मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा वादावर सर्वोच्च न्यायालयात आज पहिली सुनावणी झाली. शिवसेनेतील बंडखोरीनंतर सर्वोच्च न्यायालयात दाखल सर्व याचिका एकत्र करून त्यावर माजी सरन्यायाधीश रमणा यांनी सुनावणी सुरु केली होती. त्यांनी घटनापीठासमोर सुनावणीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पाच न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन झालं आहे. आज या घटनापीठासमोर पहिल्या सुनावणीत शिंदे गटानं निवडणूक आयोगासमोरील पक्ष चिन्ह धनुष्यबाण कुणाचा, यावर दाखल याचिकेच्या सुनावणीवरील स्थगिती उठवण्याची मागणी केली. आता शिवसेना, शिंदे गट आणि निवडणूक आयोगाने लेखी युक्तिवाद सादर केल्यानंतर २७ सप्टेंबर रोजी घटनापीठ पुढील सुनावणी करणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर आज काय घडलं?
एकनाथ शिंदे गट – अॅड. नीरज कौल
- निवडणूक आयोगाला कार्यवाही करण्यास परवानगी देता येईल का?
- पक्षाचे चिन्ह वापरण्याबाबत निर्णय व्हायला हवा.
- त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निवडणूक आयोगासमोरील सुनावणीवरील स्थगिती आदेशाचा संदर्भ दिला.
घटनापीठ
- या प्रकरणी २७ सप्टेंबर रोजी आम्ही तुम्हाला थोडक्यात ऐकू.
- याप्रकरणी काही दिशानिर्देश आवश्यक आहेत का ते तेव्हाच ठरवू.
शिवसेना – अॅड. कपिल सिब्बल
हा एक मुद्दा आहे. पक्षांतर्गत फूट निश्चित करणे निवडणूक आयोगाचे अधिकारात आहे, पण या संदर्भात आयोगाचा निर्णय झाल्यास आमच्या याचिका निष्फळ ठरतील.
घटनापीठ
- निवडणूक आयोगाला प्रतिबंध घालण्याची इच्छा नव्हती.
- २३ ऑगस्ट रोजी तयार करण्यात आलेल्या प्रश्नांपैकी निवडणूक आयोगाच्या अधिकाराची व्याप्ती हा एक प्रश्न आहे.
- आम्ही फक्त यातील Interlocutory Application परस्परसंबंधी याचिकांची यादी करू.
शिवसेना – अॅड. कपिल सिब्बल
- जर लोक अपात्र ठरले तर ते निवडणूक आयोगाकडे जाऊ शकत नाहीत. त्यामुळे अपात्रतेचा निर्णय आधी घ्यावा लागेल.
एकनाथ शिंदे गट – अॅड. नीरज कौल
- याचा निवडणूक आयोगाकडे जाण्याचा काहीही संबंध नाही.
घटनापीठ
Interlocutory Application परस्परसंबंधी याचिकांवर २७ सप्टेंबर रोजी ठरवा.
शिवसेना – अॅड. अभिषेक मनु सिंघवी
- अपात्र सदस्य निवडणूक आयोगाकडे जाऊ शकत नाहीत.
- तीन वेळा तत्कालीन सरन्यायाधीशांनी निवडणूक आयोग चालणार नाही असे सांगितले.
निवडणूक आयोग – अॅड. दातार
- न्यायालयाला प्रतिबंध करण्याची गरज नाही, आम्ही वेळ मागू.
घटनापीठ
- आम्ही आदेश देत नाही.
- त्या दिवशी आम्ही तुमची बाजू ऐकू.
- त्या दिवसासाठी तुम्ही तुमची ऊर्जा राखून ठेवू शकत नाही का?
- Interlocutory Application परस्परसंबंधी याचिकांची यादी 27 सप्टेंबर रोजी ठरवू.
निवडणूक आयोग – अॅड. दातार
- निवडणूक चिन्ह कायद्यांतर्गत तक्रार असल्यास तिची सुनावणी सुरू करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. स्थगितीची गरज नाही कारण कागदपत्र सादर करण्याला थोडा वेळ लागेल.
- अपात्र ठरवले तर त्यांचं आमदारकीचं पद जाईल, पक्षातून ते बाहेर जाणार नाहीत. असा मी युक्तिवाद केला होता.
खंडपीठ:
- आम्ही त्यावर विचार करू.
सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठात कुणाचा समावेश?
- न्या. डॉ. धनंजय चंद्रचुड
- न्या. एम. आर. शाह
- न्या. कृष्णा मुरारी
- न्या. श्रीमती हिमा कोहली
- न्या. पद्मिघंटम श्री नरसिंहा