मुक्तपीठ टीम
राज्यासाठी रविवारचा दिवस कोरोनाच्या डबल शिफ्टचा ठरला आहे. कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येने राज्यात ११ हजार ८७७ नवे रुग्ण, तर मुंबईत ७ हजार ७९२ रुग्ण सापडले आहेत. मुंबई मनपासह ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांच्या महामुंबईचा विचार केला तर महाराष्ट्राच्या या पट्ट्यातच एकूण कोरोना रुग्णसंख्येच्या जवळपास ८५ टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजेच नव्या १० हजार ३९४ रुग्णांचे निदान झाले आहे. आज राज्यात ५० ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. त्यापैकी एकट्या पुणे जिल्ह्यात ४६ नवे रुग्ण आहेत.
कोरोना ठळक माहिती
- आज राज्यात ११,८७७ नवीन रुग्णांचे निदान.
- आज २,०६९ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६५,१२,६१० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.२१% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.११% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९२,५९,६१८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,९९,८६८ (९.६७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २,४३,२५० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- १०९१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ४२,०२४ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन ठळक माहिती
आज राज्यात ५० ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ३८ भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने (आयसर) तर १२ रुग्ण राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र (एनसीसीएस) यांनी रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
- पुणे मनपा -३६
- पिपरी चिचंवड मनपा – ८
- पुणे ग्रामीण:- २
- सांगली- २
- ठाणे -१
- मुंबई -१
- आजपर्यंत राज्यात एकूण ५१० ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
अ.क्र. | जिल्हा /मनपा | आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण |
१ | मुंबई | ३२८* |
२ | पुणे मनपा | ४९ |
३ | पिंपरी चिंचवड | ३६ |
४ | पुणे ग्रामीण | २३ |
५ | ठाणे मनपा | १३ |
६ | नवी मुंबई, पनवेल | प्रत्येकी ८ |
७ | कल्याण डोंबिवली | ७ |
८ | नागपूर आणि सातारा | प्रत्येकी ६ |
९ | उस्मानाबाद | ५ |
१० | वसई विरार | ४ |
११ | नांदेड | ३ |
१२ | औरंगाबाद, बुलढाणा, भिवंडी निजामपूर मनपा, मीरा भाईंदर, सांगली | प्रत्येकी २ |
१३ | लातूर, अहमदनगर, अकोला, कोल्हापूर | प्रत्येकी १ |
एकूण | ५१० | |
*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. |
- यापैकी १९३ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
एकूण आलेले प्रवासी | आर टी पी सी आर केलेले प्रवासी | आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण | ||||||
अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण |
३१६४६ | १८६१९० | २१७८३६ | ३१६४६ | १६२६७ | ४७९१३ | २८६ | १६० | ४४६ |
या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत २२८४ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी १३४ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई १०,३९४ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ०,९८२
- उ. महाराष्ट्र ०,२१७ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,११७
- कोकण ०,०२४ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,१४३
एकूण रुग्ण ११,८७७
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ११,८७७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,९९,८६८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ७७९२
- ठाणे १५३
- ठाणे मनपा ६१७
- नवी मुंबई मनपा ५५९
- कल्याण डोंबवली मनपा २६०
- उल्हासनगर मनपा ६४
- भिवंडी निजामपूर मनपा १०
- मीरा भाईंदर मनपा ३११
- पालघर ४१
- वसईविरार मनपा २६१
- रायगड १२८
- पनवेल मनपा १९८
- ठाणे मंडळ एकूण १०३९४
- नाशिक ३६
- नाशिक मनपा ६९
- मालेगाव मनपा ६
- अहमदनगर ५५
- अहमदनगर मनपा ३०
- धुळे १
- धुळे मनपा २
- जळगाव ८
- जळगाव मनपा ३
- नंदूरबार ७
- नाशिक मंडळ एकूण २१७
- पुणे १५६
- पुणे मनपा ५३०
- पिंपरी चिंचवड मनपा १६६
- सोलापूर १५
- सोलापूर मनपा ७
- सातारा ५७
- पुणे मंडळ एकूण ९३१
- कोल्हापूर ८
- कोल्हापूर मनपा १४
- सांगली ११
- सांगली मिरज कुपवाड मनपा १८
- सिंधुदुर्ग ११
- रत्नागिरी १३
- कोल्हापूर मंडळ एकूण ७५
- औरंगाबाद ७
- औरंगाबाद मनपा २७
- जालना ८
- हिंगोली ०
- परभणी ६
- परभणी मनपा २
- औरंगाबाद मंडळ एकूण ५०
- लातूर १७
- लातूर मनपा १०
- उस्मानाबाद २६
- बीड ६
- नांदेड ४
- नांदेड मनपा ४
- लातूर मंडळ एकूण ६७
- अकोला २
- अकोला मनपा ४
- अमरावती ८
- अमरावती मनपा ८
- यवतमाळ ६
- बुलढाणा ३
- वाशिम ०
- अकोला मंडळ एकूण ३१
- नागपूर ९
- नागपूर मनपा ८४
- वर्धा ३
- भंडारा ४
- गोंदिया ९
- चंद्रपूर २
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली १
- नागपूर एकूण ११२
एकूण ११ हजार ८७७
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २ जानेवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.