Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काळ बदलतोय, कॅडबरीची जाहिरातही…आता ‘ती’ षटकार ठोकते, ‘तो’ बेफान नाचतो!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
cadbury

मुक्तपीठ टीम

कुछ खास है हम सभी मै.. असं म्हणत चॉकलेट बनवणारी कंपनी कॅडबरीने आता त्यांची नवी जाहिरात आणली आहे. या जाहीरातीचं सर्वच स्तरातून खूप कौतुक होत आहे. ९० च्या दशकात क्रिकेटच्या मैदानावर दिलखुलासपणे आपला आनंद व्यक्त करणारी तरुणी आणि तिचा क्रिकेटर मित्र यांच्यातलं गोड नातं उलगडून दाखवणारी कॅडबरीची जाहिरात प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. आता याच जाहीरातीला सुंदर ट्विस्ट देण्यात आला आहे. जाहीरातीची संकल्पना तीच, तेच मैदान, तेच हावभाव मात्र पात्र बदलेत.. आता क्रिकेटर तरुणाच्या ठिकाणी क्रिकेटर तरुणी आणि तिच्या आनंदात सहभागी होणारा, मैदानात नाचत गाजत जाणारा तिचा मित्र, असा ट्विस्ट जाहिरातीला देण्यात आला आहे. या नव्या जाहिरातीला पोस्ट करत ‘कॅडबरी’ ने सांगितलं आहे की, आओ, साथ जश्न मनाए. उन लड़कियों के लिए जो सफलता की नई ऊंचाइयों को छू रही हैं और युवाओं के लिए रोल मॉडल के रूप में उभर रही है.

 

कॅडबरी डेरी मिल्कच्या या दोन्ही जाहीराती ओगिल्वी या एजन्सीने बनवल्या आहेत. ही जाहिरात सत्य घटनेवर आधारीत असल्याचं बोललं जात आहे. सोशल मीडियावर जाहीरातीतल्या पात्रांच्या लिंग अदलाबदलीचं कौतुक केलं जात आहे.

 

कॅडबरीने का बनवली अशी जाहिरात?

नुकत्याच पार पडलेल्या ऑलिंपिंक आणि पॅरालिंपिक स्पर्धेत महिला खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आहे. महिला खेळाडूंनी सुवर्ण, कांस्य, रौप्य पदकांची कमाई करत देशाचं नावं उंचावलं आहे. काही खेळा प्रकारांमध्ये भारतीय महिला खेळाडूंनी आतापर्यंतची सर्वश्रेष्ठ कामगिरी केली आहे. त्यामुळे महिला खेळाडूंचा गौरव करण्यासाठी कॅडबरीने ही जाहिरात बनवली आहे.

 

कॅडबरीच्या जाहीरातीवर सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया खालीलप्रमाणे:

(हिंदीमधले ट्विट्स मराठीत भाषांतरीत केले आहेत.)

  • अरे देवा.. खूप सुंदर ट्विस्ट आहे. आम्ही ही जाहीरात पाहता पाहता लहानांचे मोठे झालो आणि आता याचा रिमेक पाहत आहोत. मला खूप आनंद होत आहे.
  • छान रिमेक आहे. वास्तविक पाहता जुनी जाहीरात आवडली आहे. मात्र ही जाहीरातही लक्षात राहण्यासारखी आहे.
  • १९९४ मध्ये ओगिल्वीने कॅडबर डेरी मिल्कची जाहीरात बनवली. २०२१ मध्ये ओगिल्वी इंडियाने पुन्हा हीच जाहीरात बनवली. मात्र ही वेगळी जाहीरात आहे. लैंगिक समानतेजवळ पाऊल टाकणाऱ्या समाजाचं चित्र यात दर्शवण्यात आलं आहे. आपल्या बॅटने चेंडूला मैदानापार टोलवणाऱ्या प्रत्येक मुलीला शुभेच्छा.
  • ९० च्या दशकात माझी सर्वाधिक आवडती आणि नेहमी लक्षात राहील, अशी ही जाहीरात आहे. कॅडबरीने खूप सुंदरपणे ही जबाबादारी पार पाडली आहे.

Tags: 90s adcadburygender twistkuch khaas haiकॅडबरी
Previous Post

विसर्जनाला गर्दी नकोच! मुंबईतील पाचशेकडे झेपावणारी नवी रुग्णसंख्या विसरु नका! पुणे, नगरही जास्तच!

Next Post

सरकार यावर्षी ३२५ कोटी लीटर इथेनॉल खरेदी करणार! पेट्रोलमध्ये ८.५ टक्के इथेनॉल असणार!!

Next Post
ethanol

सरकार यावर्षी ३२५ कोटी लीटर इथेनॉल खरेदी करणार! पेट्रोलमध्ये ८.५ टक्के इथेनॉल असणार!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!