Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मशिदींवरील भोंग्याबद्दल मुस्लिम समाजात जनजागरण! मौलवींशी संवाद साधणार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Loudspeaker

मुक्तपीठ टीम

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्यातून नमाजाविरोधातील इशाऱ्यानंतर महाराष्ट्र मुस्लिम काउंसिलने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात शांतता, सलोखा राखण्यासाठी मुस्लिम विचारवंतांनी अजान, लाऊडस्पीकरबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनांचं पालन करण्यासाठी प्रयत्न करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील बोरिबंदर येथील अंजुमन इस्लाम शाळेतील ग्रंथालयात यासाठी बैठक पार पडली.

 

सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणार!

  • या बैठकीत मुस्लिम समुदायातील विचारवंत, कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र मुस्लिम काउंसिलचे सदस्य उपस्थित होते.
  • आता महाराष्ट्र मुस्लिम काउंसिलचे कार्यकर्ते आणि या दरम्यान ते सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणार आहेत.
  • त्यानुसार, आवाजाची पातळी दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबल पातळी राखण्याची विनंती करणार असल्याची माहिती महाराष्ट्र मुस्लिम परिषदेचे प्रतिनिधी आणि शिक्षण तज्ज्ञ सलीम अल्वारे यांनी दिली.

 

राजकीय फायद्यासाठी एका समाजाला लक्ष्य केले जाऊ नये!

  • गेल्या चार-पाच वर्षांपासून आमचे सदस्य हे प्रश्न मांडत आहेत. मात्र कोणताही बदल दिसून आला नाही.
  • मात्र, सद्यस्थिती पाहून हा मुद्दा पुन्हा उचलून धरणार आहोत.
  • शहरात सुधारणा घडवून आणणे आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था राखणे हे सर्वांचे काम आहे.
  • राजकीय फायद्यासाठी एका समाजाला लक्ष्य केले जाऊ नये.
  • पण कायदा प्रत्येक समाजासाठी समान असला पाहिजे, अशी भूमिका अखिल भारतीय मिली काउंसिल ऑफ महाराष्ट्रचे सरचिटणीस एम.ए. खालिद यांनी व्यक्त केली.

 

राज ठाकरेंनी भडक वक्तव्यापेक्षा चर्चा केली असती तर बरं झालं असतं!

  • राज ठाकरे यांचा मुस्लिम समाजातील लोकांशी चांगला संपर्क होता.
  • एनआरसी आणि सीएए मुद्द्यावरून आम्ही त्यांना यापूर्वी दोनदा भेटलो होतो.
  • त्यांनी भडक वक्तव्य करण्यापेक्षा त्यावर बैठक बोलावून चर्चा केली असती तर बरे झाले असते असेही महाराष्ट्र मुस्लिम काउंसिलने म्हटले.
  • आमच्या कुराण आणि हदीसमध्ये मार्गदर्शक तत्त्वे आहेत, त्यानुसार सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.

Tags: Maharashtra Muslim CouncilmnsmuslimRaj Thackerayमनसेमहाराष्ट्रमहाराष्ट्र मुस्लिम काउंसिलराज ठाकरे
Previous Post

“संविधान सुरक्षित या भ्रमातून बाहेर पडा” : श्यामदादा गायकवाड

Next Post

चार राज्यांमधील पाच पोट निवडणुका, भाजपाचा कुठेही विजय नाही!

Next Post
ByPoll

चार राज्यांमधील पाच पोट निवडणुका, भाजपाचा कुठेही विजय नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!