Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिवसेनेतील बंड, सर्वोच्च न्यायालयाकडे सर्वांचं लक्ष!

शिंदे गटाकडून नोटीसला उत्तरासाठी किमान आज संध्याकाळची मुदत वाढवण्यासाठी प्रयत्नांची शक्यता

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
maharashtra issuse in sc

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील सत्ताकारणाचा वाद अखेर सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. बंडखोर एकनाथ शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दोन वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. शिवसेनेकडून सुरू असलेल्या अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गटाकडून याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर स्थगितीची मागणी केली आहे. तसेच अजय चौधरींच्या गटनेते पदाला आव्हान देणारी याचिकाही शिंदे गटानं दाखल केली आहे. यावर आज सुनावणी होणार आहे.

आज इतर काही नाही झाले तरी किमान विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिलेल्या ४८ तासांच्या आज संध्याकाळी ५ वाजता संपणाऱ्या मुदतीला वाढवण्याचा अंतरिम दिलासा मिळवण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील वाद सर्वोच्च न्यायालयात!

  • आमदारांच्या अपात्रतेची प्रक्रिया सुरू करण्याच्या नोटिसीला स्थगिती द्यावी, अशी मागणी शिंदे गटाने याचिकेत केली आहे.
  • अविश्वास ठराव फेटाळणे आणि विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड या तीनही मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयाने तातडीने हस्तक्षेप करावा.
    या खटल्यांची लवकर सुनावणी व्हावी, अशी विनंती त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती.
  • तसेच एकनाथ शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत अजय चौधरींच्या नियुक्तीविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.
  • एकनाथ शिंदे यांची न्यायालयात बाजू मांडण्यासाठी नामांकित वकील हरीश साळवे तर महाविकास आघाडीच्या बाजूने जेष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी असणार आहेत.
  • तुम्हाला अपात्र का ठरवू नये, अशी विचारणा करत महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापतींनी शिवसेनेच्या अर्जावर १६ आमदारांना नोटीस बजावली आहे.
  • त्यांनी २७ जूनच्या संध्याकाळपर्यंत आमदारांना उत्तर देण्यास सांगितले आहे. यापूर्वी उपसभापती नरहरी झिरवाळ यांनीही आपल्याविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव निनावी मेल आयडीवरून पाठवण्यात आला होता, त्यासाठी आमदारांना पुढे यावे लागेल, असे सांगत फेटाळला होता. शिंदे यांनी न्यायालयात नोटीसची वेळ वाचवण्यासाठी त्यांच्या याचिकेची प्रत महाराष्ट्र सरकारला आधीच पाठवली आहे.

Tags: Eknath ShindeMaharashtraShivsenaSupreme Courtएकनाथ शिंदेमहाराष्ट्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरेशिवसेनासर्वोच्च न्यायालय
Previous Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अधिकारी पदांवर भरती, १५ जुलैपर्यंत मुदत

Next Post

मुजरा मानाचा राजर्षी शाहू महाराजांना

Next Post
मुजरा मानाचा राजर्षी शाहू महाराजांना

मुजरा मानाचा राजर्षी शाहू महाराजांना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!