मुक्तपीठ टीम
आज राज्यातील २० हजार ८५२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. तर त्याचवेळी १४,१५२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे दोन जिल्हे सोडून राज्याच्या सर्व विभागांमधील नव्या रुग्णांची संख्या गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी कमी झाली आहे. आजची एकूण रुग्णसंख्या १ हजार ७७ ने कमी आहे. त्याचवेळी गुरुवारी हजारावर असलेला नगर जिल्हा आज हजाराखाली गेला आहे. तर कोल्हापूर, सातारा आणि पुणे हे पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्हे आजही हजारावर आहे. त्यातही पुणे दोन महानगरे असूनही रुग्णसंख्येत खाली जात आहे. आज सर्वाधिक रुग्णसंख्या १,५५१ कोल्हापूर जिल्ह्यात तर ,सर्वात कमी १० मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात आहे.
कोरोना रुग्णसंख्येची ठळक माहिती
- आज २०,८५२ रुग्ण बरे होऊन घरी
- आज राज्यात १४,१५२ नवीन रुग्णांचे निदान.
- राज्यात आजपर्यंत एकूण ५५,०७,०५८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आज रोजी एकूण १,९६,८९४ सक्रिय रुग्ण आहेत.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.८६% एवढे झाले आहे.
- राज्यात आज २८९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण २८९ मृत्यूंपैकी १९३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ९६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.७% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,६०,३१,३९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,०५,५६५ (१६.११ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १४,७५,४७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७,४३० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
तीन जिल्ह्यांमध्ये हजारावर रुग्ण
- कोल्हापूर जिल्हा १५५१
- सातारा जिल्हा १५३७
- पुणे जिल्हा १४६४
एकूण रुग्ण ४ हजार ५५२
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०६,१११ (कालपेक्षा घट)
- महामुंबई ०२,८३९ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा घट)
- उ. महाराष्ट्र ०१,५१२ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा घट)
- विदर्भ ०१,५१० (कालपेक्षा घट)
- मराठवाडा ००,९२६ (कालपेक्षा घट)
- कोकण ०१,२५४ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा वाढ)
एकूण नवे रुग्ण १४ हजार १५२ (कालपेक्षा १,०७७ कमी)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात १४,१५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५८,०५,५६५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
१ मुंबई मनपा ९६८
२ ठाणे १४९
३ ठाणे मनपा १२९
४ नवी मुंबई मनपा ८९
५ कल्याण डोंबवली मनपा १५३
६ उल्हासनगर मनपा ४३
७ भिवंडी निजामपूर मनपा ८
८ मीरा भाईंदर मनपा ९३
९ पालघर २७९
१० वसईविरार मनपा १७१
११ रायगड ६१८
१२ पनवेल मनपा १३९
ठाणे मंडळ एकूण २८३९
१३ नाशिक ३६६
१४ नाशिक मनपा २४९
१५ मालेगाव मनपा ६
१६ अहमदनगर ६६३
१७ अहमदनगर मनपा ४२
१८ धुळे ३०
१९ धुळे मनपा १५
२० जळगाव ११९
२१ जळगाव मनपा ५
२२ नंदूरबार १७
नाशिक मंडळ एकूण १५१२
२३ पुणे ८३६
२४ पुणे मनपा ३७२
२५ पिंपरी चिंचवड मनपा २५६
२६ सोलापूर ५११
२७ सोलापूर मनपा ३७
२८ सातारा १५३७
पुणे मंडळ एकूण ३५४९
२९ कोल्हापूर ११५९
३० कोल्हापूर मनपा ३९२
३१ सांगली ७७८
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १३३
३३ सिंधुदुर्ग ६७०
३४ रत्नागिरी ६८४
कोल्हापूर मंडळ एकूण ३८१६
३५ औरंगाबाद १५२
३६ औरंगाबाद मनपा २०
३७ जालना ८२
३८ हिंगोली १०
३९ परभणी ३६
४० परभणी मनपा ११
औरंगाबाद मंडळ एकूण ३११
४१ लातूर ७२
४२ लातूर मनपा ८
४३ उस्मानाबाद २१९
४४ बीड २६९
४५ नांदेड ३०
४६ नांदेड मनपा १७
लातूर मंडळ एकूण ६१५
४७ अकोला १०६
४८ अकोला मनपा ६४
४९ अमरावती २०४
५० अमरावती मनपा ८५
५१ यवतमाळ २८८
५२ बुलढाणा ५५
५३ वाशिम ९१
अकोला मंडळ एकूण ८९३
५४ नागपूर ६४
५५ नागपूर मनपा १३७
५६ वर्धा ६१
५७ भंडारा ९०
५८ गोंदिया ६२
५९ चंद्रपूर ११२
६० चंद्रपूर मनपा ३७
६१ गडचिरोली ५४
नागपूर एकूण ६१७
एकूण १४ हजार १५२
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण २८९ मृत्यूंपैकी १९३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ९६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील ३८६ मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे तसेच आज राज्यातील ३१ मे २०२१ पर्यंतच्या मृत्यूंच्या रिकाँन्सीलीएशन प्रक्रियेत ७०२ मृत्यूंची वाढ झाल्याने राज्यातील एकूण मृत्यूची संख्या १०८८ ने वाढली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी ४ जून २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.