Monday, March 9, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्र जीएसटीची कारवाई, १११ कोटींची करचुकवेगिरी, दोघांना सुरतमधून अटक

February 12, 2022
in घडलं-बिघडलं
0
Maharashtra GSt

मुक्तपीठ टीम 

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने सहा महिने विभागास गुंगारा देणाऱ्या जोडप्यास गुजरातमधील सुरत येथून गुरुवार, १० फेब्रुवारी, २०२२ रोजी दुपारी अटक केली. त्यांच्याकडून ४५० कोटी रुपयांहून अधिक रकमेची बनावट बिले जप्त करण्यात आली आहेत. मुंबई आणि सुरत शहर पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखा यांच्या भरीव सहकार्याने ही कारवाई पूर्ण करण्यात आली.
डॉल्फिन ओव्हरसीज (प्रोप्रायटरः प्रिमा म्हात्रे) आणि मे प्राईम ओव्हरसीन (प्रोप्रायटरः संजीव सिंग) या दोन कंपन्यांनी करचुकवेगिरी केल्याची गुप्त माहिती व्यापक सर्वसमावेशक विश्लेषण प्रणालीद्वारे अन्वेषण शाखेकडे प्राप्त झाली. महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये या कंपन्यांवर छापे टाकले असता पहिल्या दिवसापासून या दोन्ही कंपन्यांचे संचालक वैद्यकीय कारण देऊन चौकशीसाठी गैरहजर राहिले. त्यानंतर ते फरार झाले. विभागाच्या कोणत्याही नोटीसांना न जुमानता हे जोडपे महाराष्ट्राबाहेर पळून गेले. या जोडप्याने इतर व्यक्तिंच्या नावे बनावट कंपन्या काढून त्याद्वारे साधारण ४८२ कोटी रुपयांची बनावट बिले प्राप्त करून १११ कोटी रुपयांची करचुकवेगिरी केल्याचे तपासात स्पष्ट झाले.
प्रकरणाचे गांभीर्य पाहता महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने मुंबई पोलिसांच्या मदतीने व माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन या जोडप्याचा ठावठिकाणा शोधून काढला. महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाचे व मुंबई पोलिसांचे पथक सुरतला रवाना झाले. सुरत शहर पोलिसांच्या गुन्हा शाखेच्या मदतीने व मुंबई पोलीस दलातील माहिम पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने या जोडप्याला सुरत येथे ताब्यात घेतले गेले. सुरत येथून या जोडप्यास शुक्रवारी पहाटे मुंबई येथे आणले गेले.
 

मुंबई येथे न्यायालयापुढे हजर केले असता दोन्ही आरोपीना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण कारवाईचे नियोजन व अंमलबजावणी राज्यकर सहआयुक्त (अन्वेषण-ब) संपदा मेहता, राज्यकर उपआयुक्त विनोद देसाई, सहाय्यक राज्यकर आयुक्त ऋषिकेश वाघ, राज्यकर अधिकारी स्वाती शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी पार पाडली.
 

महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवाकर विभागाने परराज्यातून व इतक्या मोठ्या घोटाळ्यातील आरोपीस अटक करण्याची विभागाच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. भविष्यातही करचुकवेगिरी करणाऱ्या व्यक्तिंवर महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभाग, पोलीस प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येईल, असा संदेश करदात्यांस देण्यासही विभाग यशस्वी ठरला आहे


Previous Post

उद्योगपती राहुल बजाज यांचं निधन: उद्योग क्षेत्रातील ‘स्वाभिमानी’ पर्व हरपलं! उद्योगी धडाडी, ताठर बाणा!

Next Post

राज्यात नवे रुग्ण ४ हजार ३५९! १२ हजार ९८६ रुग्ण बरे!

Next Post
mcr maharashtra corona report

राज्यात नवे रुग्ण ४ हजार ३५९! १२ हजार ९८६ रुग्ण बरे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!