मुक्तपीठ टीम
मुंबई आणि महाराष्ट्रात आज एका दिवसातील सर्वाधिक कोरोना रुग्णांचे निदान झाले. राज्यात आज ३१ हजार ८५५ नवे कोरोना रुग्ण सापडले. त्यात मुंबईत तर एका दिवसात ५ हजार १९० रुग्ण सापडले. कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून आजवर एकाच दिवसात सर्वात जास्त रुग्णांचे हा आकडे आहेत. मात्र, मुंबईतील चाचण्यांची संख्या वाढवल्याने नव्या रुग्णांचा आकडा वाढल्याची माहिती मुंबई मनपाने दिली आहे. पुणे शहरात साडे तीन हजार, तर जिल्हा पाच हजारावर, नागपुरातही तीन हजारावर नवे रुग्ण आज सापडले.
कोरोना आकड्यांमध्ये
- आज राज्यात ३१,८५५ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १५,०९८ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण २२,६२,५९३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात सध्या एकूण २,४७,२९९ सक्रिय रुग्ण आहेत.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८८.२१ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज ९५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण ९५ मृत्यूंपैकी ५५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८७,२५,३०७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २५,६४,८८१ (१३.७० टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १२,६८,०९४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १३,४९९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज कुठे किती रुग्ण?
आज राज्यात ३१,८५५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २५,६४,८८१ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ५१९०
- ठाणे ४६४
- ठाणे मनपा ८२७
- नवी मुंबई मनपा ५६६
- कल्याण डोंबवली मनपा ९२९
- उल्हासनगर मनपा ७०
- भिवंडी निजामपूर मनपा ४४
- मीरा भाईंदर मनपा १८९
- पालघर ११०
- वसईविरार मनपा २१२
- रायगड २३०
- पनवेल मनपा ३१६
- नाशिक ७६१
- नाशिक मनपा ८५९
- मालेगाव मनपा ७३
- अहमदनगर ४०९
- अहमदनगर मनपा १८५
- धुळे १९७
- धुळे मनपा २१२
- जळगाव ७२५
- जळगाव मनपा १९०
- नंदूरबार ४९८
- पुणे १३६०
- पुणे मनपा ३५६६
- पिंपरी चिंचवड मनपा १८२८
- सोलापूर २४९
- सोलापूर मनपा २७१
- सातारा २८८
- पुणे मंडळ एकूण ७५६२
- कोल्हापूर ३५
- कोल्हापूर मनपा २२
- सांगली ८५
- सांगली मिरज कुपवाड मनपा ६९
- सिंधुदुर्ग २८
- रत्नागिरी ३२
- औरंगाबाद ५५२
- औरंगाबाद मनपा ८९९
- जालना ४३२
- हिंगोली १२९
- परभणी १५१
- परभणी मनपा १३८
- लातूर २१६
- लातूर मनपा १६९
- उस्मानाबाद १५३
- बीड ३१२
- नांदेड ३७२
- नांदेड मनपा ६५०
- अकोला २७८
- अकोला मनपा २७८
- अमरावती १३७
- अमरावती मनपा ११३
- यवतमाळ ४७०
- बुलढाणा २६४
- वाशिम २२०
- नागपूर ७८२
- नागपूर मनपा २९६५
- वर्धा ३६८
- भंडारा २२०
- गोंदिया ४६
- चंद्रपूर २७९
- चंद्रपूर मनपा १३४
- गडचिरोली ३९
एकूण ३१८५५
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ९५ मृत्यूंपैकी ५५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १५ मृत्यू ठाणे-७, नाशिक-३, औरंगाबाद-२, पुणे-१, गोंदिया-१ आणि अकोला-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाकडून मिळालेल्या २४ मार्च २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.