मुक्तपीठ टीम
अवघ्या महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातले कोरोनाचे सर्व निर्बंध एकमताने हटवण्यात आले आहेत. राज्यात गुढीपाडव्याला शोभायात्रा काढता येणार अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांनी ट्वीटद्वारे दिली आहे. तसेच आंबेडकर जयंती आणि रमजानमध्येही मिरवणुका काढता येणार आहेत.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधकारक नसणार आहे, असे आव्हाडांनी सांगितले. हे नियम शुक्रवारपासून लागू होणार आहेत. मार्च २०२० मध्ये घालण्यात आलेले निर्बंध हळू हळू शिथील कऱण्यात येत होते. मात्र आता दोन वर्षांनंतर निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. महाविकास आघाडी सरकारने हा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.
आज मंत्रीमंडळात कोरोना चे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले ……
गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा
रमजान उत्सहात साजरा करा
बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 31, 2022