Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत एक कोटी २६ लाखांचे विदेशी मद्य जप्त

February 9, 2022
in घडलं-बिघडलं
0
Maharashtra state excise

मुक्तपीठ टीम

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मंगळवेढा, सोलापूर येथे कारवाई करून अवैध विदेशी मद्याचे १३७४ बॉक्ससह दोन वाहने असा एकूण एक कोटी २६ लाखांचा मुद्देमाल जप्त केली आहे.

            

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकास मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या परराज्यातील गोवा विदेशी मद्याची गोवा राज्यातून मंगळवेढा मार्गे सोलापूर येथे विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार नुकतीच कारवाई करण्यात आली.

            

ही उल्लेखनीय कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतिलाल उमाप यांच्या आदेशानुसार, विभागीय उप आयुक्त सुनिल चव्हाण, विभागीय उप आयुक्त प्रसाद सुर्वे, संचालक उषा वर्मा, अधिक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमध्ये भरारी पथकाचे प्रमुख संताजी लाड, मनोज चव्हाण, दुय्यम निरीक्षक प्रशांत निकाळजे, प्रमोद कांबळे यांच्यासह त्यांच्या जवान व वाहनचालक या सहकाऱ्यांचा सहभाग होता.

            

कारवाईमध्ये टाटा कंपनीचे दोन मालकवाहक कंटेनर बॉडी असलेले ट्रकची दारूबंदी कायद्याअंतर्गत तपासणी करण्यात आली. त्यामध्ये अवैध विदेशी मद्याचे १३७४ बॉक्स ताब्यात घेण्यात आले. ट्रक चालक चंद्रकांत शेरे आणि महावीर भोसले यांच्याविरोधात दारूबंदी कायद्याअन्वये कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच टाटा कंपनीचे सहा चाकी दोन कंटेनर, गोवा बनावटी निर्मित विदेशी मद्याचे १३२४ बॉक्स, टुबर्ग तीव्र बिअर ५०० मिलीचे ५० बॉक्स मौजे शिरसी-मंगळवेढा रोड, शिरसी गावचे पूर्वेस पाणी टाकीजवळील रोड येथून मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील कारवाई सुरू आहे. अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास व्हॉट्सअप 8422001133 तसेच दूरध्वनी क्र 022-2263881 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.


Tags: राज्य उत्पादन शुल्क विभाग
Previous Post

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून सागरी सुरक्षेचा आढावा

Next Post

‘त्या’ वक्तव्याबद्दल माफी मागा! पंतप्रधान मोदींविरोधात काँग्रेसचं राज्यभर आंदोलन

Next Post
congress

'त्या' वक्तव्याबद्दल माफी मागा! पंतप्रधान मोदींविरोधात काँग्रेसचं राज्यभर आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!