Monday, March 9, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दाबाल तेवढं उसळणार…शेतकरी आंदोलनाचा ६६ वा दिवस! दडपशाहीविरोधात आज उपोषण

January 31, 2021
in घडलं-बिघडलं
0
farmer protest

मुक्तपीठ टीम

 

भाजपच्या केंद्रातील मोदी सरकारचे शेतकरी विरोधी व कॉर्पोरेट धार्जिणे कृषी कायदे मागे घ्यावेत व आधार भावाला कायदेशीर संरक्षण द्यावे या मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरु असलेले शेतकरी आंदोलनाचा आज ६६ वा दिवस आहे. आंदोलनातील देशद्रोही घुसखोरांचा हिंसाचार, पोलिसांची दडपशाही, गुंडांचे हल्ले सुरु असूनही शेतकरी मात्र आपल्या निर्धारावर ठाम आहेत. गेल्या दोन महिन्यापेक्षा अधिक काळ सुरू आलेले शांततापूर्ण आंदोलन कुटीलपणे बदनाम करून मोडून काढण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे, असा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे. दडपशाहीचा निषेध करण्यासाठी आज शेतकरी आंदोलक उपोषण करीत आहेत.

भाजपशी संबंधित असलेला अभिनेता दीप सिद्धू व संयुक्त किसान मोर्चाचा भाग नसलेल्या व आंदोलनात गडबड घडवून आणण्यासाठीच आंदोलनात उतरविण्यात आल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे. त्याच्या किसान मजदूर संघर्ष कमिटीला हाताशी धरून २६  जानेवारी २०२१ रोजी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत हिंसाचार घडवून आणला, लाल किल्ल्यावरही अत्यंत आक्षेपार्ह कृत्य केले, शेतकरी आंदोलकांवर पोलिसांच्या उपस्थितीत हल्ले केले जात आहेत, असा आरोप किसान सभेचे नेते कॉ. अजित नवले यांनी केला आहे. दडपशाहीचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुण्यतिथीस सदभावना दिवस पाळला जात आहे. सकाळी ९ पासून शेतकरी आंदोलक व समर्थकांनी उपोषण सुरु केले आहे. आज सायंकाळी ५ पर्यंत हे उपोषण केले जात आहे.

 

किसान सभेचे निवेदन

 

आजच्या उपोषणाबद्दल किसान सभेने केलेले निवेदन जसं आहे तसं:

 

दुसऱ्या बाजूला संयुक्त किसान मोर्चाने प्रजासत्ताक दिनी आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ अत्यंत शांततेत अभूतपूर्व ट्रॅक्टर मार्च काढला. एक लाख ट्रॅक्टर व सात लाख शेतकरी या ट्रॅक्टर मार्चमध्ये सहभागी झाले. भाजपच्या आय टी सेलने मात्र अत्यंत शांततेत पार पडलेल्या ट्रॅक्टर मार्चकडे देशवासीयांचे लक्ष जाऊ नये यासाठी दिल्ली येथे दीप सिद्धू, किसान मजदूर संघर्ष कमिटी आणि पोलीस यांनी घडविलेला हिंसाचार चित्रित करून तो देशभर प्रसारित केला.

शेतकऱ्यांचे दोन महिन्यापेक्षा अधिक काळ सुरू असलेले शांततामय आंदोलन पहिल्यांदा बदनाम करायचे व नंतर बळाचा वापर करून ते मोडून काढायचे या षडयंत्राचा भाग म्हणूनच हे सारे करण्यात आले. दुसऱ्या दिवशी या रणनीतीनुसार पलवल बॉर्डर व गाजीपुर बॉर्डरवर सरकारने पोलीस बळाचा वापर करून येथे बसलेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न केला. गाजीपूरमध्ये हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.

सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी आंदोलन मोडीत काढण्यासाठी हिंस्र व कुटील मार्गाचा अवलंब केला आहे. जे.एन.यु. मधील विद्यार्थ्यांचे आंदोलन व सी.ए.ए. विरोधातील दिल्ली आंदोलन सरकारने अशाच प्रकारे हिंसेचा वापर करत मोडून काढले होते. सरकार व भाजप आता शेतकऱ्यांचे आंदोलनही याच प्रकारे हाताळत आहे.

संयुक्त किसान मोर्चा, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती आणि अखिल भारतीय किसान सभा सरकारच्या कृतीचा धिक्कार करत आहे. महात्मा गांधी यांच्या हौतात्म्यदिनी आज देशभर एक दिवसाचा उपवास करून, सभा घेऊन, धरणी धरून शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला, युवक, विद्यार्थी व समाजसेवी संघटना सरकारच्या या कारस्थानाचा जोरदार निषेध करत आहेत. महाराष्ट्रातही सर्वत्र अशा प्रकारे निषेध करण्यासाठी संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा, महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि सर्व समविचारी संघटना एकवटल्या आहेत.


Tags: BJPFarmer protestFarmer protest 2020hunger strikeदिल्ली शेतकरी आंदोलनभाजपाशेतकरी ट्रॅक्टर रॅली
Previous Post

#अर्थसंकल्प२०२१ आर्थिक सर्वेक्षणात दडलंय काय?

Next Post

भाजपचे आक्रमक ‘मिशन मुंबई’, आता शेलारांचा शिवसेनेवर हल्ला

Next Post
bjp ashish shelar mission mumbai

भाजपचे आक्रमक 'मिशन मुंबई', आता शेलारांचा शिवसेनेवर हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!