Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अशोक सराफ यांनी नाट्य-सिने क्षेत्रात एव्हरेस्ट सर केले – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

September 14, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Maharashtra Governor inaugurates 55th Youth Festival_ felicitates Ashok Saraf on completion of 75 1

मुक्तपीठ टीम 

आपण हिमालयाच्या कुशीत जन्मलो. मात्र आपल्याला कला, साहित्य व संगीत शिकण्याचे भाग्य लाभले नाही. अशोक सराफ यांनी त्याउलट आपल्या कलेच्या जोरावर नाट्य – सिने क्षेत्रात एव्हरेस्ट सर केले, असे सांगताना युवकांनी कुठल्याही क्षेत्रात काम करावे परंतु अशोक सराफ यांच्याप्रमाणे निवडलेल्या क्षेत्रामध्ये उंची गाठण्याचा ध्यास घेतला पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.               

मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झालेल्या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते ५५ व्या युवा महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.             

यावेळी राज्यपालांच्या हस्ते वयाची ७५ वर्षे तसेच चित्रपट – रंगभूमीवरील ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता जोशी – सराफ यांचेसह सत्कार करण्यात आला.            

देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना अशोक सराफ वयाचा अमृत महोत्सव साजरा करीत आहेत. आगामी काळ देशासाठी तसेच अशोक सराफ यांचेसाठी देखील अमृत काळ ठरेल अशी आशा व्यक्त करताना युवकांनी अशोक सराफ यांच्या अद्भुत कार्यातून प्रेरणा घ्यावी असे आवाहन राज्यपालांनी केले.

लोकांचे प्रेम हीच ऊर्जा : अशोक सराफ            

Maharashtra Governor inaugurates 55th Youth Festival_ felicitates Ashok Saraf on completion of 75 2

मुंबई विद्यापीठाच्या वतीने राज्यपालांच्या हस्ते झालेल्या सत्कारामुळे आपण भारावलो. लोकांचे प्रेम हीच ऊर्जा आहे, असे सांगताना ‘तुम्ही लोकांनी मला इथपर्यंत आणून ठेवलं‘ अशी भावना सराफ यांनी यावेळी व्यक्त केली.               

कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता जोशी -सराफ, विविध विभागांचे अधिष्ठाता, शिक्षक तसेच युवा महोत्सवात सहभागी होणारे विद्यार्थी कलाकार उपस्थित होते. निलेश सावे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. सुनील पाटील यांनी आभारप्रदर्शन केले.


Tags: Ashok Sarafmaharashtra Governor Bhagat Singh Koshyariअशोक सराफनाट्य-सिने क्षेत्रराज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Previous Post

दात दुखतोय…असह्य वेदना…जाणून घ्या घरगुती उपाय!

Next Post

जैवविविधता विषयावर कायमस्वरुपी प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर येथे सुरु करणार – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

Next Post
महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाची पाचवी बैठक 1

जैवविविधता विषयावर कायमस्वरुपी प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर येथे सुरु करणार - वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!