मुक्तपीठ टीम
आज साताऱ्यातील प्रतापगडावर ३६३वा शिवप्रताप दिनाचा भव्य कार्यक्रम पार पडला. यावेळी या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती. भाजपचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलेले वक्तव्य यावेळी वादचं कारण ठरलं आहे. भाजपा नेते पुन्हा पुन्हा शिवाजी महाराजांवरून वाद का माजवतात? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही शिवरायांवर केलेल्या वक्तव्यावर वाद सुरू असतानाच, लोढा यांच्या वक्तव्यामुळे आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. त्यामुळे आता भाजपा नेते पुन्हा पुन्हा शिवाजी महाराजांवरून वाद का माजवतात? अशी चर्चा सुरु झाली असून टीकेचा मारा होत आहे.
भाजपा नेते, पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी शिवरायांच्या इतिहासातील एका घटनेची तुलना एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केली आहे. ज्यामुळे राज्यात वाद उफाळी आली आहे. त्यांच्या या विधानानंतर वाद निर्माण झाला आहे. अनेकांनी लोढा यांच्या या विधानावर निषेध केलाय. या सगळ्या टीकेनंतर लोढांनी आपल्या विधानाचं स्पष्टीकरणही दिले आहे.
काय म्हणाले लोढा?
- मंगल प्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदेनी शिवसेनेत केलेल्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेशी केली.
- ते म्हणाले की, आग्र्यातून शिवराय बाहेर पडले तसेच शिंदेही बाहेर पडले.
- औरंगजेबाने शिवरायांना ज्याप्रमाणे रोखले होते तसेच, शिंदेनाही कोणीतरी रोखले होते.
- शिवराय स्वराज्यासाठी बाहेर पडले तर शिंदे महाराष्ट्रासाठी बाहेर पडले. असे वादग्रस्त वक्तव्य मंगल प्रभात लोढा यांनी केलेलं आहे.
मंगल प्रभात लोढांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचे प्रतिउत्तर
- आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्यांना महाराष्ट्र खोके सरकार, गद्दार म्हणून ओळखते, त्यांच्यासोबत महाराजांची तुलना हे महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्यासारखे आहे.
- राज्यपाल जे बोलतात तेच मंत्री महोदय आज बोलले आहेत.
- हा महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे.
- हा आवाज नक्की कोणाचा?” असा सवालही त्यांनी केला आहे.
राष्ट्रवादीच्या अजित पवारांचे खडेबोल!
- शिवाजी महाराज यांची तुलना आपण कोणाशी करतो आहे, याचा काही ताळमेळ राहिलेला नाही.
- या नेत्यांमध्ये चढाओढ लागली आहे.
- या वाचाळवीरांना आवरा, अशा शब्दात अजित पवारांनी खडेबोल सुनावले आहे.
अमोल कोल्हे लोढांच्या वक्तव्यावर संतापले
- छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचा प्रयत्न आपण कृपया थांबवा.
- जर, अपमान थांबला नाही तर, माझी विनंती आहे येणाऱ्या शिवजयंतीला आपण किल्ले शिवनेरीवर येऊ नका.
- येथे पाय ठेऊ नका.
- कारण, एकीकडे राज्याची जबाबदारी आपल्या हातात असताना सातत्याने अशी विधानं येत असतात त्याला आपण पायबंध घालत नाही आणि मग, आपण शिवजयंती साजरी करायची म्हणत असाल तर, कुठल्या नैतिक अधिकाराने तुम्ही शिवनेरीवर येणार आहात.
- ही विधानं थांबवली नाही तर, शिवभक्तांच्या वतीने मी सांगतो की, शिवनेरीवर पाय ठेवणं नक्कीच मुश्कील होईल.
“लोढांचे वक्तव्य दळभद्री”- संजय राऊत
- शिवाजी महाराजांबदल राज्यपालांनी केलेलं वक्तव्य दळभद्री आहे.
- त्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा एकदा दुखावला गेला आहे.
- भाजपचे प्रवक्ते शिवाजी महाराजांबदल अपमान करणारे वक्तव्य करतात ही भाजपची अधिकृत भूमिका आहे का? असा थेट सवाल संजय राऊतांनी यावेळी उपस्थित केला आहे.
“मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली नाही. तर जो प्रसंग घडला याची तुलना केली. केवळ त्या प्रसंगातील साधर्म्य दाखवण्याचा माझा प्रयत्न होता.” असे मंगलप्रभात लोढांनी स्पष्टीकरण दिले.
याआधीही झाले महाराजांवरून वाद…
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्त सुधांशू त्रिवेदी काय म्हणाले?
- औरंगजेबला पत्र लिहून छत्रपती शिवाजी महाराज यांनी ५ वेळा माफी मागितली’, असं वादग्रस्त वक्तव्य सुधांशू त्रिवेदी यांनी केलं.
- एका डिबेट शोमध्ये बोलताना सुधांशू त्रिवेदींनी हे विधान केलं होतं.
- सुधांशू त्रिवेदी यांच्या विधानावर सर्वच नेते संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
- त्यांच्या विधानाचा निषेध करण्यात येतोय.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे आक्षेपार्ह वक्तव्य!
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बोलत होते.
- यावेळी कोश्यारींनी भाषण करताना नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली होती.
- ते म्हणाले की, आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची.
- मला आता असं वाटतं तुम्हाला कोणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही.
- महाराष्ट्रातच तुम्हाला भेटतील. शिवाजी तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे.
- डॉ. आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळतील, असे विधान कोश्यारींनी केले.