मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राताल कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येनं आज उसळी घेतल्याचे दिसले. गेल्या २४ तासातील नव्या रुग्णांची संख्या ९,८५५ आहे. मुंबईत ११२१ नवे रुग्ण सापडले. तर पुणे जिल्ह्यातील नव्या रुग्णांची संख्या (पुणे मनपा+पिंपरी चिंचवड मनपा+पुणे ग्रामीण) ही १६९६ झाली आहे. नागपूर शहर आणि जिल्ह्यात आज नवे ११८१ रुग्ण सापडले. नाशिकमधील रुग्णसंख्याही आज वाढली आहे.
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट : बुधवार, ३ मार्च २०२१
- आज राज्यात ९,८५५ नवीन रुग्णांचे निदान.
- राज्यात आज एकूण ८२,३४३ सक्रिय रुग्ण आहेत.
- आज ६,५५९ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण २०,४३,३४९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.७७% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ४२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.४० % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६५,०९,५०६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,७९,१८५ (१३.२० टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३,६०,५०० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,७०१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोना बाधित रुग्ण
आज राज्यात ९,८५५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २१,७९,१८५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई महानगरपालिका ११२१
२ ठाणे १०५
३ ठाणे मनपा २४१
४ नवी मुंबई मनपा १५९
५ कल्याण डोंबवली मनपा २४६
६ उल्हासनगर मनपा २३
७ भिवंडी निजामपूर मनपा २
८ मीरा भाईंदर मनपा ६७
९ पालघर १४
१० वसईविरार मनपा ५८
११ रायगड ६२
१२ पनवेल मनपा १११
१३ नाशिक १४७
१४ नाशिक मनपा ५९३
१५ मालेगाव मनपा १७
१६ अहमदनगर १४०
१७ अहमदनगर मनपा ६९
१८ धुळे ३०
१९ धुळे मनपा ८८
२० जळगाव २३५
२१ जळगाव मनपा १९८
२२ नंदूरबार १०८
२३ पुणे ३७८
२४ पुणे मनपा ८५७
२५ पिंपरी चिंचवड मनपा ४६१
२६ सोलापूर ७९
२७ सोलापूर मनपा ४५
२८ सातारा १२९
२९ कोल्हापूर ३४
३० कोल्हापूर मनपा ३
३१ सांगली १६
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १४
३३ सिंधुदुर्ग ६
३४ रत्नागिरी ३३
३५ औरंगाबाद ६९
३६ औरंगाबाद मनपा ४४९
३७ जालना ४६
३८ हिंगोली ५६
३९ परभणी २९
४० परभणी मनपा ६७२
४१ लातूर २३
४२ लातूर मनपा २८
४३ उस्मानाबाद ३२
४४ बीड ८३
४५ नांदेड ३५
४६ नांदेड मनपा ३५
४७ अकोला २०५
४८ अकोला मनपा २३४
४९ अमरावती १७८
५० अमरावती मनपा ४८३
५१ यवतमाळ २१८
५२ बुलढाणा १९७
५३ वाशिम १४२
५४ नागपूर २५७
५५ नागपूर मनपा ९२४
५६ वर्धा १०६
५७ भंडारा २५
५८ गोंदिया २५
५९ चंद्रपूर २४
६० चंद्रपूर मनपा ३०
६१ गडचिरोली १०
इतर राज्ये /देश ०
एकूण ९८५५
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ४२ मृत्यूंपैकी ३२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३ मृत्यू नागपूर-२ आणि उस्मानाबाद-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
(ही बातमी राज्याच्या आरोग्य विभागाच्या ३ मार्च २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)