मुक्तपीठ टीम
- आज राज्यात २,१७२ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १०९८ रुग्ण बरे होऊन घरी
- आज राज्यात एकाही नवीन ओमायक्रॉन रुग्णाचे निदान झालेले नाही.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६५,०४,८३१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.६५% एवढे झाले आहे.
- राज्यात आज २२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,८६,४५,५१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,६१,४८६ (९.७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १,११,२३२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९१० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ११,४९२ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉनबाधितांबद्दलची माहिती
- आज राज्यात एकही नवीन ओमायक्रॉन रुग्ण आढळलेला नाही.
- आजपर्यंत राज्यात एकूण १६७ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत
अ.क्र. | जिल्हा /मनपा | आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण |
१ | मुंबई | ८४* |
२ | पिंपरी चिंचवड | १९ |
३ | पुणे ग्रामीण | १७ |
४ | पुणे मनपा, ठाणे मनपा | प्रत्येकी ७ |
५ | सातारा, उस्मानाबाद, पनवेल मनपा | प्रत्येकी ५ |
६ | नागपूर | ३ |
७ | कल्याण डोंबिवली, औरंगाबाद, नादेड | प्रत्येकी २ |
८ | बुलढाणा, लातूर, अहमदनगर, अकोला. वसई विरार, नवी मुंबई , मीरा भाईंदर, पालघर, भिवडी निजापुर मनपा | प्रत्येकी १ |
एकूण | १६७ | |
*यातील ४ रुग्ण गुजरात, ३ रुग्ण कर्नाटक, २ रुग्ण केरळ आणि दिल्ली येथील तर प्रत्येकी १ रुग्ण छत्तीसगड, उत्तर प्रदेश, जळगाव, ठाणे, नवी मुंबई आणि औरंगाबाद येथील आहेत तर २ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. |
यापैकी ९१ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
एकूण आलेले प्रवासी | आर टी पी सी आर केलेले प्रवासी | आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण | ||||||
अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण |
२७४३८ | १६२१११ | १८९५४९ | २७४३८ | ९१६७ | ३६६०५ | २०४ | ८१ | २८५ |
या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ७८६ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी १४१ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
करोना बाधित रुग्ण –
आज राज्यात २,१७२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,६१,४८६ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई महानगरपालिका १३३३
- ठाणे ३३
- ठाणे मनपा ७६
- नवी मुंबई मनपा ९६
- कल्याण डोंबवली मनपा ३२
- उल्हासनगर मनपा १
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा ३३
- पालघर २
- वसईविरार मनपा २६
- रायगड १८
- पनवेल मनपा २९
- ठाणे मंडळ एकूण १६८०
- नाशिक १२
- नाशिक मनपा ३४
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर १२
- अहमदनगर मनपा ४
- धुळे ०
- धुळे मनपा १
- जळगाव २
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार २
- नाशिक मंडळ एकूण ६७
- पुणे ५१
- पुणे मनपा १७५
- पिंपरी चिंचवड मनपा ५७
- सोलापूर ११
- सोलापूर मनपा १
- सातारा १३
- पुणे मंडळ एकूण ३०८
- कोल्हापूर ५
- कोल्हापूर मनपा ९
- सांगली ८
- सांगली मिरज कुपवाड मनपा ११
- सिंधुदुर्ग ०
- रत्नागिरी ४
- कोल्हापूर मंडळ एकूण ३७
- औरंगाबाद ०
- औरंगाबाद मनपा ५
- जालना १
- हिंगोली ०
- परभणी ३
- परभणी मनपा १
- औरंगाबाद मंडळ एकूण १०
- लातूर १
- लातूर मनपा ४
- उस्मानाबाद १
- बीड १०
- नांदेड ०
- नांदेड मनपा ०
- लातूर मंडळ एकूण १६
- अकोला ०
- अकोला मनपा ३
- अमरावती ०
- अमरावती मनपा ०
- यवतमाळ ०
- बुलढाणा २
- वाशिम १
- अकोला मंडळ एकूण ६
- नागपूर ३
- नागपूर मनपा ४१
- वर्धा १
- भंडारा १
- गोंदिया १
- चंद्रपूर ०
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली १
- नागपूर एकूण ४८
एकूण २१७२
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २८ डिसेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.