Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी उमेदवार जाहीर, शिंदे, बावनकुळेंच्या उमेदवारीमुळे निष्ठावंतांना न्याय, हीच बातमी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
maharashtra mlc election candidates declares

मुक्तपीठ टीम

आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राज्यातील तीन प्रमुख पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि भाजपाने उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या सात मतदारसंघांतील आठ सदस्यांची मुदत १ जानेवारी रोजी संपत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. २३ नोव्हेंबरला अर्ज दाखल केले जातील. २४ नोव्हेंबरला अर्जांची छाननी होईल. अर्ज मागे घेण्याची मुदत २६ नोव्हेंबर असून, १० डिसेंबर रोजी मतदान आणि १४ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यातील बातमी एवढीच की बाहेरून आलेल्या किंवा थैलीशहा नेत्यांना प्राधान्य देतानाच शिवसेना आणि भाजपाने आपल्या पक्षाच्या निष्ठावंताची कदर केली आहे. शिवसेनेने आदित्य ठाकरेंसाठी मतदारसंघ सोडणाऱ्या सुनिल शिंदेंना मुंबई मनपासारखा सुरक्षित मतदारसंघ दिला आहे, तर भाजपाने चंद्रशेखर बावनकुळेंना उमेदवारी देऊन त्यांना विधानसभेची उमेदवारी नाकारून केलेल्या अन्यायाचं परिमार्जन करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

शिवसेना

  • शिवसेनेने विधान परिषदेच्या दोन जागांसाठी शिवसेनेने उमेदवारांची नावे जाही केली आहेत.
  • मुंबई महानगर पालिका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माजी आमदार सुनील शिंदे तर अकोला-बुलढाणा-वाशीम
  • मतदारसंघातून आमदार गोपिकिशन बाजोरिया यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
  • ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचा पत्त कट करण्यात आला आहे.
  • सुनील शिंदे हे वरळी मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार आहेत.
  • त्यांनी आदित्य ठाकरेंच्या पहिल्या वहिल्या निवडणुकीसाठी आपला सुरक्षित मतदारसंघ सोडला होता.
  • तर, अकोला-बुलढाणा-वाशिम मतदारसंघातून शिवसेनेने गोपीकिशन बाजोरिया यांना उमेदवारी दिली आहे.
  • या ठिकाणी त्यांची भाजपच्या वसंत खंडेलवाल यांच्याशी लढत होणार आहे.
  • ही लढत अत्यंत चुरशीची होणार असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

भाजपा

  • विधान परिषद निवडणुकीच्या ५ जागांसाठी काल भाजपानं उमेदवार यादी जाहीर केली आहे.
  • त्यात नागपूरमधून माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
  • चांगले मंत्री असणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानसभा निवडणुकीत भाजपाने उमेदवारी नाकारली होती.
  • त्याचा फटका भाजपाला विदर्भातील अनेक मतदारसंघांमध्ये बसला होता. त्यामुळे कुठेतरी बावनकुळेंच्या अन्यायानंतरही भाजपासाठी आक्रमक राहण्याच्या निष्ठेची कदर करण्यात आली आहे.
  • कोल्हापूर : अमल महाडिक
  • धुळे-नंदुरबार : अमरीश पटेल
  • अकोला-बुलडाणा-वाशिम : वसंत खंडेलवाल
  • मुंबई : राजहंस सिंह

 

काँग्रेस

  • नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री मुळक यांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आलं आहे.
  • भाई जगताप, काँग्रेस, मुंबई
  • सतेज पाटील , काँग्रेस, कोल्हापूर

Tags: BJPchandrashekhar bawankuleCongressShivsenaकाँग्रेसभाजपाविधान परिषदेच्या निवडणूकशिवसेना
Previous Post

सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीनंतर कृषी कायदे कोमात गेलेच होते…आता फक्त मृत्यूची घोषणा झाली!

Next Post

मुंबई महापालिकेतील ट्रेचिंग निविदेतील घोटाळ्याची चौकशी करा

Next Post
bmc

मुंबई महापालिकेतील ट्रेचिंग निविदेतील घोटाळ्याची चौकशी करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!