Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष: सुनावणीला पुन्हा तारीख! सरन्यायाधीश रमण्णांच्या निवृत्तीआधी होणार की नाही?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
maharashtra political crisis how many cases in supreme court?

मुक्तपीठ टीम

राज्यातील सत्तासंघर्षावर आज होणारी सुनावणी लांबणीवर गेली आहे. आता ही सुनावणी २३ ऑगस्ट म्हणजेच, उद्या मंगळवारी होण्याची शक्यता आहे. न्यायालयातील त्रिसदस्यीय खंडपीठातील एक न्यायमूर्ती आज उपलब्ध नसल्यामुळे ही सुनावणी लांबणीवर गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तांघर्षावरील निर्णय अद्याप सर्वोच्च न्यायालयात रखडत पडला आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष पुन्हा लांबणीवर!!

  • सर्वोच्च न्यायालयाकडून गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाची सुनावणी सातत्याने लांबणीवर टाकली जात आहे.
  • या प्रकरणी ४ ऑगस्टला शेवटची सुनावणी घेण्यात आली होती.
  • त्यानंतर तिसऱ्यांदा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
  • २३ ऑगस्ट म्हणजेच, उद्या मंगळवारी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी होऊ शकते, असं सांगितलं जात आहे.
  • याप्रकरणाची सुनावणी वारंवार लांबवणीर पडत असल्याने अनेक चर्चांना उधाण झाले आहे.
  • निष्पक्ष न्यायाचा आग्रह धरणाऱ्या आणि परखड मतं व्यक्त करण्यासाठी प्रसिद्ध असलेले सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांचा कार्यकाळ येत्या काही दिवसांमध्ये संपत आहे.
  • त्यानंतर यू.यू. लळीत हे सरन्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतील.
  • त्यानंतर हे प्रकरण घटनापीठाकडे गेल्यास निकाल लागण्यास खूपच विलंब लागू शकतो.

निवडणूक आयोगाची मुदतही २३ ऑगस्टलाच संपतेय!!

  • दरम्यान शिंदे गट शिवसेनेवर हक्क सांगण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला होता.
  • त्यानंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट या दोघांनाही पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते.
  • तेव्हा शिवसेनेने तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याबद्दलच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती मिळवून घेतली होती.
  • उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ मागितला होता.
  • पण आयोगाने दोन आठवड्यांचाच वेळ दिला आहे.
  • ती मुदतही २३ ऑगस्टलाच संपत आहे.

शिवसेना नेमकी कोणाची?

  • यापूर्वी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी ३ ऑगस्ट रोजी पार पडली होती.
  • या सुनावणीत बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवरुन सुरु झालेली कायदेशीर लढाई थेट शिवसेना नेमकी कोणाची?
  • उद्धव ठाकरेंची की, शिंदे गटाची या प्रश्नापर्यंत येऊन पोहोचली होती.
  • यावर सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं नोंदवला.
  • पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय नको, असं सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं होतं.

सहा याचिका एकत्रितपणे घटनापीठाकडे सोपवल्या जातील!!

  • महाराष्ट्राचे सत्तासंघर्षासंदर्भात सर्वोच्च न्यायालयासमोर एकूण सहा याचिका आहेत.
  • सर्व सहा याचिका एकत्रित करून घटनापीठाकडे देण्यास कोणीही अद्यापपर्यंत विरोध दर्शविलेला नाही.
  • त्यामुळे सर्व सहा याचिका एकत्रितपणे घटनापीठाकडे सोपवल्या जातील, अशी शक्यताही नाकारता येत नाही.
  • त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल कोणाच्या बाजून लागणार हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे.

Tags: Cm Eknath ShindeMaharashtraMaharashtra Political CrisesShivsenaUddhav Thackerayमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षशिवसेना
Previous Post

#महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन: विधानपरिषद २२ ऑगस्ट २०२२

Next Post

सीबीआयचा ससेमिरा तरी अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदियांचं ‘आप’लं मिशन गुजरात सुरुच!

Next Post
Arvind Kejriwal, Manish Sisodia On Gujrat Visit

सीबीआयचा ससेमिरा तरी अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदियांचं 'आप'लं मिशन गुजरात सुरुच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!