मुक्तपीठ टीम
आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राज्यातील तीन प्रमुख पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि भाजपाने उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या सात मतदारसंघांतील आठ सदस्यांची मुदत १ जानेवारी रोजी संपत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. २३ नोव्हेंबरला अर्ज दाखल केले जातील. २४ नोव्हेंबरला अर्जांची छाननी होईल. अर्ज मागे घेण्याची मुदत २६ नोव्हेंबर असून, १० डिसेंबर रोजी मतदान आणि १४ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यातील बातमी एवढीच की बाहेरून आलेल्या किंवा थैलीशहा नेत्यांना प्राधान्य देतानाच शिवसेना आणि भाजपाने आपल्या पक्षाच्या निष्ठावंताची कदर केली आहे. शिवसेनेने आदित्य ठाकरेंसाठी मतदारसंघ सोडणाऱ्या सुनिल शिंदेंना मुंबई मनपासारखा सुरक्षित मतदारसंघ दिला आहे, तर भाजपाने चंद्रशेखर बावनकुळेंना उमेदवारी देऊन त्यांना विधानसभेची उमेदवारी नाकारून केलेल्या अन्यायाचं परिमार्जन करण्याचा प्रयत्न केला आहे.
शिवसेना
- शिवसेनेने विधान परिषदेच्या दोन जागांसाठी शिवसेनेने उमेदवारांची नावे जाही केली आहेत.
- मुंबई महानगर पालिका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माजी आमदार सुनील शिंदे तर अकोला-बुलढाणा-वाशीम
- मतदारसंघातून आमदार गोपिकिशन बाजोरिया यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
- ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचा पत्त कट करण्यात आला आहे.
- सुनील शिंदे हे वरळी मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार आहेत.
- त्यांनी आदित्य ठाकरेंच्या पहिल्या वहिल्या निवडणुकीसाठी आपला सुरक्षित मतदारसंघ सोडला होता.
- तर, अकोला-बुलढाणा-वाशिम मतदारसंघातून शिवसेनेने गोपीकिशन बाजोरिया यांना उमेदवारी दिली आहे.
- या ठिकाणी त्यांची भाजपच्या वसंत खंडेलवाल यांच्याशी लढत होणार आहे.
- ही लढत अत्यंत चुरशीची होणार असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भाजपा
- विधान परिषद निवडणुकीच्या ५ जागांसाठी काल भाजपानं उमेदवार यादी जाहीर केली आहे.
- त्यात नागपूरमधून माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
- चांगले मंत्री असणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानसभा निवडणुकीत भाजपाने उमेदवारी नाकारली होती.
- त्याचा फटका भाजपाला विदर्भातील अनेक मतदारसंघांमध्ये बसला होता. त्यामुळे कुठेतरी बावनकुळेंच्या अन्यायानंतरही भाजपासाठी आक्रमक राहण्याच्या निष्ठेची कदर करण्यात आली आहे.
- कोल्हापूर : अमल महाडिक
- धुळे-नंदुरबार : अमरीश पटेल
- अकोला-बुलडाणा-वाशिम : वसंत खंडेलवाल
- मुंबई : राजहंस सिंह
काँग्रेस
- नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री मुळक यांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आलं आहे.
- भाई जगताप, काँग्रेस, मुंबई
- सतेज पाटील , काँग्रेस, कोल्हापूर