Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“कोरोनाचा समर्थपणे मुकाबला करीत असताना देखील महाराष्ट्रात विकासकामे वेगाने सुरु”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
uddhav_thackeray

मुक्तपीठ टीम

 

“कोरोनाविरुद्धच्या कठीण लढ्याला महाराष्ट्र समर्थपणे सामोरे जात असतांना विकास कामांना देखील वेग दिला असून आरोप- प्रत्यारोप बाजूला ठेऊन महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी एकत्र येऊया”, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

 

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला विधानसभेमध्ये उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. महाराष्ट्र सीमाप्रश्न, त्याचप्रमाणे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठीही केंद्र शासनाकडे सर्वांनी एक होत मागणी करण्याचे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.

कोरोनाविरुद्धचा लढा सुरूच

कोरोनाची आपत्ती नवी असल्यामुळे आपल्या यंत्रणांना सज्ज करण्याचे मोठे आव्हान होते. रुग्णांच्या प्रमाणात सुरूवातील यंत्रणा कमी होती त्यात वाढ करत गेलो. देशातील पहिले जम्‍बो कोविड रुग्णालय आपण सुरू केले. रुग्ण आल्यानंतर स्वॅब घेतल्यानंतर कोरोना चाचणी येईपर्यंत मृत्यू व्हायचा. परंतू आपण रुग्णसंख्येची वा कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची कोणतीही माहिती पारदर्शीपणे दिली. माहिती लपवली नाही त्यामुळे ती संख्या जास्त दिसते आहे. पण त्यामुळे आपल्याला कोरोनाविरुद्धच्या उपाययोजना प्रभावीपणे करता आल्या. कोरोना तपासणीपैकी ८० टक्के चाचण्या आरटीपीसीआर चाचण्या होतात.

 

Maharashtra State Legislative Assembly | Budget Session 2021 | Day 3 https://t.co/GZmKeRNei7

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 3, 2021

 

कोरोनासाठी प्रत्येक जिल्ह्यात टास्कफोर्स निर्माण केला. खाजगी रुग्णालयात ८० टक्के खाटा राखीव ठेवल्या; ५ लाख ६० हजार लोकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ दिला.

 

कोरोनाचे संकट आले त्यावेळी दोन किंवा तीन चाचणी लॅब होत्या. आज ही संख्या शासकीय आणि खासगी मिळून ५०० च्या आसपास आहे. एकट्या मुंबईत २० ते २५ हजार चाचण्या होत आहेत हे आपले मोठे यश आहे.

 

मूत्रपिंडाचे विकार असलेल्या रुग्णांसाठी डायलिसीसचे काय करायचे हा मोठा प्रश्न होता. रुग्ण ‘कोविड’ आहे की ‘नॉनकोविड’ हे आधी पहायची गरज होती. अशा परिस्थितीत डायलिसीससाठी १५० च्या आसपास सुविधा उपलब्ध करून दिल्या.

 

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत महसूल, आरोग्य विभागाचे कर्मचारी राज्यात घरोघरी गेले. यामुळे सहव्याधी असलेले रुग्ण लक्षात आले. संसर्गाची साखळी तोडण्याठी लॉकडाऊन हा प्रभावी उपाय आहे. पण ते करण्याची आमची इच्छा नाही. कोरोनावर आपण नियंत्रण मिळवत आहोत असे वाटत असतानाच आता पुन्हा कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. त्यासाठी सर्वांनी जबाबदारीने काम केले पाहिजे. ‘मी जबाबदार’ मोहीम त्यासाठीच सुरू केली आहे.

 

कोरोना कालवधीमध्ये फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला. काय करावे काय करू नये हे सांगितले. त्यामुळे महाराष्ट्राची जनता मला त्यांच्या परिवारातील एक मानू लागले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

शिवभोजन – पोट भरणारी योजना

“गोरगरिबांना केवळ ५ रुपयात थाळी देण्याची ‘शिवभोजन योजना’ सुरू केली. ती अजूनही सुरू आहे. ही योजना गोरगरीब जनतेचे पोट भरणारी योजना आहे. मी माझ्या राज्याशी बांधील असून जनतेची काळजी घेणे माझे कर्तव्य आहे”, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

 

कोरोनापासून बचावासाठी त्रिसूत्री आवश्यकच

लॉकडाऊन टाळायचे असेल तर मास्क वापरा, हात धुवा आणि शारीरिक अंतर ठेवा या त्रिसुत्रीचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोनाविरुद्धची लस घेतली तरीही त्रिसूत्रीचे पालन आवश्यक आहे.

 

कोरोना लसीकरण गतीने व्हावे यासाठी लसीकरण केंद्रे मोजकी न ठेवता ज्यांची क्षमता आहे अशा खासगी रुग्णालयांनाही परवानगी देण्याची मागणी आपण केंद्र शासनाकडे केली. त्यानुसार मुंबईत २९ रुग्णालयांना मान्यता मिळाली असून राज्यातही अशी व्यवस्था करण्यात येईल.

हमीच नाही तर हमखास भाव

पुढच्या वर्षी बाजारपेठेत कोणत्या पिकाला मागणी असेल ते विचारात घेऊन दर्जेदार उत्पादन आणि हमी भावच नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे यासाठी ‘विकेल ते पिकेल’ ही योजना सुरू केली आहे. त्यासाठी मार्केटचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे.

 

शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सौर कृषी वीज पंपाची योजना मोठ्या प्रमाणात राबवणार आहोत असेही त्यांनी सांगितले.

 

पुढील ५० वर्षांचा विचार केल्यास कांजूरमार्गची जागा मेट्रो कारशेडसाठी फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे या जागेबाबत सर्वांनी एकत्र येऊन मार्ग काढूया असे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

 

महाराष्ट्रामध्ये उद्योगांकडून थेट गुंतवणूक होते. त्यामुळे उद्योगांतील गुंतवणुकीत महाराष्ट्र नक्कीच आघाडीवर आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

 

 


Tags: CM Udhav thackerayCMO Maharashtraमुख्यमंत्री उद्धव ठाकरेविधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन
Previous Post

“मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडणार”

Next Post

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट : नवे रुग्ण दहा हजाराजवळ, पुणे दीड हजारावर, मुंबई, नागपूर हजारावर

Next Post
Corona Covid

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट : नवे रुग्ण दहा हजाराजवळ, पुणे दीड हजारावर, मुंबई, नागपूर हजारावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!