मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे औरंगाबाद येथील २ रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
- यामुळे राज्यात आतापर्यंत रिपोर्ट झालेल्या ओमायक्राँन रुग्णांची संख्या ११० झाली आहे.
अ.क्र. | जिल्हा /मनपा | आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण |
१ | मुंबई | ४६* |
२ | पिंपरी चिंचवड | १९ |
३ | पुणे ग्रामीण | १५ |
४ | पुणे मनपा | ७ |
५ | सातारा | ५ |
६ | उस्मानाबाद | ५ |
७ | कल्याण डोंबिवली | २ |
८ | नागपूर | २ |
९ | औरंगाबाद | २ |
१० | लातूर | १ |
११ | वसई विरार | १ |
१२ | नवी मुंबई | १ |
१३ | ठाणे मनपा | १ |
१४ | मीरा भाईदर | १ |
१५ | अहमदनगर | १ |
१६ | बुलढाणा | १ |
एकूण | ११० | |
*यातील २ रुग्ण कर्नाटक आणि केरळ तर प्रत्येकी १ रुग्ण छत्तीसगड, गुजरात, जळगाव, ठाणे आणि औरंगाबाद येथील आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. |
- यापैकी ५७ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आज आढळलेल्या २ ओमायक्रॉन रुग्णांची सर्वसाधारण माहिती –
- हे दोन्ही रुग्ण हे ५० आणि ३३ वर्षांचे पुरुष आहेत.
- यातील एकाने दुबई प्रवास केला आहे तर दुसरा एका आंतरराष्ट्रीय प्रवाशाचा निकटसहवासित आहे.
- या दोन्ही रुग्णांचे लसीकरण पूर्ण झालेले असून यातील एक लक्षणेविरहित आहे तर दुसऱ्याची लक्षणे सौम्य आहेत.
- दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
एकूण आलेले प्रवासी | आर टी पी सी आर केलेले प्रवासी | आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण | ||||||
अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण |
२४९२२ | १४५६६५ | १७०५८७ | २४९२२ | ७१६४ | ३२०८६ | १५३ | ५५ | २०८ |
या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ७२९ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी १६२ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.