Wednesday, June 4, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना पूर्ण ‘डाऊन’ करण्यासाठी महाराष्ट्र पुन्हा ‘लॉक’

आता बाहेरून येणाऱ्यांसाठी कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक

May 13, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
corona (2)

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग कमी होत असला तरी काही जिल्ह्यांमध्ये अद्याप नियंत्रण मिळाले नसल्याने कडक निर्बंधाची मुदत १ जून सकाळी सातपर्यंत वाढवण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी तसे सुतोवाच केले होते. आज राज्य सरकारने परिपत्रकाद्वारे १ जून सकाळी सातपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आल्याचे अधिकृतरीत्या घोषित केले आहे. त्याचबरोबर मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. आता महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या बाहेरच्या प्रत्येक व्यक्तीकडे कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक आहे. तसेच तो रिपोर्ट महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी ४८ तासांमधील असणं आवश्यक आहे.

कोरोना निर्बंधामध्ये नवं काय?

  • ब्रेक द चेनचे निर्बंध १ जून सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असतील.
  • आता महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या बाहेरच्या प्रत्येक व्यक्तीकडे कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक आहे.
  • हा रिपोर्ट महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी ४८ तासांमधील असणं आवश्यक आहे.
  • दूधाचे संकलन, वाहतूक आणि प्रकिया यांना परवानगी असणार
  • दुधाच्या विक्रीला स्थानिक प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधांच्या मर्यादेत सूट असेल.
  • विमानतळ आणि बंदरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लोकल मेट्रो आणि मेट्रो प्रवासाची परवानगी.
  • परराज्यातून मालवाहूतक करणाऱ्यांसाठीही आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह असणे आवश्यक आहे, तो ७ दिवस ग्राह्य धरला जाणार आहे.
  • मालवाहतूक ट्रकमधून केवळ एक ड्रायव्हर आणि एका क्लिनरलाच महाराष्ट्रात प्रवेश अनुमती असणार आहे.
  • बाजारपेठामध्ये गर्दी वाढल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाने तो बंद करण्याचा निर्णय घ्यावा.
  • एखाद्या ठिकाणी निर्बंध वाढवायचे असल्यास स्थानिक प्रशासनाकडे हक्क देण्यात आले असून यासाठी निर्बंध लागू करण्याच्या ४८ तास आधी नोटीस द्यावी.

 

🚨Strict restrictions under #BreakTheChain extended till 1st June 2021🚨 pic.twitter.com/QxEmW77ZlV

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 13, 2021

 

महाराष्ट्रातील कोरोना निर्बंध

  • महाराष्ट्रातील कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी १४ एप्रिलपासून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
  • हे निर्बंध १ मेपर्यंत होते व नंतर १५ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
  • ही मुदत शनिवारी, ३१ मे रोजी संपत असल्याने त्यावर बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली.
  • कडक निर्बंधामुळे राज्यात कोरोनाची साथ नियंत्रणात आली असली तरी काही जिल्हयात बाधितांची संख्या तेवढी कमी झालेली नाही. त्यामुळे सध्याचे निर्बध आणखी १५ दिवस वाढविण्याची एकमुखी मागणी मुख्यमंत्र्यांकडे मंत्र्यांकडून करण्यात आली. त्यानुसार लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • केंद्रीय आरोग्य यंत्रणांकडून गेले काही दिवस सातत्यानं संसर्ग रोखण्यासाठी ल़कडाऊनची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ज्या राज्यांनी लॉकडाऊन टाळले होते, त्यांनीही आता लॉकडाऊन करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नियंत्रणात येत असलेल्या महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती.

Tags: cm uddhav thackeraylockdownMaharashtraRajesh Topeआरटीपीसीआर चाचणीआरोग्यमंत्री राजेश टोपेकोरोनामहाराष्ट्र
Previous Post

सत्तेचा माज कोरोनापेक्षाही भयंकर! कोणी डॉक्टरांना मारहाण करतो, तर कोणी ठेकेदार, अधिकाऱ्याला धमकावतो!

Next Post

आधीच लॉकडाऊननं आर्थिक टंचाई, त्यात अजित पवारांच्या प्रसिद्धीसाठी उधळपट्टीची घाई!

Next Post
ajit pawar

आधीच लॉकडाऊननं आर्थिक टंचाई, त्यात अजित पवारांच्या प्रसिद्धीसाठी उधळपट्टीची घाई!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!