मुक्तपीठ टीम
आज राज्यात ओमायक्राँन संसर्गाचे २३ रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यातील सर्वाधिक १३ रुग्ण पुणे शहर आणि जिल्ह्यातील, ५ मुंबईतील, २ उस्मानाबाद तर ठाणे, नागपूर आणि मीरा भाईंदरमधील प्रत्येकी एक आहेत. यामुळे राज्यात आतापर्यंत रिपोर्ट झालेल्या ओमायक्राँन रुग्णांची संख्या ८८ झाली आहे. त्याचवेळी कोरोनाच्या ११७९ नव्या रुग्ण आज आढळले आहे. ६१५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
कोरोनाची ठळक माहिती:
- आज राज्यात ११७९ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ६१५ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६५,००,३७५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.७% एवढे झाले आहे.
- राज्यात आज १७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,८१,१७,३१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,५३,३४५ (९.७७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ७६,३७३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ८९९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ७,८९७ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉनसर्वेक्षण विषयक माहिती :
- आज राज्यात ओमायक्राँन संसर्गाचे २३ रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यातील २२ रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने तर १ रुग्ण राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेने रिपोर्ट केला आहे.
- हे २३ रुग्ण पुढीप्रमाणे आहेत –
- पुणे -१३ ( पुणे मनपा आणि पुणे ग्रामीण प्रत्येकी ३, पिंपरी चिंचवड – ७)
- मुंबई -५
- उस्मानाबाद – २
- ठाणे मनपा, नागपूर मनपा आणि मीरा भाईदर मनपा प्रत्येकी -१
यामुळे राज्यात आतापर्यंत रिपोर्ट झालेल्या ओमायक्राँन रुग्णांची संख्या ८८ झाली आहे.
अ.क्र. | जिल्हा /मनपा | आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण |
१ | मुंबई | ३५* |
२ | पिंपरी चिंचवड | १९ |
३ | पुणे ग्रामीण | १० |
४ | पुणे मनपा | ६ |
५ | सातारा | ३ |
६ | कल्याण डोंबिवली | २ |
७ | उस्मानाबाद | ५ |
८ | बुलढाणा | १ |
९ | नागपूर | २ |
१० | लातूर | १ |
११ | वसई विरार | १ |
१२ | नवी मुंबई | १ |
१३ | ठाणे मनपा | १ |
१४ | मीरा भाईदर | १ |
एकूण | ८८ | |
*यातील २ रुग्ण कर्नाटक आणि केरळ तर प्रत्येकी १ रुग्ण छत्तीसगड, गुजरात, जळगाव, ठाणे आणि औरंगाबाद येथील आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. |
- यापैकी ४२ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आज आढळलेल्या २३ ओमायक्रॉन रुग्णांची सर्वसाधारण माहिती
- आज रिपोर्ट झालेल्या २३ रूग्णापैकी १६ हे आंतररष्ट्रीय प्रवासी तर ७ जण त्यांचे निकटसहवासित आहेत.
- प्रवासाचा इतिहास :
मध्यपूर्व देश – ६
युरोप -४
घाना आणि द आफ्रिका – प्रत्येकी २
सिगापूर आणि टांझानिया – प्रत्येकी १
- यातील ४ जण ही १८ वर्षाखालील बालके आहेत तर दोघे जण ६० वर्षांवरील आहेत.
- आजाराचे स्वरूप :
लक्षणेविरहित – १७
सौम्य -६
- लसीकरण : १८ रुग्णांचे पूर्ण लसीकरण झाले आहे, १ रुग्णांचे लसीकरण झालेले नाही, तर ४ रुग्ण लसीकरणासाठी पात्र नाहीत .
दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
एकूण आलेले प्रवासी | आर टी पी सी आर केलेले प्रवासी | आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण | ||||||
अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण |
२२८५९ | १३३२५६ | १५६११५ | २२८५९ | ४९६० | २७८१९ | ११७ | ३९ | १५६ |
या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ६७० प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी १२४ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई ०,८२१ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ०,२२०
- उ. महाराष्ट्र ०,०९१ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,०२७
- कोकण ०,००२ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,०१८
एकूण रुग्ण १,१७९
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ११७९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,५३,३४५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई महानगरपालिका ५७७
- ठाणे १६
- ठाणे मनपा ४७
- नवी मुंबई मनपा ५३
- कल्याण डोंबवली मनपा ३३
- उल्हासनगर मनपा ३
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा १९
- पालघर ९
- वसईविरार मनपा २९
- रायगड १४
- पनवेल मनपा २०
- ठाणे मंडळ एकूण ८२१
- नाशिक १३
- नाशिक मनपा ३२
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर १६
- अहमदनगर मनपा २८
- धुळे ०
- धुळे मनपा २
- जळगाव ०
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ९१
- पुणे ५३
- पुणे मनपा ७७
- पिंपरी चिंचवड मनपा ५४
- सोलापूर ६
- सोलापूर मनपा १
- सातारा १३
- पुणे मंडळ एकूण २०४
- कोल्हापूर ७
- कोल्हापूर मनपा ४
- सांगली ४
- सांगली मिरज कुपवाड मनपा १
- सिंधुदुर्ग १
- रत्नागिरी १
- कोल्हापूर मंडळ एकूण १८
- औरंगाबाद ३
- औरंगाबाद मनपा ९
- जालना २
- हिंगोली ०
- परभणी ०
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण १४
- लातूर २
- लातूर मनपा २
- उस्मानाबाद १
- बीड ७
- नांदेड ०
- नांदेड मनपा १
- लातूर मंडळ एकूण १३
- अकोला १
- अकोला मनपा १
- अमरावती ०
- अमरावती मनपा ०
- यवतमाळ १
- बुलढाणा ३
- वाशिम ०
- अकोला मंडळ एकूण ६
- नागपूर ३
- नागपूर मनपा ६
- वर्धा २
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर ०
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली ०
- नागपूर एकूण १२
एकूण ११७९
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २३ डिसेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.