची उपस्थिती, अंत्यसंस्कार २० जणांची उपस्थिती, इतर बैठका ५० टक्के उपस्थित असेल
  • कृषी क्षेत्रातील कामांना आणि ई कॉमर्स, बांधकाम क्षेत्रातील कामांना दुपारी २ वाजेपर्यंत परवानगी असेल
  • दुपारी २ वाजल्यानंतर जमावबंदी कायम असेल

 

 

चौथा टप्पा

निकष – १० ते २० टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ६० टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी

जिल्हे -८

  1. पुणे
  2. बुलडाणा
  3. कोल्हापूर
  4. रायगड
  5. रत्नागिरी
  6. सांगली
  7. सातारा
  8. सिंधुदुर्ग

 

शिथिलता

  • अत्यावश्यक सेवेतील दुकाने ७ ते २ वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) उघडी राहतील
  • अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं पूर्ण वेळ बंद रहातील
  • सिनेमागृह, मॉल पूर्णपणे बंद राहतील
  • हॉटेलमधील फक्त पार्सल सेवा सुरू राहील
  • सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 सुरू रहातील (सोमवार ते शुक्रवार)
  • अत्यावश्यक सेवेतील खाजगी कार्यालयात फक्त २५ टक्के उपस्थिती राहील
  • शासकीय कार्यालयात २५ टक्के उपस्थिती
  • आऊटडोअर खेळ सकाळी ५ ते ९ (सोमवार ते शुक्रवार) सुरु राहतील
  • कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाला परवानगी नाही
  • लग्न सोहळ्यासाठी २५ लोकांची उपस्थिती, अंत्यसंस्कारासाठी फक्त २० लोकांची उपस्थिती बंधनकारक
  • राजकीय किंवा इतर बैठका ५० टक्के क्षमतेसह परवानगी
  • ज्या ठिकाणी कामगारांच्या रहाण्याची सोय आहे अशाच ठिकानाची बांधकामं सुरू रहातील
  • कृषी कामे दुपारी २ वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) सुरू राहतील.
  • ई कॉर्मस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहील
  • सलून आणि जीम ५० टक्के क्षमता सुरू राहील पण एसीचा वापर करता येणार नाही
  • बसेस ५० टक्के क्षमतेने सुरु राहील. उभे प्रवासी नाही
  • जमावबंदीचे नियम लागू राहतील

 

 

पाचवा टप्पा

निकष

२० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आणि ७५ टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी

जिल्हे

या टप्प्यात एकाही जिल्ह्याचा समावेश नाही.

शिथिलता

  • पाचव्या टप्प्यात कायम रेड झोन असणार आहे.
  • अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोमवार ते शुक्रवार ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
  • इतर दुकाने मेडिकल सोडून बाकी सर्व दुकाने बंद राहतील.

Tags: coronaMaharashtramaharashtra unlock processकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्र अनलॉक प्रक्रिया
Previous Post

कारच्या किंमतीतील स्पोर्ट्स मोटर बाइक! २०२१ डुकाटी मॉन्स्टर लवकरच भारतीय बाजारात!!

Next Post

पुणे विमानतळावरून देशभरात कोविशिल्ड लसीचे दहा कोटींपेक्षा जास्त डोस पाठवले

Next Post
pune airport

पुणे विमानतळावरून देशभरात कोविशिल्ड लसीचे दहा कोटींपेक्षा जास्त डोस पाठवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!