Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एन.डी.पाटील यांचं निधन: सामान्यांसाठी लढणारा लढवय्या नेता महाराष्ट्रानं गमावला!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
nd patil

मुक्तपीठ टीम

आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महादु:खाचा आहे. स्वत:साठी जगणारे खूप असतात. पण समाज, त्यातही सामान्यांसाठी जगणारे खूपच कमी असतात. अशांपैकीच एक असणाऱ्या एन. डी. पाटील यांचे निधन झाले आहे. सामान्यांसाठी लढणारा, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक उत्थानासाठी धडपडणारा लढवय्या नेता महाराष्ट्रानं आज गमावला आहे!

ज्येष्ठ विचारवंत आणि शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यपक एन.डी. पाटील यांचं निधन झालं आहे. ते ९३ वर्षांचे होते. कोल्हापुरात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरमधील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. शेतकरी, कामगारांच्या प्रश्नांसाठी ते जीवनभर लढले आहेत. त्यांच्या निधनाने कोल्हापूरासह अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

 

वातावरणात बदल झाल्याने त्यांना थोडी अस्वस्थता वाटत होती, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना कोरोनाची लागण झाली होती. परंतु या वयात देखील त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती.

 

डॉ. अशोक भूपाळींकडून सुरु होते उपचार

  • एन.डी. पाटील हे डॉ भूपाळींकडे ८ वर्ष उपचार घेत आहेत.
  • त्यांची एक किडनी काढण्यात आली होती.
  • त्यामुळे त्यांना कमालीची काळजी घ्यावी लागत असे.
  • ११ जानेवारीला त्यांचं बोलणं बंद झालं, त्याच दिवशी काही तपासणी करून त्यांना अ‌ॅडमिट केलं गेलं होतं.
  • ज्या अत्याधुनिक उपचारांन त्रास होईल असे उपचार करू नयेत अशी त्यांची इच्छा होती, त्यामुळे कोणतेही पुढील उपचार केले गेले नाहीत.
  • गेल्या चार दिवसांपासून पासून त्यांची शुद्ध हरपली होती.

 

संघर्षात कायम माईंची साथ!

  • एन. डी. पाटील यांना गेल्या वर्षी दुसऱ्या लाटेत कोरोना संसर्ग झाला होता.
  • त्यावेळी एन.डी. पाटील यांनी कोरोनावर मात केली होती.
  • कोरोनाची लागण झाल्यानंतर त्या परिस्थितीत एन. डी. पाटील यांची त्यांच्या पत्नी आणि शैक्षणिक क्षेत्रातील एक मोठं व्यक्तिमत्व, रयत शिक्षण संस्थेच्या सरोज पाटील यांनी घेतली.

Tags: KolhapurMaharashtraND PatilShekapएन. डी.पाटीलकोल्हापूरमहाराष्ट्रशेतकरी कामगार पक्ष
Previous Post

सारा “डेटा” मेंदूत ठेवायचा आणि तिथंच अपडेटही… भाजीवाल्या मावशींचं मॅनेजमेंट डॉ. गिरीश जाखोटिया यांच्या शब्दात

Next Post

जिल्हा बँक जिंकली, पण जामीनाच्या लढाईत पुन्हा हार! नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला!

Next Post
Nitesh Rane

जिल्हा बँक जिंकली, पण जामीनाच्या लढाईत पुन्हा हार! नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!