मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात कोरोना महासाथीची दुसरी लाट सुरु झाल्याचे केंद्र सरकारने अधिकृतरीत्या कळवले आणि आजच राज्यात १७,८६४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आज ९,५१० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १,३८,८१३ वर पोहचली आहे. सुरुवातीच्या टप्प्यातच कोरोनाची दुसरी लाट भयकारी असल्याचे नव्या रुग्णसंख्येच्या आकड्यांवरून दिसू लागले आहे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधासाठी योग्य ती सुरक्षा उपाययोजनेचे पालन केले तर ही लाट रोखणे सोप जाईल, असे जाणकारांचे मत आहे.
आज राज्यात ८७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे, त्यापैकी एकूण ८७ मृत्यूंपैकी ३६ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत.
- आज राज्यात १७,८६४ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ९,५१० रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण १,३८,८१३ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण २१,५४,२५३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.७७ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज ८७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- आज नोंद झालेल्या एकूण ८७ मृत्यूंपैकी ३६ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत.
- ३१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
- उर्वरित २० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.२६ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७७,१५,५२२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,४७,३२८ (१३.२५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ६,५२,५३१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ६,०६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोना बाधित रुग्णांची महानगर, जिल्हानिहाय माहिती
आज राज्यात १७,८६४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २३,४७,३२८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई मनपा १,९२२
२ ठाणे २०६
३ ठाणे मनपा ३७३
४ नवी मुंबई मनपा २५१
५ कल्याण डोंबवली मनपा ४००
६ उल्हासनगर मनपा ३४
७ भिवंडी निजामपूर मनपा २३
८ मीरा भाईंदर मनपा ११३
९ पालघर २९
१० वसईविरार मनपा ७४
११ रायगड ९६
१२ पनवेल मनपा १५०
१३ नाशिक १९६
१४ नाशिक मनपा ५२१
१५ मालेगाव मनपा ३९
१६ अहमदनगर ३२२
१७ अहमदनगर मनपा १४२
१८ धुळे १२६
१९ धुळे मनपा १८३
२० जळगाव ३४६
२१ जळगाव मनपा २१७
२२ नंदूरबार ३९१
२३ पुणे ७४०
२४ पुणे मनपा १,९५४
२५ पिंपरी चिंचवड मनपा ८८०
२६ सोलापूर १४३
२७ सोलापूर मनपा १४२
२८ सातारा १३५
२९ कोल्हापूर २३
३० कोल्हापूर मनपा १८
३१ सांगली ३४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३७
३३ सिंधुदुर्ग १८
३४ रत्नागिरी ११२
३५ औरंगाबाद १३२
३६ औरंगाबाद मनपा ८६०
३७ जालना २५१
३८ हिंगोली ९८
३९ परभणी ७९
४० परभणी मनपा ७२
४१ लातूर ६९
४२ लातूर मनपा १२६
४३ उस्मानाबाद ७०
४४ बीड २८५
४५ नांदेड १६७
४६ नांदेड मनपा ३८४
४७ अकोला ९१
४८ अकोला मनपा २५१
४९ अमरावती १५०
५० अमरावती मनपा २०१
५१ यवतमाळ ४३५
५२ बुलढाणा ४३५
५३ वाशिम २१६
५४ नागपूर ६७०
५५ नागपूर मनपा १,९५१
५६ वर्धा २१९
५७ भंडारा ७४
५८ गोंदिया ४९
५९ चंद्रपूर ५९
६० चंद्रपूर मनपा ३३
६१ गडचिरोली ४७
इतर राज्ये /देश ०
एकूण १७,८६४
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ८७ मृत्यूंपैकी ३६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २० मृत्यू औरंगाबाद- ९, पुणे- ७, अकोला- २, ठाणे- १ आणि परभणी – १असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १६ मार्च २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.