मुक्तपीठ टीम
आजचा दिवस महाराष्ट्रासाठी दिलासा देणारा ठरला. दिवसभरात कोरोना निदान झालेले २१ हजार २७३ नवे रुग्ण आढळले. तर ३४ हजार ३७० रुग्ण बरे होऊन घरी परतले. विशेष म्हणजे राज्यातील सर्वच विभागांमध्ये नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येची ठळक माहिती
- आज राज्यात २१,२७३ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ३४,३७० रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ५२,७६,२०३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.०२% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ४२५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- राज्यात आज एकूण ३,०१,०४१ सक्रिय रुग्ण आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.६३% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,४०,८६,११० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६,७२,१८० (१६.६४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २२,१८,२७८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- १९,९९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०९,०५५ (कालपेक्षा घट)
- विदर्भ ०३,१३२ (कालपेक्षा घट)
- महामुंबई ०३,२६५ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा घट)
- उ. महाराष्ट्र ०२,७९८ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा घट)
- मराठवाडा ०२,०७४ (कालपेक्षा घट)
- कोकण ००,९४९ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा घट)
एकूण नवे रुग्ण २१ हजार २७३ (बुधवारपेक्षा ३ हजार ४७९ कमी)
महानगर आणि जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण –
आज राज्यात २१,२७३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५६,७२,१८० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई महानगरपालिका १२५८
२ ठाणे २०६
३ ठाणे मनपा १५८
४ नवी मुंबई मनपा १०५
५ कल्याण डोंबवली मनपा २०५
६ उल्हासनगर मनपा ५१
७ भिवंडी निजामपूर मनपा ७
८ मीरा भाईंदर मनपा १३८
९ पालघर ३२६
१० वसईविरार मनपा २०१
११ रायगड ४६६
१२ पनवेल मनपा १४४
ठाणे मंडळ एकूण ३२६५
१३ नाशिक ६७९
१४ नाशिक मनपा ३५५
१५ मालेगाव मनपा १८
१६ अहमदनगर १४०६
१७ अहमदनगर मनपा १०१
१८ धुळे ४१
१९ धुळे मनपा १७
२० जळगाव ११२
२१ जळगाव मनपा २९
२२ नंदूरबार ४०
नाशिक मंडळ एकूण २७९८
२३ पुणे १२८७
२४ पुणे मनपा ६३७
२५ पिंपरी चिंचवड मनपा ३८५
२६ सोलापूर ९३१
२७ सोलापूर मनपा ४७
२८ सातारा २५६१
पुणे मंडळ एकूण ५८४८
२९ कोल्हापूर १३२६
३० कोल्हापूर मनपा ५५४
३१ सांगली ११६७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १६०
३३ सिंधुदुर्ग ५१२
३४ रत्नागिरी ४३७
कोल्हापूर मंडळ एकूण ४१५६
३५ औरंगाबाद २६६
३६ औरंगाबाद मनपा १२१
३७ जालना १००
३८ हिंगोली ४७
३९ परभणी १६१
४० परभणी मनपा ६४
औरंगाबाद मंडळ एकूण ७५९
४१ लातूर १५५
४२ लातूर मनपा २८
४३ उस्मानाबाद ४५६
४४ बीड ५९६
४५ नांदेड ४४
४६ नांदेड मनपा ३६
लातूर मंडळ एकूण १३१५
४७ अकोला २१७
४८ अकोला मनपा १४८
४९ अमरावती ४१२
५० अमरावती मनपा ९५
५१ यवतमाळ ३६५
५२ बुलढाणा ५५९
५३ वाशिम ३१५
अकोला मंडळ एकूण २१११
५४ नागपूर १८८
५५ नागपूर मनपा २६३
५६ वर्धा १६४
५७ भंडारा ६५
५८ गोंदिया ४७
५९ चंद्रपूर १६३
६० चंद्रपूर मनपा ५४
६१ गडचिरोली ७७
नागपूर एकूण १०२१
एकूण २१२७३
(टीप– आज नोंद झालेल्या एकूण ४२५ मृत्यूंपैकी २६७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १५८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ४५९ ने वाढली आहे. हे ४५९ मृत्यू, पुणे– १०३, वर्धा– ५६, ठाणे– ५५, रत्नागिरी– ३९, नागपूर– ३५, भंडारा– २८, अहमदनगर– २७, सातारा– २२, सांगली– २१, सोलापूर– १८, नाशिक– १२, वाशिम– ८, बीड– ७, कोल्हापूर– ५, बुलढाणा– ४, नांदेड– ४, रायगड– ४, नंदूरबार– ३, चंद्रपूर– २, लातूर– २, यवतमाळ– २, पालघर– १ आणि परभणी– १असे आहेत.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २७ मे २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.