Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष: सोमवारी सुनावणी की फक्त घटनापीठाचा निर्णय आणि पुढची तारीख?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Maharashtra Political Crisis SC hearing on 22 Aug

मुक्तपीठ टीम

राज्यातील सत्तासंघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. येत्या २२ ऑगस्टला सत्ता संघर्षावरील पुढील सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे या सुनावणीत काय निकाल लागतोय किंवा पुढची तारीख दिली जातेय का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. सोमवारी सहाव्या क्रमांकावर या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडेल. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा हे २६ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत असल्याने हे प्रकरण नव्या खंडपीठाकडे प्रकरण जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल कोणाच्या बाजून लागणार?

  • सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांच्या निवृत्तीची तारीख २६ ऑगस्ट आहे.
  • त्यांच्या जागी उदय लळीत येणार आहेत.
  • मात्र, हे प्रकरण एन.व्ही रमणा यांच्या खंडपीठाकडे सुरू असल्याने ते निवृत्त होण्याआधीच सुनावणी पूर्ण व्हावी अशी अपेक्षा केली जात आहे.
  • या प्रकरणी सतत तारखांवर तारखे मिळत आहेत, आताही नव्या घटनापीठाकडे प्रकरण जाण्याची शक्यता आहे.

वकिलाच्या फौजा, कायद्याचा किस!

उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी तर शिंदे गटाकडून हरीश साळवे सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहे.
तर निवडणूक आयोगाकडून अरविंद दातार बाजू मांडत आहेत.

शिवसेना नेमकी कोणाची?

  • यापूर्वी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी ३ ऑगस्ट रोजी पार पडली होती.
  • या सुनावणीत बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवरुन सुरु झालेली कायदेशीर लढाई थेट शिवसेना नेमकी कोणाची?
  • उद्धव ठाकरेंची की, शिंदे गटाची या प्रश्नापर्यंत येऊन पोहोचली आहे.
  • यावर न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय नोंदवला.
  • पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय नको, असं सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं होतं.
  • अशाप्रकारे महाराष्ट्राचे सत्तासंघर्षासंदर्भात सर्वोच्च न्यायालयासमोर एकूण सहा याचिका आहेत.
  • सर्व सहा याचिका एकत्रित करून घटनापीठाकडे देण्यास कोणीही अद्यापपर्यंत विरोध दर्शविलेला नाही.
  • त्यामुळे सर्व सहा याचिका एकत्रितपणे घटनापीठाकडे सोपवल्या जातील, अशी शक्यताही नाकारता येत नाही.

Tags: Eknath ShindeMaharashtra Political CrisisShivsenaSupreme CourtUddhav Thackerayउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेमहाराष्ट्र सत्तासंघर्षशिंदे गटशिवसेना
Previous Post

बनावट बिलांनी ४० कोटींची करचुकवेगिरी घोटाळा : बोरिवली, विलेपार्ले येथील व्यापारी गजाआड

Next Post

मुंबईत पुन्हा कोरोना वाढतोय…दैनंदिन रुग्णसंख्येत १० दिवसांमध्ये तिप्पट वाढ!

Next Post
corona

मुंबईत पुन्हा कोरोना वाढतोय...दैनंदिन रुग्णसंख्येत १० दिवसांमध्ये तिप्पट वाढ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!