मुक्तपीठ टीम
राज्यातील सत्तासंघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. येत्या २२ ऑगस्टला सत्ता संघर्षावरील पुढील सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे या सुनावणीत काय निकाल लागतोय किंवा पुढची तारीख दिली जातेय का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. सोमवारी सहाव्या क्रमांकावर या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडेल. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा हे २६ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत असल्याने हे प्रकरण नव्या खंडपीठाकडे प्रकरण जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल कोणाच्या बाजून लागणार?
- सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांच्या निवृत्तीची तारीख २६ ऑगस्ट आहे.
- त्यांच्या जागी उदय लळीत येणार आहेत.
- मात्र, हे प्रकरण एन.व्ही रमणा यांच्या खंडपीठाकडे सुरू असल्याने ते निवृत्त होण्याआधीच सुनावणी पूर्ण व्हावी अशी अपेक्षा केली जात आहे.
- या प्रकरणी सतत तारखांवर तारखे मिळत आहेत, आताही नव्या घटनापीठाकडे प्रकरण जाण्याची शक्यता आहे.
वकिलाच्या फौजा, कायद्याचा किस!
उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी तर शिंदे गटाकडून हरीश साळवे सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहे.
तर निवडणूक आयोगाकडून अरविंद दातार बाजू मांडत आहेत.
शिवसेना नेमकी कोणाची?
- यापूर्वी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी ३ ऑगस्ट रोजी पार पडली होती.
- या सुनावणीत बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवरुन सुरु झालेली कायदेशीर लढाई थेट शिवसेना नेमकी कोणाची?
- उद्धव ठाकरेंची की, शिंदे गटाची या प्रश्नापर्यंत येऊन पोहोचली आहे.
- यावर न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय नोंदवला.
- पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय नको, असं सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं होतं.
- अशाप्रकारे महाराष्ट्राचे सत्तासंघर्षासंदर्भात सर्वोच्च न्यायालयासमोर एकूण सहा याचिका आहेत.
- सर्व सहा याचिका एकत्रित करून घटनापीठाकडे देण्यास कोणीही अद्यापपर्यंत विरोध दर्शविलेला नाही.
- त्यामुळे सर्व सहा याचिका एकत्रितपणे घटनापीठाकडे सोपवल्या जातील, अशी शक्यताही नाकारता येत नाही.