महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: रविवार, २१ मार्च २०२१ कोरोना बेफाम…३०हजार नवे रुग्ण, सक्रिय रुग्ण २लाखांवर, ४८ तासात ४४ मृत्यू • आज राज्यात ३०,५३५ नवीन रुग्णांचे निदान. • आज ११,३१४ रुग्ण बरे होऊन घरी. • राज्यात आतापर्यंत एकूण २,१०,१२० सक्रिय रुग्ण आहेत. • राज्यात आजपर्यंत एकूण २२,१४,८६७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.३२ % एवढे झाले आहे. • राज्यात आज ९९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद . आज नोंद झालेल्या एकूण ९९ मृत्यूंपैकी ४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. • सध्या राज्यातील मृत्यूदर २.१५ % एवढा आहे. • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८३,५६,२०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २४,७९,६८२ (१३.५१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. • सध्या राज्यात ९,६९,८६७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९,६०१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.