मुक्तपीठ टीम
आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा रविवारी आपला निरोप घेणार आहे. बाप्पा चालले गावाला, चैन पडेना आम्हाला…असं हुरहुरत्या अंतकरणाने बोलत निरोप देताना कोरोनाचं विघ्न टाळण्यासाठी कमाल काळजी घेण्याची गरज दिसत आहे. कारण गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत पुन्हा वाढू लागलेली कोरोनाच्या नव्या रुग्णांची दैनंदिन संख्या धोक्याचा इशारा देत आहे. शनिवारी राज्यात ३ हजार ८४१ नवे रुग्ण सापडले, त्यातील ४७८ रुग्ण मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील आहेत. आजही राज्यात अहमदनगर आणि पुणे हे दोन जिल्हे पाचशेपेक्षा जास्त रुग्णसंख्या नोंदवत असल्याने तेथेही विसर्जनाच्यावेळी सुरक्षा नियम पाळण्याची आवश्यकता आहे.
राज्यातील कोरोना स्थिती आकड्यांमध्ये
- आज राज्यात ३,३९१ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ३,८४१ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६३,२८,५६१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.०९ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज ८० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,६८,७४,४९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,१८,५०२ (११.४६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २,८३,४४५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- १,८१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ४७,९१९ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र १,४१९
- महामुंबई ०,९३४ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०,७७७ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,१२२
- कोकण ०,१०४ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,०३५
नवे रुग्ण ३ हजार ३९१ (कालपेक्षा कमी)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ३,३९१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,१८,५०२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई मनपा ४७८
- ठाणे ४०
- ठाणे मनपा ६६
- नवी मुंबई मनपा ७३
- कल्याण डोंबवली मनपा ४३
- उल्हासनगर मनपा ३
- भिवंडी निजामपूर मनपा २
- मीरा भाईंदर मनपा ३५
- पालघर ९
- वसईविरार मनपा ४०
- रायगड ८१
- पनवेल मनपा ६४
- ठाणे मंडळ एकूण ९३४
- नाशिक ७५
- नाशिक मनपा २४
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ६६८
- अहमदनगर मनपा ८
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव १
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार १
- नाशिक मंडळ एकूण ७७७
- पुणे ४३१
- पुणे मनपा १८६
- पिंपरी चिंचवड मनपा १११
- सोलापूर २१५
- सोलापूर मनपा ४
- सातारा ३००
- पुणे मंडळ एकूण १२४७
- कोल्हापूर ४१
- कोल्हापूर मनपा १३
- सांगली ९०
- सांगली मिरज कुपवाड मनपा २८
- सिंधुदुर्ग ३८
- रत्नागिरी ६६
- कोल्हापूर मंडळ एकूण २७६
- औरंगाबाद ५
- औरंगाबाद मनपा १२
- जालना १५
- हिंगोली ०
- परभणी ३
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ३५
- लातूर ४
- लातूर मनपा १
- उस्मानाबाद ४१
- बीड ३९
- नांदेड २
- नांदेड मनपा ०
- लातूर मंडळ एकूण ८७
- अकोला १
- अकोला मनपा ०
- अमरावती ०
- अमरावती मनपा १
- यवतमाळ २
- बुलढाणा ८
- वाशिम ०
- अकोला मंडळ एकूण १२
- नागपूर ४
- नागपूर मनपा १२
- वर्धा ०
- भंडारा ०
- गोंदिया २
- चंद्रपूर ३
- चंद्रपूर मनपा २
- गडचिरोली ०
- नागपूर एकूण २३
एकूण ३ हजार ३९१
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)