Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आठवड्यात पाच दिवस कठोर निर्बंध! शनिवारी, रविवारी लॉकडाऊन!! रात्री खासगी गाड्यांवर बंदी!!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
restrictions cum lockdown

मुक्तपीठ टीम

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना महामारीची दुसरी लाट वेगाने उफाळू लागल्याने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत कठोर निर्बंधांचा निर्णय घेण्यात आला. आठवड्यात सोमवार ते शुक्रवार कठोर निर्बंध लागू असतील. शनिवारी – रविवारी मात्र राज्यात कडक लॉकडाऊन असेल. हे कठोर निर्बंध सोमवारी रात्रीपासून लागू होणार आहेत.

 

आता रात्री आठपासून सकाळी सातपर्यंत फक्त अत्यावश्यक सेवावाल्यांनाच गाडी चालवण्याची परवानगी असेल. खासगी गाड्यांवर बंदी असेल. वैद्यकीय, केमिस्ट, बेकरी, दूध यांचा समावेश असेल. दुकानदार, हॉटेलांना पार्सलची मुभा असणार आहे.

चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मैदाने, बागा बंद राहतील. रेल्वे, बस या सार्वजनिक वाहतूक सेवेतही बसूनच प्रवास करता येणार आहे. त्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना परवानगी नसेल.

 

शनिवारी एका दिवसात राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पन्नास हजाराकडे पोहचली तर मुंबईतील रुग्णसंख्याही दहा हजाराकडे पोहचली. त्यामुळे अखेर कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सध्या जरी लॉकडाऊन टाळले असले तरी कठोर निर्बधांचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी तीनपासून मंत्रिमंडळाची तातडीची बैठक झाली. नेहमी बुधवारी असणारी बैठक रविवारी तातडीने बोलवल्याचा कारण मुंबईसह महाराष्ट्रातही मोठ्या संख्येनं कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने मंत्रिमंडळाची तातडीची बैठक घेण्यात आली.

 

शनिवारी एका दिवसात एकट्या मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दहा हजाराकडे, महामुंबई परिसरात सोळा हजाराकडे तर राज्यात पन्नास हजाराकडे झेपावली आहे. वारंवार नागरिकांना आवाहन करुनही कोरोना सुरक्षा नियमांचे पालन होताना दिसत नाही.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेले दोन दिवस विविध क्षेत्रातील मान्यवरांशी कोरोना सुरक्षा उपाययोजनेसंदर्भात चर्चा केली. नेमके काय करावे, याबद्दल त्यांची मते जाणून घेतली. आज सकाळीही त्यांनी चित्रपट आणि टीव्ही उद्योगातील व्यावसायिकांशी चर्चा केली.

 

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज सकाळी आठपासून मुंबईतील बाजारांचा दौरा केला, तेव्हा त्यांनाही निष्काळजी गर्दी दिसली. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचेही अनुभव तेच आहेत. त्यामुळे आज चार वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने बोलवलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत लॉकडाऊन की कडक निर्बंध यावर चर्चा झाली.

 

मुंबईत कोरोनाचा उद्रेक

  • मुंबईत शनिवारी कोरोनाचे ९०९० रुग्ण सापडले आहेत.
  • मुंबईत सद्यस्थितीत ६२ हजार १८७ कोरोना सक्रिय रुग्ण आहेत.
  • मुंबईतील रुग्ण संख्या दुपटीचा कालावधी कमी होऊन ४४ दिवसांवर आला आहे.
  • गोरेगाव विभागात हेच प्रमाण ३३ दिवस झाले आहे.
  • वांद्रे पश्चिम येथे ३४ दिवस, अंधेरी पूर्व – जोगेश्वरी येथे ३७ दिवस, चेंबूर – गोवंडी विभागात ३७ दिवस आणि अंधेरी पश्चिम येथे ३८ दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्या दुप्पट होत आहे.

 

महाराष्ट्रातही भयावह संसर्ग

  • शनिवारी राज्यात ४९,४४७ नवीन रुग्णांचे निदान.
  • शनिवारी ३७,८२१ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात शनिवारपर्यंत एकूण २४,९५,३१५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८४.४९% एवढे झाले आहे.
  • राज्यात शनिवारी २७७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. आज नोंद झालेल्या एकूण २७७ मृत्यूंपैकी १३२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ७८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.८८% एवढा आहे.
  • शनिवारपर्यंत तपासण्यात आलेल्या २,०३,४३,१२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २९,५३,५२३ (१४.५२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात २१,५७,१३५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
  • १८,९९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Tags: cm uddhav thackeraycoronamuktpeethstrict restrictionsकठोर निर्बंधकोरोनामहाराष्ट्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

*मनोरंजन महत्त्वाचे*: 1. अभिनेत्री जेनेलिया आणि तिचा नवरा म्हणजेच अभिनेता रितेश देशमुख हे दोघेही स्वत:चे मजेशीर गंमतीदार व्हिडिओ शेअर करत सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सध्या जेनेलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर कांची सोबतचा मज्जा करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. याची जबरदस्त चर्चा सुरू आहे. 2. ‘मेजर’ या सिनेमाची प्रदर्शना आधीच चर्चा रंगली आहे. या सिनेमाचं पोस्टर रिलीज झाले आहे. शहीद झालेल्या मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. यामध्ये सई मांजरेकर ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 3. टॉलीवूडचा ‘मास्टर’ हा चित्रपट जानेवारी महिन्यात चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. या चित्रपटाचा हिंदी रिमेक लवकरच येणार आहे. यामध्ये सलमान खान हा दाक्षिणात्य हीरो विजयची भूमिका साकारणार असल्याची चर्चा पसरली आहे. 4. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार तसेच अभिनेत्री आलिया भट्ट यामना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. 5. अभिनेत्री श्रद्धा कपूरने एक नवी पोस्ट शेअर करत तिच्या आगामी चित्रपटाविषयी माहिती दिली आहे. तिने आपला आगामी चित्रपट ‘चालबाज इन लंडन’ या चित्रपटाबद्दलची पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे याबद्दलची चर्चा रंगली आहे.

Next Post

उद्योजक महाराष्ट्रासोबत! ऑक्सिजन पुरवणार, व्हेंटिलेटर बनवणारच नाही तर प्रशिक्षणही देणार!

Next Post
lockdown (4)

उद्योजक महाराष्ट्रासोबत! ऑक्सिजन पुरवणार, व्हेंटिलेटर बनवणारच नाही तर प्रशिक्षणही देणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!