मुक्तपीठ टीम
आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी २ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी एक रुग्ण पुणे येथील आणि एक रुग्ण लातूर येथील आहे. त्यामुळे आजपर्यंत राज्यात एकूण २० ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर त्यापैकी ९ रुग्ण त्यांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने घरी परतले आहेत. त्याचवेळी राज्यात कोरोनाचे ५६९ नवे रुग्ण सापडले असून, ४९८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
कोरोना स्थिती ठळक मुद्द्यांमध्ये
- आज राज्यात ५६९ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ४९८ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ६४,९३,००२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.७२% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ०५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यू दर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,६९,५८,६८१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,४४,४५२ (९.९२टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ७४,१९० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- तर ८८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ६,५०७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती –
- आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी २ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी एक रुग्ण पुणे येथील आणि एक रुग्ण लातूर येथील आहे.
- आजपर्यंत राज्यात एकूण २० ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. ( मुंबई – ५, पिंपरी चिंचवड -१०, पुणे मनपा -२ कल्याण डोंबिवली – १ नागपूर -१ आणि लातूर -१ ).
- यापैकी ९ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
- आज ओमायक्रॉन बाधित आढळलेल्या २ रुग्णांची माहिती –
- लक्षणे – दोन्ही रुग्ण लक्षणेविरहित.
- पुणे रुग्ण – ३९ वर्षाची महिला . लातूर रुग्ण – ३३ वर्षाचा पुरुष
- सध्या दोघेही विलगीकरणात
- आंतरराष्ट्रीय प्रवास – दुबई.
- या दोन्ही रुग्णांचे प्रत्येकी ३ निकटसहवासित कोविड निगेटिव्ह.
- दोन्ही रुग्णांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
- दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
एकूण आलेले प्रवासी | आर टी पी सी आर केलेले प्रवासी | आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण | ||||||
अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण |
१२९९६ | ७२०८२ | ८५०७८ | १२९९६ | १७८१ | १४७७७ | २४ | ८ | ३२ |
या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत १०७प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी २० नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई ०,२६५ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ०,१७४
- उ. महाराष्ट्र ०,०७६ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,०४६
- कोकण ०,००० (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,००८
नवे रुग्ण ०,५६९
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ५६९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,४४,४५२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका १६०
- ठाणे ६
- ठाणे मनपा २१
- नवी मुंबई मनपा ३३
- कल्याण डोंबवली मनपा १४
- उल्हासनगर मनपा १
- भिवंडी निजामपूर मनपा ०
- मीरा भाईंदर मनपा १०
- पालघर १
- वसईविरार मनपा ९
- रायगड ४
- पनवेल मनपा ६
- ठाणे मंडळ एकूण २६५
- नाशिक १८
- नाशिक मनपा ९
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ३९
- अहमदनगर मनपा १०
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव ०
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ७६
- पुणे ५५
- पुणे मनपा ५४
- पिंपरी चिंचवड मनपा २३
- सोलापूर १२
- सोलापूर मनपा ०
- सातारा १४
- पुणे मंडळ एकूण १५८
- कोल्हापूर २
- कोल्हापूर मनपा ६
- सांगली ६
- सांगली मिरज कुपवाड मनपा २
- सिंधुदुर्ग ०
- रत्नागिरी ०
- कोल्हापूर मंडळ एकूण १६
- औरंगाबाद २
- औरंगाबाद मनपा ८
- जालना १५
- हिंगोली ०
- परभणी ०
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण २५
- लातूर ०
- लातूर मनपा १
- उस्मानाबाद १०
- बीड ५
- नांदेड ०
- नांदेड मनपा ५
- लातूर मंडळ एकूण २१
- अकोला ०
- अकोला मनपा ०
- अमरावती ०
- अमरावती मनपा ०
- यवतमाळ २
- बुलढाणा ०
- वाशिम ०
- अकोला मंडळ एकूण २
- नागपूर ०
- नागपूर मनपा ४
- वर्धा ०
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर ०
- चंद्रपूर मनपा २
- गडचिरोली ०
- नागपूर एकूण ६
एकूण ५६९
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १३ डिसेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.