Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सत्तेचा महासंघर्ष: पुढे आले महत्वाचे मुद्दे, शक्यता दीर्घ सुनावणी, युक्तिवादांची…निकाल लांबण्याची!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Shinde Eknath Shinde And Supreme Court

मुक्तपीठ टीम

महिनाभरापासून सुरु असलेल्या महाराष्ट्रातील सत्तेच्या महासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. संपूर्ण देशाचं या सुनावणीवर लक्ष लागून होतं. आता पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी होणार आहे. कायद्याच्या जाणकारांच्या मते हे प्रकरण आता सरन्यायाधीशांनी म्हटलं तसं घटनापीठाकडे जाऊ शकतं. तसंच समोर आलेले मुद्दे पाहता दीर्घ सुनावणी, मोठे युक्तिवाद होत निकाल लांबण्याची शक्यता आहे.

आजच्या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. शिंदे यांची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी लढवली. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसाठी हजर होते. तर उद्धव ठाकरे यांचा गटाची बाजू ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, डॉ. ए. एम. संघवी हे बाजू मांडत होते. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्टला पुढील सुनावणी होईल असं सांगितलं. तसेच शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाला २७ जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयात काय युक्तीवाद झाला?

  • हे संवेदनशील प्रकरण आहे.
  • त्यामुळे हे प्रकरण मोठ्या बेंचकडे जावं असेही मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलं होतं.
  • मात्र त्यात जास्त वेळ जाईल असा युक्तीवाद वकीलांकडून करण्यात आलाय.
  • या सुनावणीला दोन्ही बाजुने वकीलांची फौज उभी करण्यात आली होती.
  • सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एनव्ही रमना, जस्टिस कृष्ण मुरारी आणि हिमा कोहली यांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी पार पडली आहे.
  • एखाद्या गटाला नवा नेता मिळत असेल तर त्यात गैर काय असा युक्तीवाद शिंदे गटाकडून करण्यात आला.
  • तसेच आम्हाला कागदपत्रं सादर करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ द्या, अशीही मागणी शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी केला.
  • तर शिंदे हे पक्षप्रमुखासारखे कसं वागू शकतात? असा सवाल ठाकरेंच्या वकिलांकडून करण्यात आला.
  • तसेच पक्षाच्या बैठका घेण्याचा अधिकार हा शिंदेंना नाही, असाही युक्तीवाद करण्यात आला.

शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे शिवसेना गट आमने-सामने!!

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी त्यांची विधिमंडळ गटनेतेपदी केलेली निवड रद्द करुन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांची नियुक्ती केली आणि सुनील प्रभू यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केली.
  • त्याचबरोबर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी त्यांच्या गटातील आमदारांना दिलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.
  • तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्षांची निवड, बंडखोर आमदारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापनेची परवानगी देण्याचा राज्यपालांचा निर्णय, शिंदे सरकारचा बहुमताचा प्रस्ताव आदी बाबींना सर्वोच्च न्यायालयात तीन याचिकांद्वारे आव्हान दिलं आहे.
  • यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.

घटनापीठ नेमलं जाणार

  • सरन्यायाधीश रमणा यांनी आजच्या सुनावणीत समोर आलेले मुद्दे पाहून मोठ्या पीठाची आवश्यकता व्यक्त केली.
  • कायदेतज्ज्ञांच्या मते या प्रकरणांमध्ये जे घटनाविषयक मुद्दे पुढे आले आहेत, ते लोकशाही आणि घटनात्मक तरतुदींच्या दृष्टीने मोठा उहापोह अपेक्षित आहे.
  • त्यासाठी घटनापीठ आवश्यक आहे.
  • घटनापीठासमोर सर्व युक्तिवाद होणे, इतर बाबींच्या त्या संपूर्ण प्रक्रियेला खूप कालावधी लागू शकतो.
  • राम मंदिर प्रकरणासारखी जर खास बाब म्हणून नियमित सतत सुनावणी केली तर लवकर निर्णय अपेक्षित असू शकतो.

Tags: MaharashtraMaharashtra Political CrisisShivsenaUddhav Thackerayउद्धव ठाकरेमहाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदेशिवसेनासत्तेचा महासंघर्ष
Previous Post

मुंबई उपनगर जिल्ह्यातील विद्यमान मतदारांकडून आधारची माहिती १ ऑगस्ट २०२२ पासून संग्रहित करणार – जिल्हाधिकारी निधी चौधरी

Next Post

#मुक्तपीठ #LiVE “आमच्या बाजूने योग्य निर्णय येईल!” देवेंद्र फडणवीसांना आत्मविश्वास

Next Post
#मुक्तपीठ #LiVE “आमच्या बाजूने योग्य निर्णय येईल!” देवेंद्र फडणवीसांना आत्मविश्वास

#मुक्तपीठ #LiVE "आमच्या बाजूने योग्य निर्णय येईल!" देवेंद्र फडणवीसांना आत्मविश्वास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!