Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारताला रक्त साठ्यात आत्मनिर्भर करण्याचे राज्यपाल कोश्यारी यांचे आवाहन

April 9, 2022
in सरकारी बातम्या
0
Maharashtra Governor presents ‘Life Saver Awards’ to 35 Blood Donation organisations

मुक्तपीठ टीम

करोना महामारीच्या काळात भीतीमुळे लोकांनी रक्तदान कमी केले. आता करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे, मात्र रक्ताची आवश्यकता अधिक आहे. यास्तव रक्तदान क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांनी अधिकाधिक लोकांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित करून भारताला रक्त साठ्याच्या बाबतीत आत्मनिर्भर करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

गेल्या दोन वर्षांत रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील ३५ संस्थांना तसेच आरोग्यदूतांना राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे अलीकडेच ‘संवेदना आंतरराष्ट्रीय जीवन रक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

संवेदना पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन नॅशनल इंटिग्रेटेड फोरम ऑफ आर्टिस्ट्स अँड ऍक्टिविस्ट्स (निफा) या संस्थेने महाराष्ट्र आंत्रप्रेन्यूअर चेंबर या संस्थेच्या सहकार्याने केले होते.

कार्यक्रमाला निफाचे संस्थापक प्रितपाल  पनू , महाराष्ट्र आंत्रप्रेन्यूअर चेंबरचे अध्यक्ष अमेय पाटील, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.विनायक टेम्भूर्णीकर, डॉ.भारती मोटवानी, राज्य शासनाचे सहसचिव सतीश जोंधळे व पुरस्कार विजेत्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

देशातील  रक्तपुरवठ्याच्या कमतरतेचा उल्लेख करताना राज्यपाल म्हणाले की, रक्तदान क्षेत्रातील संस्थांनी मनःपूर्वक प्रयत्न केले, तर लोक रक्तदान करण्यास निश्चितपणे पुढे येतील. नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने (निमा) या संस्थेने तसेच संस्थेशी निगडीत आयुर्वेद डॉक्टरांनी रक्तदानाच्या बाबतीत राज्यात उत्कृष्ट काम केल्याचे राज्यपालांनी सांगितले.

 

८० कोटी युवक; रक्तदाते ४कोटी

भारताच्या ८० कोटी युवा लोकसंख्येपैकी केवळ ४ कोटी युवक स्वेच्छेने रक्तदान करतात. देशातील रक्तदानाची गरज १२ कोटी युनिट इतकी आहे त्यामुळे रक्तदानात देश स्वयंपूर्ण व्हावा व कुणीही रक्ताअभावी प्राण गमावणार नाही हे पाहणे गरजेचे असल्याचे ‘निफा’ या संस्थेचे संस्थापक प्रितपाल पनू यांनी सांगितले.

संवेदना मोहिमेअंतर्गत दि. २३ मार्च २०२१ रोजी शहीद दिनानिमित्त १४७६ ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये १ लाखाहून अधिक पिशव्या रक्त संकलित करण्यात आल्याची माहिती पनू यांनी दिली. त्याचबरोबर राज्यात ९७ शिबिरे झाली व ४१५० पिशव्या रक्त संकलन झाल्याचे अमेय पाटील यांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते ‘कृष्ण महिमा’ या गीता पठण व अर्थ निरूपण स्पर्धेतील विजेत्या इरावती वालावलकर, ओमिशा सिंह व आदित्य सुब्रमण्यम या लहान मुलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वंदेभारतम् स्पर्धेच्या विजेत्या चमूने गोंधळ नृत्याचे सादरीकरण केले.


Tags: bhagat singh koshyariblood donationIndiaनॅशनल इंटिग्रेटेड फोरम ऑफ आर्टिस्ट्स अँड ऍक्टिविस्ट्स (निफा)भारतराज्यपाल भगत सिंग कोश्यारीसंवेदना पुरस्कार
Previous Post

बूस्टर डोससाठी नव्या नोंदणीची गरज नाही! खासगी रुग्णालयांमध्ये ‘हे’ दर!

Next Post

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याच्या निषेधासाठी राष्ट्रवादीचे आंदोलन

Next Post
NCP's agitation against the attack on Sharad Pawar's house

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याच्या निषेधासाठी राष्ट्रवादीचे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!