Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डीआरडीओच्या २-डिऑक्‍झी-डी-ग्लुकोज औषधाबद्दल सर्व काही

May 27, 2021
in featured, आरोग्य
0
DRDO

डॉ. राहुल पंडित

कोरोना साथीविरोधातील आपल्या लढ्याला आणखी एक शस्त्र देण्यासाठी भारत सरकारने २-डिऑक्‍झी-डी-ग्लुकोज (२-डीजी) नावाचे एक प्रभावी कोविडविरोधी औषध आणले आहे. इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लीयर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस (आयएनएमएएस) या संरक्षण संशोधन व विकास संस्था अर्थात डीआरडीओच्या प्रयोगशाळेने हैदराबादच्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या सहयोगाने हे औषध विकसित केले आहे. मध्यम ते तीव्र स्वरूपाचा कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये आपत्कालीन स्थितीत अनुयोगी (अॅडजंक्ट) उपचार म्हणून या औषधाचा उपयोग करण्यास भारतीय औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) या महिन्याच्या सुरुवातीला मंजुरी दिली आहे.

 

२-डिऑक्झी-डी-ग्लुकोज (२-डीजी) नेमके काय आहे?

२-डिऑक्झी-डी-ग्लुकोज या औषधाच्या चाचण्या कॅन्सरवर उपचाराच्या दृष्टीने पूर्वीपासून सुरू आहेत पण आत्तापर्यंत या औषधाला मंजुरी मिळालेली नव्हती. मात्र, कोरोना आजारावर हे औषध प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले. हे औषध पावडर स्वरूपात सॅशेमध्ये उपलब्ध होते आणि ही पावडर पाण्यात विरघळवून तोंडावाटे रुग्णाला दिली जाते. विषाणू-प्रभावीत पेशींमध्ये हे औषध साचते आणि व्हायरल सिंथेसिस (विषाणू संश्लेषण) व ऊर्जा निर्मिती थांबवून विषाणूच्या वाढीला आळा घालते. प्रादुर्भावित पेशींमध्येच साचून राहण्याच्या वैशिष्ट्यामुळे हे औषध अनन्यसाधारण ठरते. डीआरडीओमधील न्युक्लीयर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस (आयएनएमएएस) ही लॅब हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या (डीआरएल) सहयोगाने, कॅन्सरवरील रेडिएशन थेरपीसंदर्भात, या औषधाचा अभ्यास करत आहे.

 

या औषधाच्या मूलभूत यंत्रणेमध्ये ग्लायकोसिस प्रतिबंधित करण्याचा किंवा पेशी ऊर्जानिर्मितीसाठी ग्लुकोजचे विभाजन करण्यासाठी जे मार्ग वापरतात त्यापैकी एखादा मार्ग प्रतिबंधित करण्याचा समावेश होतो. कॅन्सरच्या पेशींद्वारे होणारी ऊर्जानिर्मिती थांबवून त्यांना नष्ट करण्यासाठी वापरली जाणारी ही पद्धत प्रतिकृती र्निमितीसाठी ग्लायकोसिसवर अवलंबून असलेल्या विषाणूग्रस्त पेशींबाबतही वापरली जाऊ शकते. भारतात कोविड साथीचा उद्रेक झाला तेव्हा, डीआरडीओची आयएनएमएएस आणि डीआरएल यांनी हे औषध कोरोना बरा करण्यासाठी वापरले जाऊ शकते का याची शक्यता तपासून बघण्यावर लक्ष केंद्रित केले. हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलेक्युलर बायोलॉजीमध्ये गेल्या वर्षी झालेल्या चाचण्यांत असे आढळून आले की, हे औषध विषाणूग्रस्त पेशींना नष्ट करत आहे. त्यानंतरच्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकांवर याच्या चाचण्या घेण्यात आल्या.

२-डिऑक्‍झी-डी-ग्लुकोज औषधाची क्लिनिकल ट्रायल

क्लिनिकल पुरावा व परिणामकारकतेविषयी माहिती गोळा करणे. एप्रिल २०२० मध्ये, आयएनएमएएसने सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलेक्युलर बायोलॉजीच्या (सीसीएमबी) मदतीने हैदराबादमध्ये प्रायोगिक परीक्षण सुरू केले. त्यानंतर मे २०२० मध्ये, सेंट्रल ड्रग स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) आणि भारतीय औषध महानियंत्रक (डीसीजीआय) यांनी संयुक्तपणे फेज-२ चाचण्यांसाठी, परवानगी दिली. मे ते ऑक्टोबर २०२० या काळात कोरोना रुग्ण या औषधाला कसा प्रतिसाद देत आहेत याच्या प्रारंभिक चाचण्या इन्स्टिट्यूटने सुरू केल्या. या औषधाचा उत्तम परिणाम दिसून आला, कोणतेही साइड-इफेक्ट्स दिसून आले नाहीत आणि रुग्ण जलदगतीने बरे झाले. त्यानंतर नोव्हेंबर २०२० ते मार्च २०२१ या काळात दिल्ली, उत्तरप्रदेश, बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटकात चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यांतून अनुकूल निष्पत्ती प्राप्त झाली.

 

परिणामकारकतेचा मुद्दा: क्लिनिकल ट्रायल्सच्या निष्पत्तीतून असे दिसून आले की, रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण जलदगतीने बरे होण्यात हा रेणू उपयुक्त ठरतो तसेच यामुळे रुग्णाचे पूरक ऑक्सिजनवरील अवलंबित्वही कमी होते. कोरोना बाधित झालेल्या रुग्णांसाठी हे औषध खूपच गुणकारी ठरेल असे यातून स्पष्ट झाले. परिणामकारकतेबद्दलच्या क्लिनिकल डेटानुसार, २-डीजी औषध देण्यात आलेल्या रुग्णांमधील आजाराची लक्षणे, विविध एण्डपॉइंट्सवर, स्टॅण्डर्ड ऑफ केअरच्या (एसओसी) तुलनेत जलदगतीने नाहीशी झाली. एसओसीच्या तुलनेत हे औषध दिलेल्या बहुसंख्य रुग्णांची (४२ टक्के विरुद्ध ३१ टक्के) लक्षणे वेगाने कमी झाली आणि तिसऱ्या दिवसापर्यंत हे रुग्ण पूरक ऑक्सिजनवरील अवलंबित्वापासून मुक्त झाले. याचा अर्थ हे औषध ऑक्सिजन थेरपीची गरज किंवा त्यावरील अवलंबित्व जलदगतीने कमी करत आहे.

जबाबदारीने वापर

आपला देश कोरोनाच्या विध्वंसक ठरलेल्या दुसऱ्या लाटेचा परिणाम कमी करण्यासाठी झगडत असतानाच या औषधाला मंजुरी मिळून ते उपलब्ध झाले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आपली संरचना व संसाधने यांच्यावर प्रचंड ताण आलेला आहे, या दोन्ही बाबी कमाल मर्यादेपर्यंत ताणल्या गेल्या आहेत. मी याकडे कोरोनावर उपचार करण्‍यासाठी आमच्‍या हातात असलेले आणखी एक औषध म्‍हणून पाहत आहे. अर्थात हे औषध खबरदारी पाळून घेतले जाणे अत्यावश्यक आहे. कोरोना आजारावरील कोणतेही औषध डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय घेतले जाऊ नये. याशिवाय औषधाचा साठा करून ठेवणे हा गुन्हा आहे. या औषधाची ज्यांना गरज आहे, त्यांना ते उपलब्ध झाले पाहिजे याची काळजी देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपण घेतलीच पाहिजे.

 

Dr. rahul pandit

(डॉ. राहुल पंडित, संचालक- क्रिटिकल केअर, फोर्टिस हॉस्पिटल्स, मुंबई तसेच महाराष्ट्राच्या कोरोना टास्कफोर्सचे सदस्य)


Tags: २-डिऑक्‍झी-डी-ग्लुकोजDRDO 2DGdrdo corona medicineडॉ.राहुल पंडित
Previous Post

“कोरोना संकटकाळात महिला बचतगटांची ६० कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल”

Next Post

आज राज्यात सर्वच विभागांमध्ये नवे रुग्ण घटले, ३४ हजार घरी परतले!

Next Post
MCR 1-5-21

आज राज्यात सर्वच विभागांमध्ये नवे रुग्ण घटले, ३४ हजार घरी परतले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!