Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अमेरिकेन फॅशन ब्रँडची खादीला पसंती, महागड्या ड्रेसेससाठी हस्तनिर्मित खादी डेनिमचा वापर

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Khadi

मुक्तपीठ टीम

शाश्वत आणि शुद्धता यांचे प्रतिक असलेल्या खादीने जागतिक फॅशन विश्वात मोठी भरारी घेतली आहे. अमेरिकेतील ग्लोबल फॅशन ब्रँड, ‘पॅटागोनिया’ आता डेनिम कपडे तयार करण्यासाठी हाती बनवलेल्या खादी डेनिमचा उपयोग करत आहे. पॅटागोनियाने, वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या नामांकित अरविंद मिल्सद्वारे एक कोटी ८० लाख रुपये किमतीच्या सुमारे ३० हजार मीटर खादी डेनिम कापडाची गुजरातमधून खरेदी केली आहे.

 

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने अहमदाबादमधील अरविंद मिल्स समवेत जुलै 2017 मध्ये खादी डेनिम उत्पादनाचा जगभरात व्यापार करण्यासाठी करार केला. तेव्हापासून अरविंद मिल्स, गुजरातमधील केव्हीआयसी प्रमाणित खादी संस्थांमधून दरवर्षी मोठ्या प्रमाणात खादी डेनिम कापडाची खरेदी करत आहे.

 

पॅटागोनियाच्या खादी डेनिम खरेदीमुळे, खादी कारागीरांसाठी अतिरिक्त एक लाख ८० लाख मनुष्य तास म्हणजेच २७ हजार ७२० मानव दिवस कामाची निर्मिती झाली आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये कामाची ऑर्डर नोंदवण्यात आली आणि नियोजित १२ महिन्याच्या काळात म्हणजेच या ऑक्टोबरमध्ये याची पूर्तता करण्यात आली.

 

दर्जा तपासूनच खादी डेनिमची निवड

  • खरेदीला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी पॅटागोनियाने, जागतिक मुल्यांकन करणाऱ्या एनईएसटी, नेस्ट या अमेरिकास्थित त्रयस्थ कंपनीची नियुक्ती केली.
  • गोंडाळ इथे डेनिम उत्पादनाच्या संपूर्ण प्रक्रियेचे म्हणजेच कताई, विणणे, कार्डिंग,डायिंग, मजुरी, मजुरांच्या वयाची पडताळणी यासारख्या उत्पादनाशी निगडीत संपूर्ण प्रक्रियेचे मुल्यांकन करण्यासाठी ही त्रयस्थाची नियुक्ती करण्यात आली.
  • नेस्टने उद्योग भारती इथे सर्व निकषांचे मुल्यांकन केल्यानंतर कताई आणि हातमाग विणकाम, नेस्टचे हस्तकला सील साठी पात्र असल्याचे प्रमाणपत्र दिले.
  • देशातल्या खादी संस्थेच्या कार्यव्यवहारात, नैतिक मानकांची पूर्तता करण्यासाठी आंतरराष्ट्रीय त्रयस्थ मुल्यांकन कर्त्याकडून, प्रमाणपत्र आणि मुल्यांकनाची ही पहिलीच वेळ आहे.

 

पाहा व्हिडीओ: 


Tags: AmericaAmerican fashion brandArvind Millsglobal fashion brandGujaratIndiaKhadiKhadi and Village Industries CommissionKhadi denimKVICPatagoniaअमेरिकन फॅशन ब्रॅंडअमेरिकाअरविंद मिल्सखादी आणि ग्रामोद्योग आयोगखादी डेनिमगुजरातपॅटागोनियाभारतमुक्तपीठ
Previous Post

राज्यात ओमायक्रॉनचे दोन नवे रुग्ण! राज्यात कोरोनाचे ५६९ नवे रुग्ण, ४९८ रुग्ण बरे होऊन घरी!

Next Post

“या महाराष्ट्र आपलाच आहे…” पर्यटन अनुभव संस्मरणीय करण्यासाठी एमटीडीसी सज्ज!

Next Post
mtdc

“या महाराष्ट्र आपलाच आहे...” पर्यटन अनुभव संस्मरणीय करण्यासाठी एमटीडीसी सज्ज!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!