Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिवसेना कुणाची? : घटनापीठासमोरील पहिल्या सुनावणीत आज काय घडलं? २७ सप्टेंबरला पुढील सुनावणी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Eknath Shinde And Uddhav Thackeray Whos Shivsena

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा वादावर सर्वोच्च न्यायालयात आज पहिली सुनावणी झाली. शिवसेनेतील बंडखोरीनंतर सर्वोच्च न्यायालयात दाखल सर्व याचिका एकत्र करून त्यावर माजी सरन्यायाधीश रमणा यांनी सुनावणी सुरु केली होती. त्यांनी घटनापीठासमोर सुनावणीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पाच न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन झालं आहे. आज या घटनापीठासमोर पहिल्या सुनावणीत शिंदे गटानं निवडणूक आयोगासमोरील पक्ष चिन्ह धनुष्यबाण कुणाचा, यावर दाखल याचिकेच्या सुनावणीवरील स्थगिती उठवण्याची मागणी केली. आता शिवसेना, शिंदे गट आणि निवडणूक आयोगाने लेखी युक्तिवाद सादर केल्यानंतर २७ सप्टेंबर रोजी घटनापीठ पुढील सुनावणी करणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर आज काय घडलं?

एकनाथ शिंदे गट – अॅड. नीरज कौल

  • निवडणूक आयोगाला कार्यवाही करण्यास परवानगी देता येईल का?
  • पक्षाचे चिन्ह वापरण्याबाबत निर्णय व्हायला हवा.
  • त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निवडणूक आयोगासमोरील सुनावणीवरील स्थगिती आदेशाचा संदर्भ दिला.

घटनापीठ

  • या प्रकरणी २७ सप्टेंबर रोजी आम्ही तुम्हाला थोडक्यात ऐकू.
  • याप्रकरणी काही दिशानिर्देश आवश्यक आहेत का ते तेव्हाच ठरवू.

शिवसेना – अॅड. कपिल सिब्बल

हा एक मुद्दा आहे. पक्षांतर्गत फूट निश्चित करणे निवडणूक आयोगाचे अधिकारात आहे, पण या संदर्भात आयोगाचा निर्णय झाल्यास आमच्या याचिका निष्फळ ठरतील.

घटनापीठ

  • निवडणूक आयोगाला प्रतिबंध घालण्याची इच्छा नव्हती.
  • २३ ऑगस्ट रोजी तयार करण्यात आलेल्या प्रश्नांपैकी निवडणूक आयोगाच्या अधिकाराची व्याप्ती हा एक प्रश्न आहे.
  • आम्ही फक्त यातील Interlocutory Application परस्परसंबंधी याचिकांची यादी करू.

शिवसेना – अॅड. कपिल सिब्बल

  • जर लोक अपात्र ठरले तर ते निवडणूक आयोगाकडे जाऊ शकत नाहीत. त्यामुळे अपात्रतेचा निर्णय आधी घ्यावा लागेल.

एकनाथ शिंदे गट – अॅड. नीरज कौल

  • याचा निवडणूक आयोगाकडे जाण्याचा काहीही संबंध नाही.

घटनापीठ

Interlocutory Application परस्परसंबंधी याचिकांवर २७ सप्टेंबर रोजी ठरवा.

शिवसेना – अॅड. अभिषेक मनु सिंघवी

  • अपात्र सदस्य निवडणूक आयोगाकडे जाऊ शकत नाहीत.
  • तीन वेळा तत्कालीन सरन्यायाधीशांनी निवडणूक आयोग चालणार नाही असे सांगितले.

निवडणूक आयोग – अॅड. दातार

  • न्यायालयाला प्रतिबंध करण्याची गरज नाही, आम्ही वेळ मागू.

घटनापीठ

  • आम्ही आदेश देत नाही.
  • त्या दिवशी आम्ही तुमची बाजू ऐकू.
  • त्या दिवसासाठी तुम्ही तुमची ऊर्जा राखून ठेवू शकत नाही का?
  • Interlocutory Application परस्परसंबंधी याचिकांची यादी 27 सप्टेंबर रोजी ठरवू.

निवडणूक आयोग – अॅड. दातार

  • निवडणूक चिन्ह कायद्यांतर्गत तक्रार असल्यास तिची सुनावणी सुरू करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. स्थगितीची गरज नाही कारण कागदपत्र सादर करण्याला थोडा वेळ लागेल.
  • अपात्र ठरवले तर त्यांचं आमदारकीचं पद जाईल, पक्षातून ते बाहेर जाणार नाहीत. असा मी युक्तिवाद केला होता.

खंडपीठ:

  • आम्ही त्यावर विचार करू.

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठात कुणाचा समावेश?

  • न्या. डॉ. धनंजय चंद्रचुड
  • न्या. एम. आर. शाह
  • न्या. कृष्णा मुरारी
  • न्या. श्रीमती हिमा कोहली
  • न्या. पद्मिघंटम श्री नरसिंहा

Tags: Maharashtra Political CrisisShivsenaSupreme CourtUddhav Thackerayशिंदे गटशिवसेना
Previous Post

पारशीवाड्याच्या गणेशोत्सवात अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचं दर्शन!

Next Post

मिशन २०२४साठी भाजपा लक्ष देत असलेले ‘ते’ पसमंदा मुसलमान नेमके कोणते?

Next Post
Pasmanda Muslims

मिशन २०२४साठी भाजपा लक्ष देत असलेले 'ते' पसमंदा मुसलमान नेमके कोणते?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!