मुक्तपीठ टीम
आरोग्य विभागाची २५ सप्टेंबर आणि २६ सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रात्री दिल्यानंतर महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी झोपू शकले नाहीत. परीक्षेच्या तयारीसाठी मागच्या अनेक रात्रींचे दिवस करणाऱ्या विद्यार्थ्यांची आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी माफी मागितली. पण त्यांची माफी ही काही कामाची नाही, असा संताप विद्यार्थी, त्यांच्या कुटुंबियांकडून व्यक्त होत आहे. लाखो विद्यार्थी परीक्षेच्या तयारीत असताना त्यांचे कष्ट, मेहनत वाया घालवणाऱ्या या निर्णयाचा निषेध करण्यात येत आहे.
नेमकं प्रकरण काय?
- शनिवार आणि रविवार राज्यात आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा घेतली जाणार होती.
- मात्र हॉल तिकीटच्या गोंधळामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली.
- गट-अ आणि गट-ब अशा ६२०५ जागा भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती.
- या जागा भरत असताना यासाठी परीक्षा घेण्याचे काम बाह्य संस्थेला देण्यात आले होते.
- या परीक्षेसाठी आठ लाख परीक्षार्थी बसले होते.
- विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देण्यात आले होते.
- मात्र न्यासा संस्थेने परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी आणखी थोडा कालावधी लागेल, असे कारण पुढे केल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आली.
- यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असे राजेश टोपे म्हणाले.
दरम्यान विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. तसेच आपल्याला याबाबतची विस्तृत माहिती संकेत स्थळावर मिळेल. त्याचप्रमाणे परीक्षेची सुधारित तारीख लवकरच जाहीर केली जाईल अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
अर्थात टोपेंनी काहीही सारवासारव केली असली तरी परीक्षेला बसलेल्या आठ लाख विद्यार्थ्यांचा संताप समाजमाध्यमावर भडकू लागला आहे.
समाज माध्यमावर आघाडीविरोधात संतापाचा उद्रेक
ट्वीट १
एसी मध्ये बसून निर्णय घेणाऱ्यांना काय समजणार हो आमचं दुःख…..😢
#आरोग्यभरती
एसी मध्ये बसून निर्णय घेणाऱ्यांना काय समजणार हो आमचं दुःख…..😢#आरोग्यभरती @CMOMaharashtra @rajeshtope11 @RRPSpeaks pic.twitter.com/iDF2YSdutq
— संतोष वसंतराव चव्हाण (@meSantoshChavan) September 25, 2021
ट्वीट २
#नोकरभरती म्हणजे राज्य सरकारचे महसुली उत्पन्न जाहीर करा… एवढीच अपेक्षा उरली महा भकास आघाडी सरकार कडून
#नोकरभरती म्हणजे राज्य सरकारचे महसुली उत्पन्न जाहीर करा… एवढीच अपेक्षा उरली महा भकास आघाडी सरकार कडून
— Prashant bhosale (@Prashan68876340) September 25, 2021
ट्वीट ३
खरच महाराष्ट्र विश्वासार्ह राज्य आहे का? महाराष्ट्रात खरच नियम आणि कायदे यांचे पालन होत का?याच उत्तर आज महाराष्ट्रात आरोग्य विभाग परीक्षेत दिसून आला. @rajeshtope11 यांनी विचार मंथन करावे.
खरच महाराष्ट्र विश्वासार्ह राज्य आहे का? महाराष्ट्रात खरच नियम आणि कायदे यांचे पालन होत का?याच उत्तर आज महाराष्ट्रात आरोग्य विभाग परीक्षेत दिसून आला. @rajeshtope11 यानी विचार मंथन करावे. #गलथान_कारभार @RealBacchuKadu @Kunal_R_Patil @TulsidasBhoite @CMOMaharashtra @uddhavthackeray pic.twitter.com/9robL5BMre
— Bhushan Khandekar(MAHA TAIT,) (@Bhushankhande1) September 25, 2021
ट्वीट ४
हे खरं झालं आता.. 2019 पासून परीक्षा होत नाहीत. झाल्या तर त्यात कित्येक घोटाळे.. सरकार चा नाकर्तेपणा प्रत्येक बाबतीत समोर येतोय..
हे खरं झालं आता.. 2019 पासून परीक्षा हाेत नाहीत.झाल्या तर त्यात कित्येक घाेटाळे.. सरकार चा नाकर्तेपणा प्रत्येक बाबतीत समाेर येताेय.. pic.twitter.com/7OGebcP0Qy
— Munde Aditi (@AditiMunde) September 25, 2021
ट्वीट ५
मित्र नगर-सातारा प्रवासात आहे…..कसा फिरणार माघारी….बाहेर पाऊस आहे🤔
मित्र नगर-सातारा प्रवासात आहे…..कसा फिरणार माघारी….बाहेर पाऊस आहे🤔
— Santosh Ghuge (@GhugeSantosh1) September 24, 2021
ट्वीट ६
ठाकरे सरकारला टाईमपास करायचा असेल तर “पोट ” निवडणूका काही काळाची गरज नाही. आरोग्य मंत्र्यांचे अवतार कार्य संपले असेल तर त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे.
ठाकरे सरकारला टाईमपास करायचा असेल तर “पोट ” निवडणूका काही काळाची गरज नाही. आरोग्य मंत्र्यांचे अवतार कार्य संपले असेल तर त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे.
— Datta Bilghe Kewat (@BilgheDatta) September 25, 2021
ट्वीट ७
आरोग्यमंत्री टोपेंनी हजारो बेरोजगार उमेदवारांना वेळेवर टोपी दिली।
#निषेध 🏴
आरोग्यमंत्री टोपेंनी हजारो बेरोजगार उमेदवारांना वेळेवर टोपी दिली।
#निषेध 🏴
— अनुराग गडेकर 💐🌿 (@AnuragGadekar) September 24, 2021